सैफ अली खान आणि करिना फिल्म इंडस्ट्री मधील सर्वाधिक पसंदीचे सेलेब्स कपल्सपैकी एक आहे. पण जेव्हा त्यांच्या अफेरची गोष्ट समोर आली होती तेव्हा त्यांचे चाहते त्यांच्या नात्याबद्दल अधिक गोष्टी जाणून घेण्यास फार उत्सुक होते. काही लोकांनी तेव्हा हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता की, सैफची पहिली बायको आणि दोन मुलांची आई असलेल्या अमृताला काय वाटेल. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर करिना आणि सैफ यांनी अखेर त्यांचे नाते ऑफिशियल केलेच होते. त्यानंतर ते दोघे लग्नबंधनात अडकले गेले. (Amruta on Saif Relationship)
सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या नात्याबद्दल आज सर्वांनाच माहिती आहे. लोकांना बेबोची सावत्र मुलं म्हणजेच सारा आणि इब्राहिम यांच्यामधील नात्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियात कधीतरी दिसतात. परंतु लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की, दोन सावत्रांमधील नाते कसे होते. म्हणजेच अमृता सिंह आणि करिना कपूर.

२००४ मध्ये अमृताला दिला घटस्फोट
अमृता सिंह ही त्या काळातील अभिनेत्री आहे जी एकामागून एक हिट सिनेमे देत होती. परंतु लग्नानंतर ती करियरपासून दूर राहिली. प्रेमाच्या नात्याने सुरुवात झालेल्या सैफ आणि अमृता यांच्या नात्यात काही वर्षातच वाद होऊ लागले. अशातच २००४ मध्ये दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. लग्न मोडल्यानंतर ते पुन्हा कधीच एकत्र आले नाहीत. पण २००७ मध्ये करिना आणि सैफ यांच्या अफेरची चर्चा मात्र जोर धरु लागली होती.
सैफ आणि करिनाच्या नात्यावर अमृता संतप्त झाली होती…
काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर करिनाने सैफची बायको होण्याचा अखेर निर्णय घेतलाच. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले. त्यावेळी मीडियात असा उल्लेख केला जात होता की, सैफ आणि करिना यांच्या नात्यामुळे अमृता फार चिडली होती. परंतु नंतर अमृताने या सर्व गोष्टी एका मुलाखतीत खोट्या असल्याचे स्पष्ट केले होते.(Amruta on Saif Relationship)
हे देखील वाचा- डिसलेक्सियाने त्रस्त मुलगा, हॉटेल मधील वेटर ते बॉलीवूडचा सुप्रसिद्ध ‘सितारा’!
खरंच अमृताला त्यांचे नाते पटले नव्हते?
अमृताने असे म्हटले होते की, सैफ आणि करिना यांच्या नात्यामुळे तिला कोणताच त्रास झाला नाही. जर तसे झाले असते तर तिने आपल्या एक्स नवऱ्याच्या नव्या लग्नात मुलांना पाठवलेच नसते. परंतु हे खरं आहे की, करिना आणि अमृता या दोघी एकमेकींशी बोलतच नाहीत. आजवर त्या दोघींना एका इवेंटमध्ये ही एकत्रित स्पॉट करण्यात आलेले नाही. सारा आणि इब्राहिम हे कधीतरी सैफ सोबत दिसतात. पण अमृता आफल्या मुलांसह सैफ सोबत कधीच दिसत नाही.