Home » America Rules : अमेरिकेनं नागरिकांनी चिनी नागरिकांच्या प्रेमात पडू नका !

America Rules : अमेरिकेनं नागरिकांनी चिनी नागरिकांच्या प्रेमात पडू नका !

by Team Gajawaja
0 comment
America Rules
Share

चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत आहे.  त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी कर वादाची भर घातली.  आता चीनवर अमेरिकेनं 34 टक्के कर लादला आहे.  या सर्वांमुळे चीन आणि अमेरिकेमध्ये असलेल्या तणावात भर पडत असतांना आणखी एका नव्या आदेशानं त्यात भर पडली आहे.  अमेरिकेनं चीनमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांना कुठल्याही चिनी नागरिकांच्या प्रेमात पडू नका, असा आदेशच दिला आहे.  मुख्यतः चीनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दुतावासात काम करत असलेल्या कर्मचा-यांना हा आदेश पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.  चीनमध्ये अमेरिकेच्या नागरिकांवर पाळत ठेवण्यात येत असून अमेरिकेची महत्त्वाची माहिती चोरण्यासाठी चीन हरप्रकारे प्रयत्न करत असल्याचा आरोप अमेरिकेकडून कऱण्यात येत आहे.  त्यामुळेच आता अमेरिकेनं आपल्या देशातील नागरिकांना चीनमध्ये राहताना सावधानता बाळगावी असे आवाहनही केले आहे.  या नव्या आदेशानं या दोन देशांमधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. (America Rules)

प्रत्येक देशाचा दूतावास दुस-या देशात असतो, आणि त्यात अनेक कर्मचारी प्रशासकीय कामात व्यस्त असतात.  अमेरिकेचे दूतावासही जगभर आहेत.  चीनमध्ये अमेरिकेचे काही दूतावास आहेत.  चीनमध्ये अमेरिकेचे बीजिंगमध्ये  दूतावास आहेच, शिवाय वाणिज्य दूतावासही आहे.  बिजिंगसह ग्वांगझू, शांघाय, शेनयांग आणि वुहानमधील चार वाणिज्य दूतावास आणि हाँगकाँगमधील एक वाणिज्य दूतावास यांचा यात समावेश आहे.  या दूतावासात आणि वाणिज्य दूतावासात चीनमध्ये रहाणा-या अमेरिकन नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यात येतात.   व्हिसा आणि परदेशातील नागरिकांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवण्यात येतात.  सोबतच चीनसोबत अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यासाठी अनेक योजनांवर काम करण्यात येते.  या दूतावासात अनेक अमेरिकेचे कर्मचारी काम करत आहेत. (America Rules)

या सर्व अमेरिकन अधिका-यांसाठी अमेरिकन सरकारनं एक आदेश दिला आहे,  हा आदेश म्हणजे, चीनी नागरिकांबरोबर प्रेम प्रकरण करु नका.  अर्थात चीनी नागरिकंबरोबर प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध ठेऊ नयेत असा स्पष्ट आदेश या अमेरिकन सरकारनं दिला आहे.  पण यातही एक मोठी अडचण आहे.  कारण या दूतावासात आणि वाणिज्य दूतावासात काम करणा-या काही अमेरिकनं नागरिकांनी चीनमधील नागरिकांबरोबर नातेसंबंध जोडल्याचे उघड झाले आहे.  काही लग्नही झाली आहेत.  अशा परिस्थितीत या नात्याबाबत सगळी माहिती देण्याचे आदेशही देण्यात आला आहे.  यासोबत चीनमध्ये रहाणा-या अमेरिकन नागरिकांची संख्या मोठी आहे.  यापैकी काही अमेरिकन हे चीनमधील कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत.  या सर्वांना चीनमध्ये राहताना काळजी घ्यावी, तसेच अमेरिकेच्या संरक्षणाला बाधा येईल, असा कुठलाही पत्रव्यवहार किंवा अमेरिकन कंपनीची माहिती चीनमधील आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करु नका असे आदेश देण्यात आले आहेत.  

या सर्वांमागे मुख्य कारण म्हणजे, चीनमध्ये गेल्या काही वर्षापासून होत असलेली अमेरिकेची हेरगिरी.  चीनमध्ये राहत असलेल्या अनेक अमेरिकन नागरिकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.  अनेक अमेरिकन अधिकारी हे चीनमधील तरुणींच्या प्रेमात पडल्याच्या घटना घडल्या आहेत.  नंतर या तरुणींनी अमेरिकेच्या प्रशासनातील काही महत्त्वाची माहिती चोरल्याचे उघड झाले आहे.  (America Rules)

=============

हे देखील वाचा : Famous Bridge : भारतातील ‘हा’ खांबविरहित ब्रिज, रात्री १२ वाजता खास कारणामुळे होतो बंद

=============

यामुळेच अमेरिकन सरकारनं आता चीनी व्यक्तींबरोबर कुठलेही प्रेमाचे संबंध ठेऊ नका, असे आवाहन केले आहे.  सोबत चिनी नागरिकांसोबत लैंगिक संबंधांवर बंदी घालण्यात आली आहे.  अमेरिकन सरकारनं हा आदेश जानेवारी महिन्यामध्येच लागू केला आहे.  तत्कालीन अमेरिकन राजदूत निकोलस बर्न्स यांनी चीन सोडण्यापूर्वी हे आदेश दिले आहेत.  अमेरिकन अधिकारी मोठ्या संख्येनं चीनी तरुणींबरोबर प्रेमसंबंधात असून काहींनी त्यांच्यासोबत लग्नही केले आहे.  यातून दोन देशांमधील संवेदनशील माहितीची हमी देता येत नाही, असे मत निकोलस बर्न्स यांनी व्यक्त केले होते.  बर्न्स यांच्या माहितीनुसार चीनमधील अमेरिकन दूतावासातील सुरक्षा कर्मचारी हे कायम वेगवेगळ्या चीनी तरुणींना डेट करतात. यातून सुरक्षा संस्थेसंदर्भातील माहिती शेअर होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. यातून अमेरिकेच्या संरक्षणाला हानी होईल, अशाही घटना समोर आल्या आहेत.  या सर्वांपासून घडा घेत आता अमेरिकेनं आपल्या दूतावासातील कर्मचा-यांना, नैना मत लडाओ..असा स्पष्ट आदेश दिला आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.