Home » Bagram Airbase : बाग्राम एअरबेससाठी का अडून राहिला आहे अमेरिका !

Bagram Airbase : बाग्राम एअरबेससाठी का अडून राहिला आहे अमेरिका !

by Team Gajawaja
0 comment
Bagram Airbase
Share

30 ऑगस्ट 2021 ही तारीख अमेरिकन लष्कर कधीही विसरणार नाही. अफगाणिस्तानतमधील काबूल विमानतळावरुन याच दिवशी अमेरिकन सैन्याची शेवटची तुकडी अमेरिकेत परतली. तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांच्या निर्णयानंतर अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या सत्तेचा प्रतिक ज्याला मानण्यात येत होता, तो बाग्राम हवाई तळ खाली करण्यात आला. अमेरिकन लढाऊ विमाने, ड्रोन आणि हेलिकॉप्टर जिथून उड्डाण करत होती, जिथे दहशतवादी आणि संशयितांना तुरुंगात ठेवण्यात येत होते, त्या बाग्राम हवाई तळाचा 2021 मध्ये अमेरिकन सैन्याने ताबा सोडला. (International News)

ही गोष्ट अमेरिकन सैन्याच्या पचनी पडली नसली तरी तालिबानसाठी हा विजयी दिवस ठरला. आता याच बाग्राम हवाई तळावरुन अमेरिका आणि तालिबान यांच्यात वाद सुरु झाले आहेत. कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बाग्राम हवाई तळावर अमेरिकेचा दावा असल्याचे सांगितले आहे. शिवाय या हवाई तळ चीन जवळ असून तिथे अण्वस्त्र निर्मिती करत असल्याचा आरोप केला आहे. वास्तविक बाग्राम हवाई तळाचा ताबा अमेरिकेनं सोडल्यावर तालिबानने चीनबरोबर या हवाई तळाची देखभाल सुरु केली आहे. त्यामुळेच आता जेव्हा पुन्हा या हवाई तळावर अमेरिका हक्क सांगू लागली, तेव्हा तालिबान अधिका-यांसह चीनच्याही वरिष्ठ सैन्य अधिका-यांनी बाग्राम हवाई तळाचा ताबा कधीही अमेरिकेकडे देणार नसल्याचे सांगितले आहे. (Bagram Airbase)

अमेरिकन सैन्याची उपस्थिती अफगाणिस्तानच्या कुठल्याही भागात आता अस्वीकार्य असून प्रसंग आला तर अमेरिकेच्या सैन्याशी युद्धासाठी तयार असल्याचे तालिबानी लष्करी अधिका-यांनी सांगितले आहे. त्यामुळे अमेरिका आता नव्या युद्धाला तोंड फोंडणार का, हा प्रश्न विचारला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नवा वाद सुरु केला आहे. त्यांनी अफगाणिस्तानमधील बाग्राम हवाई तळावर अमेरिकेचे हक्क असल्याचे सांगितले आहे. चार वर्षापूर्वी या हवाई तळाचा ताबा अमेरिकेनं सोडून दिला होता. त्यानंतर तिथे आता तालिबान, चीनच्या सहाय्यानं काम करीत आहे. चीनच्या सीमेजवळ असलेल्या या बग्राम हवाई तळावर दावा अमेरिकेनं केल्यावर तालिबान आणि चीननंही हा प्रस्ताव फेटाळला आहे. अफगाणिस्तानचा बाग्राम हवाई तळ धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. (International News)

चीन तेथे अण्वस्त्रे विकसित करत असल्याचा अमेरिकन प्रशासनाचा संशय आहे. त्यामुळे ट्रम्प यांना हा हवाई तळ पुन्हा ताब्यात घ्यायचा आहे. चार वर्षांपूर्वी 2021 मध्ये, तत्कालीन अध्यक्ष जो बायडेन यांच्या आदेशानुसार अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतली. 20 वर्षांच्या युद्धानंतर 2021 मध्ये तालिबानने काबूल ताब्यात घेतले आणि अमेरिकन सैन्याने तिथून पाय काढून घेतला. बाग्राम मधून अमेरिकन सैन्य गेल्यावर तालिबान सरकारने हा हवाई तळ ताब्यात घेतला. बाग्राम हवाईतळ 1950 च्या दशकात सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेच्या मदतीने बांधण्यात आला होता. हा हवाई तळ अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या उत्तरेस 40 किलोमीटर अंतरावर आहे. अमेरिकन लष्कराच्या ताब्यात असलेला अफगाणिस्तानमधील हा सर्वात मोठा अमेरिकन लष्करी तळ होता. (Bagram Airbase)

2001 मध्ये झालेल्या 9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेने त्याचा वापर सुरू केला होता. येथ 30000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात होते. शिवाय नाटो सैन्याचे मुख्यालयही येते होते. बाग्राम हवाई तळावर 11000 फूट लांबीचे दोन काँक्रीट रनवे आहेत. या रनवेवर जे सी-5 गॅलेक्सी आणि बी-52 बॉम्बर्स सारखी मोठी मालवाहू विमाने ये-जा करत असत. शिवाय येथे 110 हून अधिक विमाने उभी राहू शकत होती. येथे एक इंधन डेपो, एक रुग्णालय, एक तुरुंग आणि एक गुप्तचर केंद्र देखील होते. शिवाय या हवाई तळावर बर्गर किंग आणि पिझ्झा हट सारखी रेस्टॉरंट्स होती. इलेक्ट्रॉनिक्स आणि अफगाण कार्पेट विकणारी दुकाने देखील होती. बाग्राम भौगोलिक आणि सामरिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि पश्चिम आशियाच्या मध्यावर आहे. (International News)

इराण, पाकिस्तान, चीनचा शिनजियांग प्रांत आणि रशियाच्या सीमेवर आहे. मुख्य म्हणजे, चीनच्या अण्वस्त्र निर्मिती सुविधा शिनजियांगमध्ये आहेत. या तळापासून फक्त एक तासाच्या अंतरावर बाग्राम आहे. त्यामुळेच ट्रम्प आता चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाग्रामला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेने ताबा सोडल्यावर तालिबाननं चीनने सरकारशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. चीनने तांबे खाणकाम आणि तेलाचे साठे पुन्हा सुरू करण्यासाठी अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. सोबतच बाग्राम हवाई तळावरही चीनी सैन्याची हालचाल वाढली आहे. त्यामुळेच ट्रम्प यांनी बाग्राम ताब्यात घेणार असे जाहीर केल्यावर सर्वप्रथम चीनकडून या वक्तव्याचा निषेध कऱण्यात आला. (Bagram Airbase)

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी, अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याचा, सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करतो. अफगाणिस्तानचे भविष्य अफगाण लोकांच्या हातात असले पाहिजे, अन्य कुठल्याही देशाच्या लष्कराचे या भूमीवर नियंत्रण मान्य नसल्याचे सांगितले आहे. सोबतच तालिबान सरकारने ट्रम्पची मागणी नाकारली असून त्यांच्या भूभागावर अमेरिकन सैन्याची उपस्थिती कधीही सहन केली जाणार नाही, असे सांगितले आहे. वास्तविक बायडेन सरकारनं बाग्राम हवाई तळ सोडण्याचा निर्णय घेतल्यावर ट्रम्प यांनी टिका केली होती. आपण अध्यक्ष असतो, तर कधीही बाग्रामचा ताबा सोडला नसता, असे त्यांनी सांगितले होते. अध्यक्ष झाल्यावरही ट्रम्प यांनी बाग्रामचा ताबा पुन्हा घेणार असे सांगितले होते. आता ट्रम्प यांनी आपल्या निर्णयावर वाटचाल सुरु केली आहे. (International News)

अमेरिकेच्या माजी लष्करी अधिका-यानुसार बाग्राम हवाई तळाचा पुन्हा ताबा मिळवण्यासाठी अमेरिकेला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. 10 हजाराहून अधिक सैन्याची यासाठी गरज लागणार आहे. अफगाणिस्तानवरील दुसऱ्या हल्ल्यासारखी ही घटना असणार आहे. शिवाय या हवाई तळाची सुरक्षा देखील एक आव्हान असणार आहे, इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा सारख्या दहशतवादी गटांपासून बाग्रामचे संरक्षण करावे लागणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. आता ट्रम्प यांचे पुढचे पाऊल काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ट्रम्प यांनी लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर जगात आणखी एक युद्ध सुरु होण्याची शक्यता आहे. (Bagram Airbase)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.