आपण जर आपल्या हिंदू धर्मातील सणांचा, सणातील परंपरांचा आणि खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचा विचार केला, अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की, प्रत्येक सण आणि त्या सणात खाल्ला जाणारा एक एक पदार्थ हा केवळ आणि केवळ मनुष्याच्या आरोग्याचा विचार करूनच ठरवण्यात आला आहे. उदाहरण द्यायचे झाले तर संक्रांतीमध्ये आपण तीळ आणि गुळाचे पदार्थ खातो. याचे कारण म्हणजे हा सण थंडीमध्ये येतो आणि तेव्हा आपल्या शरीराला उष्णतेची, उब गरजेची असते, म्हणूनच संक्रांतीला तीळ आणि गूळ खाल्ला जातो. (Amla Navmi)
आवळा…आपल्या शरीराच्या, आरोग्याच्या दृष्टीने निसर्गाने आपल्याला दिलेले वरदानच आहे. कारण या आवळ्याचे अगणित असे फायदे आपल्या शरीराला होतात. म्हणूनच आवळ्याला कायम ‘बहुगुणी’ हे विशेषण लावले जाते. थंडीच्या दिवसात आवळा बाजारात येण्यास सुरुवात होते. याच आवळ्याला खायला सुरुवात करण्याआधी एक खास दिवस साजरा केला जातो. या दिवसाला ‘आवळा नवमी’ असे म्हटले जाते. आवळा नवमीचे जेवढे आरोग्यदायी महत्त्व आहे, तेवढेच धार्मिक महत्त्व देखील आहे. मग आता आवळा नवमी म्हणजे काय? या दिवशी काय केले जाते? हा दिवस कसा साजरा करतात? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया. (Marathi)
कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आवळा नवमी म्हणून साजरी केली जाते. याला अक्षय नवमी, आमला नवमी असे देखील म्हणतात. हा सण देव उठनी एकादशीच्या दोन दिवस आधी येतो. असे मानले जाते की, सत्ययुगाची सुरुवात अक्षया नवमीला झाली. या दिवशी केलेल्या आशीर्वादामुळे शाश्वत फळे मिळतात असे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान श्री विष्णूंचे सर्वात आवडते फळ म्हणजे आवळा आणि आवळा वृक्ष हे सर्व देवी-देवतांचे निवासस्थान मानले जाते. हा दिवस लोकांमध्ये अक्षय नवमी धात्री आणि कुष्मांडा नवमी म्हणूनही ओळखला जातो. मान्यतेनुसार, कार्तिक शुक्ल नवमीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत भगवान विष्णू आवळ्याच्या झाडावर वास करतात. या दिवशी आवळा वृक्ष, भगवान भोलेनाथ आणि श्री हरी विष्णू-लक्ष्मी यांची आवळ्याच्या झाडाखाली बसून पूजा केली जाते. (Top Marathi Headline)
हा दिवस अक्षय तृतीयेसारखा असतो. असे म्हणतात की, त्रेता युगाची सुरुवातही याच दिवशी झाली होती आणि त्याला त्रेता युग म्हणूनही ओळखले जाते. हा दिवस कोणत्याही प्रकारचे दान करण्यास अनुकूल आणि शुभ मानला जातो. देशातील विविध भागात अक्षय नवमीला ‘आवळा नवमी’ असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार, आवळ्याच्या झाडावर अनेक देवता राहतात. त्यामुळे अनेक भक्त आवळ्याच्या झाडाची पूजा करतात. पश्चिम बंगालमध्ये अक्षय नवमीचा दिवस जगधात्री पूजा म्हणून साजरा केला जातो. तेथील लोक या दिवशी जगधात्री देवीची पूजा करतात. असे म्हटले जाते की, या दिवशी मथुरा-वृंदावनाची परिक्रमा करणाऱ्या भक्तांना आनंद आणि समृद्धी मिळते. (Latest Marathi News)
======
Tulshi Vivah : जाणून घ्या तुळशी विवाहाचे महत्त्व आणि कथा
======

पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीची सुरुवात गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०६ वाजता होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०३ वाजता या तिथीची समाप्ती होईल. यावर्षी अक्षया नवमी शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. आवळा नवमी २०२५ शुभ मुहूर्त पुढील प्रमाणे असतील. सकाळी १०:४६ ते दुपारी १२:१० पर्यंत, दुपारी ११:४८ ते १२:३२ पर्यंत (अभिजीत मुहूर्त), दुपारी १२:१० ते ०१:३४ पर्यंत, दुपारी ०१:३४ ते ०२:५८ पर्यंत, सायंकाळी ०५:४६ ते ०७:२२ पर्यंत असेल. या दिवशी अक्षया नवमीच्या दिवशी पूजेची वेळ शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.38 ते 10.3 पर्यंत असेल. (Todays Marathi Headline)
आवळा नवमीच्या दिवशी स्त्रिया आवळ्याच्या झाडाखाली बसून संतान प्राप्ती आणि संतान रक्षेसाठी पूजा करतात. आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करण्याची देखील परंपरा आहे. या दिवशी स्नान, पूजन, तरपण आणि अन्न इतर दान केल्याने अक्षय फळ प्राप्ती होते. देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्तीसाठी देखील ही पूजा केली जाते. देशातील विविध राज्यात आवळा नवमीचा सण मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. आवळा नवमीचे व्रत केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच मोक्ष प्राप्तीदेखील होते. या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते. अक्षय नवमीला कुष्मंद नवमी म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक कथांनुसार, भगवान विष्णूने या दिवशी कुष्मंद राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. (Top Trending News)
आवळा नवमीच्या दिवशी काय करावे?
आवळा नवमीच्या दिवशी सकाळी स्नानाच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस टाकून स्नान करावे. यामुळे ओवती-भोवती असलेली नकारात्मक उर्जा नष्ट होते. स्नान केल्यानंतर देवी लक्ष्मी आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करावी. आवळ्याच्या झाडाखाली पूर्वाभिमुख होऊन बसून ‘ॐ धात्र्ये नम:’ या मंत्राचा जप करत आवळ्याच्या झाडाच्या मुळात दुधाची धार सोडत पितरांचे ध्यान करावे. या झाडाजवळ कापूर आणि तुपाचा दिवा लावून आरती करून प्रदक्षिणा घालावी. (Top Marathi News)

आवळ्याच्या झाडाची पूजा झाल्यानंतर खीर, पुरी, भाजी आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा. आवळ्याच्या झाडाला १०८ प्रदक्षिणा घालाव्या. याने मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले गेले आहे. आवळ्याच्या झाडाखाली ब्राह्मणांना भोजन घालून दक्षिणा द्यावी. या दिवशी आपण देखील याच झाडाखाली बसून भोजन करावे. या दिवशी आवळ्याचे झाड घरी लावणे शुभ मानले जाते. तसे पाहिले तर पूर्व दिशेला कोणतेही मोठे झाडं लावू नये परंतू या दिशेत आवळ्याचे झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. तसेच घराच्या उत्तर दिशेला देखील हे झाड लावणे फायदेशीर ठरते. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी कपडे, ब्लँकेट्स दान करावे. या दिवशी केलेलं दान अधिक पटीने लाभ प्रदान करणारे ठरते. मुलांची स्मरण शक्ती वाढावी किंवा ज्या मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल अशा मुलांच्या पुस्तकात आवळा आणि चिंचेच्या झाडाचे हिरवे पाने ठेवावे. (Latest Marathi Headline)
आवळा नवमी कथा
आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वत: देवी लक्ष्मी यांनी सुरू केली होती. या संदर्भात एक कथा आहे की जेव्हा देवी लक्ष्मी पृथ्वी भ्रमणासाठी आली तेव्हा रस्त्यात त्यांना प्रभू विष्णू आणि शिव या दोघांची सोबत पूजा करण्याची इच्छा जागृत झाली. परंतू देवी लक्ष्मी यांनी विचार केला की विष्णू आणि शिव यांची सोबत पूजा कशा प्रकारे शक्य आहे. तेव्हा देवी लक्ष्मीच्या ध्यानात आले की तुळस आणि बेल यांचे गुण आवळ्याच्या झाडात आढळतात. तुळस विष्णूंना प्रिय आहे तर बेल पत्र महादेवाला. (Top Stories)
तेव्हा आवळ्याच्या झाडाला प्रभू विष्णू आणि शिव यांचे प्रतीक मानून देवी लक्ष्मी यांनी आवळ्याच्या झाडाची पूजा केली. पूजेमुळे प्रसन्न होऊन प्रभू विष्णू आणि शिव प्रकट झाले. तेव्हा देवी लक्ष्मीने भोजन तयार करून आवळ्याच्या झाडाखाली दोन्ही देवांना जेवू घातले. नंतर स्वत: भोजन ग्रहण केले. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कार्तिक शुक्ल नवमी तिथी होती. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. (Top Trending Headline)
=======
Devuthani Ekadashi : कार्तिक महिन्यात येणाऱ्या देवउठणी एकादशीचे महत्त्व आणि माहिती
Tulshi Vivah : यंदा तुळशी विवाह कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त
=======
एका आणखी कथेनुसार एका युगात एका वैश्यच्या पत्नीला पुत्र रत्न प्राप्ती होत नव्हती. तेव्हा तिने आपल्या शेजारणीचे ऐकून भैरव देवाला एका मुलाची बळी दिली. याचे उलट फळ भोगावे लागले आणि महिला कुष्ठ रोगाने ग्रसित झाली. यावर ती पश्चात्ताप करू लागली आणि रोगमुक्त होण्यासाठी गंगेच्या शरणी गेली. तेव्हा गंगेने तिला कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळा सेवन करण्याचा सल्ला दिला. गंगेच्या सांगितल्याप्रमाणे तिने पूजन करून आवळा ग्रहण केला आणि रोगमुक्त झाली. या प्रभावाने तिला दिव्य शरीर आणि पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. तेव्हापासून हिंदू लोकांमध्ये हे व्रत करण्याची परंपरा पडली. (Social News)
(टीपः ही माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
