Home » झोलझाल चित्रपटातील विनोदी भूमिकेतून अभिनेता अमोल कागणे येतोय रसिक प्रेक्षकांच्या भेटीला

झोलझाल चित्रपटातील विनोदी भूमिकेतून अभिनेता अमोल कागणे येतोय रसिक प्रेक्षकांच्या भेटीला

by Team Gajawaja
0 comment
Amol Kagne
Share

‘हलाल’, ‘भोंगा’, ‘बेफाम’, ‘वाजवूया बँड बाजा’, ‘लेथ जोशी’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीनंतर अमोल कागणेने (Amol Kagne) ‘बाबो’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल असून येत्या १ जुलैला पुन्हा एकदा तो नव्याकोऱ्या आणि हास्यांची मैफिल घेऊन ‘झोलझाल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पदार्पणातच एक ना अनेक पारितोषिकं पटकावणारा हा तरुण निर्माता, अभिनेता म्हणजे एक अजब रसायनच आहे.

हा मेडिकलचा स्टुडन्ट आपल्या फावल्या वेळात मनोरंजनासाठी नाटकं करू लागला आणि त्यातूनच अमोलला त्याच्या करिअरची अचूक दिशा गवसली आणि आज बॅक ऑफ द कॅमेरा रमणारा अमोल सध्या फ्रंट कॅमेरा एन्जॉय करतोय. ‘झोलझाल’ या सिनेमात अमोलला पाहणे रंजक ठरणार आहे.

‘झोलझाल’ या चित्रपटात अमोल जय या पात्राची भूमिका साकारत आहे. जय आणि वीरूची ही थोडक्यात गोष्ट आहे. जय हा वीरूचा मोठा भाऊ असून तो त्याच्या प्रत्येक गोष्टीत वीरूला सहभागी करतो. चित्रपटातील प्रत्येक सिन हा कॉमेडी आहे. चित्रपटात जस जशा घटना घडत जातात तसे विनोदाचे पदर उघडत जातात. अमोलने पहिल्यांदाच या चित्रपटातून विनोदी भूमिका साकारली आहे, याआधी अमोलने गंभीर भूमिकांमध्ये किंवा आशयघन कथांमध्ये काम केले आहे.

अमोल उत्कृष्ट निर्माता तर आहेच मात्र तो एक उत्तम अभिनेता देखील आहे, अभिनयाचा प्रवास त्याने सुरु केला असून लवकरच तो ‘झोलझाल’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्टीस्टारर ‘झोलझाल’ या सिनेमात बऱ्याच दिग्गज कलाकारांनी काम केलंय.

या चित्रपटात काम करण्याचा मोठा ब्रेक त्याला चित्रपटाचे निर्माते गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता यांनी दिला असून दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी सेटवर खूपच सांभाळून घेतल. ‘युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन’ निर्मित आणि ‘अमोल कागणे स्टुडिओ’ आणि ‘रोलिंगडाईस’ प्रस्तुत हा चित्रपट अमोलसाठी कायमच अविस्मरणीय असेल यांत शंकाच नाही.

एकूणच चित्रपटाच्या अनुभवाबद्दल अमोल असे म्हणाला की, ‘एक विनोदी अभिनेता साकारणं खरच खूप अवघड बाब आहे आणि मी विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर येतोय ही माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. ‘झोलझाल’ हा सिनेमा मल्टीस्टारर असल्याने यांत मनोज जोशी, मंगेश देसाई, उदय टिकेकर यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला होता. इतके अनुभवी कलाकार असूनही त्यांनी कधीही सेटवर त्यांच्या अनुभवाचा बोलबाला न करता आम्हाला सांभाळून घेतलं आणि त्यामुळे आमच्यावरील दडपणही कमी झालं.

Amol Kagane

====

हे देखील वाचा: ‘आठवा रंग प्रेमाचा’ चित्रपटात रिंकूचा वेगळा लूक, ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

====

शिवाय चित्रपटाचा दिग्दर्शक मानस कुमार दास हा गमतीशीर आणि कॉमेडी असल्याने त्याने हसण्यातच आमच्याकडून सर्व सीन काढून घेतले. येत्या १ जुलैला ‘झोलझाल’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून या चित्रपटात तब्ब्ल २२ कलाकारांनी मिळून काय झोल केलाय हे पाहायला तुम्हाला चित्रपटगृहात जावेच लागेल.’


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.