Home » Donald Trump : अमेरिकेतले कार्यालये आता फक्त झुरळांचे निवासस्थान !

Donald Trump : अमेरिकेतले कार्यालये आता फक्त झुरळांचे निवासस्थान !

by Team Gajawaja
0 comment
Donald Trump
Share

जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांच्या अग्रस्थानी असलेल्या नासाच्या कामगिरीकडे जगभरातील जनतेचे लक्ष लागले आहे. गेल्या आठ महिन्यापासून अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळात अडकल्या होत्या. त्यांना पृथ्वीवर सुखरुप आणण्यासाठी नासानं मोहीम सुरु केली. यासाठी नासासोबत एलॉन मस्कच्या स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगनचाही सहभाग आहे. एकीकडे नासाच्या कार्याचा गौरव होत असतांना, नासा मुख्यालयाची छायाचित्रे जगासमोर आली आहेत. यात तुटलेल्या खुर्च्या, कार्यालयात फिरणारी झुरळं आणि सर्वत्र पसरलेली धूळ असे चित्र आहे. (Donald Trump)

जगभरातील अंतराळ प्रेमींसाठी आदर्श असलेल्या नासा मुख्यालयाची ही अवस्था बघून धक्का बसला. मात्र हे वास्तव आहे. कोरोनामध्ये जगभरात वर्क फ्रॉम होम, ही संस्कृती वाढली. नासामध्येही त्याचा फैलाव झाला. ज्यांना शक्य आहे, त्यांनी घरी बसून काम करायला सुरुवात केली. एप्रिल 2020 पासून या कार्यालयात ज्यांना शक्य आहे, त्यांनी वर्क फ्रॉम होम करायला सुरुवात केली आणि कार्यालये ओस पडली. आता जगभर पुन्हा कार्यालयात जाऊन कर्मचारी कामकाज करत असले तरी अमेरिकन नागरिकांच्या ही वर्क फ्रॉम होम संस्कृती चांगलीच अंगवळणी पडली. त्यामुळे त्यांनी घरी बसूनच काम करणे पसंत केले. नासासह यामध्ये अनेक सरकारी कार्यालयातील कर्मचा-या समावेश आहे. (International News)

मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आणि या कर्मचा-यांचे दिवस फिरले. त्यांनी वर्क फ्रॉम होम करणा-या कर्मचा-यांनी 20 जानेवारीपर्यंत मदत दिली होती. त्यामुळे अनेक सरकारी कर्मचारी आता कार्यालयांमध्ये परत येत आहेत. पण एकेकाळी सर्व सुविधांनी संपन्न असलेली ही कार्यालये आता फक्त झुरळांचे निवासस्थान झाल्याचे त्यांच्या लक्षात येत आहे. चक्क नासाच्या मुख्यालयात झुरळांचा वावर वाढला असून येथील कर्मचा-यांच्या खुर्च्याही झुरळांनी भरलेल्या आहेत. त्यामुळे साडेचार-पाच वर्षांनी परत आलेले हे कर्मचारी खाली बसून आपले कामकाज करतांना दिसत आहेत. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच नासाच्या उज्ज्वल कामगिरीकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परत येणार आहे. त्यामुळे नासामध्ये मोठा समारंभ होणार असल्याची माहिती आहे. (Donald Trump)

पण त्यासोबत नासाचे काही फोटो सोशल मिडियामध्ये व्हायरल होत आहेत. त्यात चक्क नासाचे मुख्यालय हे झुरळांचा अड्डा झाल्याचे दिसत आहे. नासाच्या मुख्यालयात झुरळांचा मुक्तपणे वावर असून त्यामुळे येथे काम करणारे कर्मचारी हैराण झाले आहेत. याला कारण ठरले आहे, वर्क ऑफ होम ही संस्कृती. कोरोनामध्ये वर्क फ्रॉम होम करण्याचे फर्मान काढण्यात आले. यात नासामधील कर्मचारीही घरी बसून काम करत होते. नासाचे शास्त्रज्ञ जरी या कठिण कार्यकाळात नासामध्ये येत असले तरी त्या व्यतिरिक्त अन्य विभागांचे कर्मचारी घरी बसून आपले कामकाज सांभाळत होते. अमेरिकेतच काय पण जगभरातच तेव्हा अशीच अवस्था होती. मात्र कोरोनाची साथ कमी झाल्यावर कर्मचा-यांना पुन्हा कार्यालयात रुजू होण्याचे आदेश दिले. पण आश्चर्य वाटेल यात नासामधील कर्मचा-यांचा समावेश नव्हता. यासह अमेरिकेच्या अन्यही सरकारी कार्यालयातील कर्मचारी घरी बसून काम करत होते. (International News)

==============

हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट

Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !

===============

या सर्व कर्मचा-यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी तंबी देत, कार्यालयात दाखल व्हा, अन्यथा राजीनामा द्या, अशा आशयाचा आदेश दिला. त्यामुळे हे कर्मचारी कार्यालयात यायला सुरुवात झाली आहे. मात्र त्यांच्या स्वागताला कार्यालयात फक्त झुरळांची उपस्थिती होती. शिवाय नासाच्या मुख्यालयातील टॉयलेटची अवस्थाही खराब झाल्याचे आढळून आले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धाकानं हे कर्मचारी कार्यालयात परत आले असले तरी त्यांना बसण्यासाठीही आता टेबले इथे नाहीत. नासाच्याच मुख्यालयाची ही अवस्था असली तरी अमेरिकेतील अन्यही सरकारी कार्यालयात अशीच अवस्था आहे. येथील सरकारी कार्यांलयांची कोरोनानंतर दुरावस्था झाली आहे. कार्यालयात पुरेसे टेबल उपलब्ध नाहीत. 23 लाखांहून अधिक कर्मचारी आता कामावर परतले आहेत. या कर्मचा-यांना आता इंटरनेट खंडित होणे, पार्किंगची समस्या, बसण्यासाठी जागेचा अभाव अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामध्ये नासातील कर्मचा-यांचाही समावेश आहे. (Donald Trump)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.