Home » आई होण्यासाठी अमृता रावने बघितली अनेक वर्ष वाट, सरोगसी झाली फेल

आई होण्यासाठी अमृता रावने बघितली अनेक वर्ष वाट, सरोगसी झाली फेल

by Team Gajawaja
0 comment
Amrita Rao
Share

विवाह फेम अभिनेत्री अमृता राव मागील बऱ्याच काळापासून चित्रपटांमधून गायब असली तरी सध्या ती तिच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आली आहे. या चॅनेलच्या माध्यमातून ती सतत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी शेअर करताना दिसतेय. यात तिने आतापर्यंत तिचे लग्न, तिचे रिलेशनशिप आदी अनेक विषयांवर तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. आता नुकताच अमृताने एक व्हिडिओ तिच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे, यात तिने तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितले आहे. 

अमृता रावने (Amrita Rao) आर.जे अनमोलसोबत २०१४ साली लग्न केले. आणि २०२० साली ती एका मुलाची आई झाली. अमृता आणि अनमोल यांनी त्यांच्या मुलाचे नाव वीर ठेवले आहे. नुकतेच अमृताने तिच्या प्रेग्नन्सीबद्दल आणि त्यात आलेल्या समस्याबद्दल सांगितले आहे. तिने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितले की, आई होण्यासाठी अमृता अनेक वर्ष प्रयत्न करत होती. त्यासाठी तिने अनेक आर्टिफिशियल गोष्टींची मदत देखील घेतली होती. या प्रयत्नांमध्ये तिला प्रत्येकवेळा अपयश येत होते. अनेक संकटांचा सामना करत तिने जेव्हा कन्सिव्ह केले तेव्हा तर तिच्या आनंदाला पारावारच उरला नाही. या सर्व गोष्टींचा खुलासा अमृता आणि अनमोल यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केला. यावेळी ते भावुक देखील झाले होते.

अमृता रावच्या (Amrita Rao) कपल ऑफ थिंग्स या यूट्यूब चॅनेलवर तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अमृताने तिचा आई होण्याचा प्रवास शेअर केला आहे. यात ती म्हणाली की, जवळपास तीन वर्ष तिने स्त्रीरोग डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले. तिने हे देखील सांगितले की, अमृताने अनेकवेळा आययूआय केले. आययुआय हे आयव्हीएफ नसल्याचे देखील तिने स्पष्ट केले. मात्र अनेकवेळा आययूआय करूनही त्यांना गुडन्यूज मिळत नव्हती. अखेर त्यांनी हा पर्याय सोडून दिला. 

पुढे अमृता रावने (Amrita Rao) सांगितले की, “अनमोलला आधीपासूनच वडील होण्याची खूपच इच्छा होती. मात्र माझे असे होते की झाले तर ठीक, नाही झाले तर देवाची मर्जी. मात्र अनमोल वडील होण्यासाठी खूपच आशा लावून बसला होता. तेव्हा मी सर्व पर्याय तरी करायचे ठरवले आणि देवावर विश्वास ठेवला. जेव्हा आययुआय फेल गेले तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सरोगेट मदरचा पर्याय दिला. त्यावर आम्ही खूप विचार केला, स्टेज २वर सरोगसीसाठी आम्ही तयार झालो, तेव्हा आम्ही अनेक स्त्रियांसोबत चर्चा केली त्यांच्या मुलाखती घेतल्या. सरोगसीच्या प्रक्रिया सुरू झाल्या आणि आम्ही लवकरच गुड न्यूज मिळेल याची वाट बघत होतो. एक दिवस अचानक आम्हाला डॉक्टरांचा फोन आला की, गुड न्यूज आहे. ही बातमी आमच्यासाठी खूपच मोठी आनंद देणारी होती.”

मग पुढे अनमोल बोलू लागतो आणि भावुक होऊन म्हणतो की, “एक दिवस पुन्हा आम्हाला फोन आला की आमचे बाळ नाही राहिले, सरोगसी फेल झाली. आम्ही दोघं भावुक झालो आणि विचार केला की आता काहीच नाही करायचे सध्या ब्रेक घ्यायचा. शांत राहू.”

पुढे अमृता (Amrita Rao) आणि अनमोल यांना डॉक्टरांनी आयव्हीएफचा सल्ला दिला. सरोगसी फेल झाल्यानंतर त्यांनी आयव्हीएफ करायचा विचार केला आधी अमृता यासाठी तयार नव्हती. मात्र त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. पण त्याचाही काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर त्यांना अनेकांनी डॉक्टर बदलण्याचा सल्ला दिला, त्यांनी ते देखील केले आणि दुसऱ्यांदा पुन्हा आयव्हीएफ तरी केले आणि ते पुन्हा फेल गेले. त्यानंतर अमृता आणि अनमोल पूर्णपणे तुटले आणि त्यांनी आता काहीच करायचे नाही ठरवले. 

========

हे देखील वाचा – आजही शाहिद कपूरला ‘या’ सुपरहिट चित्रपटांना नकार दिल्याचा नक्कीच पश्चाताप होत असेल

========

पुढे अनमोल आणि अमृता म्हणाले की, “आम्हाला काही लोकांनी सांगितले की, एक प्रसिद्ध बाल गणेश मंदिर आहे. आम्ही तिथे गेलो आणि नवस केला. आम्हाला कोणीतरी सांगितले की, आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक उपचार घ्या. मात्र ते घेऊन मला माझ्या त्वचेवर त्याचे परिणाम दिसू लागले आणि माझा चेहरा जळाला. अनेक उपचार करूनही आम्ही फेल होत होतो. शेवटी आम्ही जानेवारी २०२०मध्ये तणावातून बाहेर येण्यासाठी सुट्ट्या घायचे ठरवले. मग आम्ही आमचे सामान्य जीवन सुरू केले. आणि एक दिवस अचानक मला मी कन्सिव्ह केले असे समजले. देवाचा आशीर्वाद होता. ११ मार्च २०२० ला मी कन्सिव्ह केले आणि तेव्हाच लॉकडाऊन लागले. त्यानंतर आमचा प्रवास खूप अवघड होता मात्र तरीही आम्ही खुश होतो. कोणतेही उपचार न घेता मी कन्सिव्ह केले होते.” (Amrita Rao)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.