Home » अमेरिकेची अर्थव्यवस्था डबघाईला…

अमेरिकेची अर्थव्यवस्था डबघाईला…

by Team Gajawaja
0 comment
America economy
Share

अमेरिका जगात आपल्या नावाचे वर्चस्व प्रस्थापित करणा-या या समृद्ध देशात जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न जगभरातील हजारो तरुण बघत आहेत. लाखो, करोडोंचे पॅकेज हे त्यामागचे पहिले कारण असते. शिवाय नोकरदाराला मिळणा-या अनेक सुविधा आणि मिळणा-या खूप सा-या सुविधा यामुळे अनेक तरुणांचा अमेरिकेत जाऊन स्थिरावण्याचा प्रयत्न असतो.  दरवर्षी फक्त भारतातूनच नाही तर जगभरातील तरुण अमेरिकेमध्ये उच्चशिक्षणासाठी जातात, आणि तेथील मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळवून स्थिरावतात.  मात्र अलिकडच्या काही महिन्यात अमेरिकेतील या नोक-यांवर टांगती तलवार आहे.  अमेरिकेतील मान्यवर कंपन्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये नोकरकपात जाहीर केली आहे.  त्यातच अमेरिकेतील काही बॅंका डबघाईला आल्याची बातमी आहे.  तेथील सिलिकॉन सारखी बॅंकही डबघाईला येऊन बुडल्याची माहिती आहे.  यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था (America economy) कशी आहे, याची उत्सुकता आहे.  जगात सुपरपॉवर म्हणून ओळखल्या जाणा-या या देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे की काय याची चर्चा सुरु झाली आहे.   कारण येथील अनेक नागरिक बॅंकांमधून पैसे काढून घेत आहेत.  एकापाठोपाठ दोन बॅंका बंद झाल्यामुळे आपले पैसे बुडणार आहेत, ही भीती नागरिकांना असून गेल्या महिनाभरात बॅंकामधून पैसे काढणा-या नागरिकांची संख्या वाढली आहे. (America economy) 

अमेरिकेबाबतच्या या बातमीनं आर्थिक जगात खळबळ उडाली आहे. दरवर्षी जगभरातून लाखो विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी जातात.  अमेरिकेतील आयटी कंपन्या या विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे प्रमुख स्थान आहे.  मात्र अलिकडे काही महिन्यात गुगल, अमेझॉन, वॉलमार्ट, फेसबूक सारख्या आयटी हबमधून नोकरकपात चालू झाली आहे.  त्यामुळे या विदयार्थ्यांपुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.  जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाणा-या अमेरिकेबाबत सर्व बाजूंनी नकारात्मक बातम्या येत आहेत.  अमेरिकेतील सिलिकॉन या मोठ्या बॅंकेसह आणखी एक बॅंक बुडली आणि या बातम्यांना जणू पुष्टी मिळाली आहे.   या बॅंका बुडल्यानंतर अन्य काही बॅंकाही डबघाईला आल्याची बातमी आहे.  त्यामुळे बँकांची अवस्था पाहून अमेरिकेतील लोकांनी काही दिवसांत एक लाख कोटींहून अधिक रुपये काढल्याची माहिती आहे.  यामुळे   अमेरिकेतील स्थानिक नोकरदारांच्या नोक-यांवर संकट आले आहे. शिवाय अशीच परिस्थिती राहिली तर लाखो लोकांना रोजगार गमवावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.  ग्राहकांना एकसाथ लाखो रुपये काढल्यामुळे काही बँकेची अवस्था बिकट झाली आहे.  अनेक देशांमध्ये डॉलरऐवजी त्यांनी स्वतःच्या चलनात व्यापार सुरू केला आहे. अमेरिकेचे कर्ज आणि जीडीपीचे प्रमाण विक्रमी पोहोचले आहे.  अशाप्रकारचा धोका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर पहिल्यांदाच आला आहे. जुलैपर्यंत कर्जाची मर्यादा वाढवली नाही, तर कधी नाही ते अमेरिकेसारखा सुपरकॉप देश देशीधडीला लागले, अशी भीती तेथील अर्थतज्ञ व्यक्त करीत आहेत.(America economy)   

पण ही चिंता फक्त अमेरिकेलाच नाही, तर जगभरातली सर्वच देशांना आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर (America economy) ब-याच देशांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे.  अमेरिकेतील अर्थव्यवस्था डबघाईला आली तर त्याचा फटका बसून या देशांमध्येही आर्थिक व्यवस्था कोलमडेल अशी भीती आहे.  आणि या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.  जर अमेरिका डिफॉल्ट झाली तर येथे काम करणारे 70 लाखांहून अधिक लोक बेरोजगार होतील आणि जीडीपी 5 टक्क्यांनी घसरेल. याचा सर्वात मोठा  परिणाम भारतासह अनेक देशांमध्ये दिसणार आहे.  यासंदर्भात अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी, जेनेट येलेन यांनी दोन महिन्यापूर्वीच सावधानता बाळगावी असा इशारा दिलेले आहे. अमेरिका जूनपर्यंत कर्जाच्या पेमेंटवर डिफॉल्ट होऊ शकते. अमेरिकेने कर्जाची मर्यादा ओलांडली आहे. येलेन यांनी संसदेला कर्ज मर्यादा लवकरात लवकर वाढवण्याची विनंती केली. यामुळे अमेरिकेचा सुपरपॉवर हा फुगा लवकरच फुटण्याच्या बेतात असून यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणावरही मोठा बदल घडणार आहे.  

=======

हे देखील वाचा : ब्रिटीश मंत्र्यांचा धक्कादायक आरोप…

=======

अमेरिकेमध्ये 2022 मध्ये देशातील कर्ज आणि जीडीपीचे प्रमाण 120 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.  विशेष गोष्ट अशी की दुसऱ्या महायुद्धाच्या काळापेक्षा हे प्रमाण जास्त आहे.  दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 मध्ये तो 11% होता.  2020 पासून आतापर्यंत अमेरिकेच्या एकूण खर्चात 8.2 ट्रिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे. असे मानले जाते की 2033 पर्यंत अमेरिकेचे कर्ज 21 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.  आत्ता परिस्थिती अशी आहे की,  जगभरातून अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान मिळत आहे.  अमेरिकन डॉलरने जगाच्या अर्थव्यवस्थेवर (America economy) जवळपास 8 दशके राज्य केले आहे. परस्पर व्यवसायासाठी विशेष चलन अवलंबून आहे  परंतु आता अनेक देशांना डॉलरपासून दूर राहायचे आहे. त्याची सुरुवता ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी केली आहे. अमेरिकन डॉलरपासून मुक्त होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.  सोबत रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेने नवीन चलन विकसित करण्याची घोषणा केली आहे. ही सर्व सुरुवात असून लवकरच अमेरिकेच्या आर्थिक साम्राज्याला (America economy) तडे पडणार असून हे साम्राज्य कोसळले तर जगावरील अमेरिकेच्या सत्तेला मोठा धक्का बसणार आहे.  


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.