Home » ६२ वर्षांपूर्वी आंतराळात का पाठवण्यात आला होता चिम्पँजी?

६२ वर्षांपूर्वी आंतराळात का पाठवण्यात आला होता चिम्पँजी?

by Team Gajawaja
0 comment
America first space monkey
Share

३१ जानेवारी १९६१ ही तिच तारीख आहे जेव्हा अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच माकडांच्या प्रजातिंमधील चिम्पँजी याला आंतराळात पाठवण्यात आले होते. त्या चिम्पँजीचे नाव हॅम असे होते. तो आंतराळात जाणारा पहिला जनावर होता. हॅमला कॅमरुच्या जंगलातून आणण्यात आले होते. येथून त्याला फ्लोरिडात नेण्यात आले. त्याला मियामी रेयर बर्ड फर्म मध्ये सुरक्षित ठेवल्यानंतर आंतराळात पाठवण्याची तयारी सुरु करण्यात आली होती. अमेरिकेच्या आंतराळ वैज्ञानिकांनी त्या मिशनला प्रोजेक्ट मरकरी असे नाव दिले होते.(America first space monkey)

१९५९ मध्ये हॅमला ट्रेनिंग देण्यासाठी चक्क एअफोर्सच्या तळावर पाठवण्यात आले होते. वैज्ञानिकांनी काही महिन्यांपर्यंत हॅमला ट्रेनिंग दिली. यामध्ये कॅप्सूल मध्ये ताण न घेणे, लीवर खोलणे-बंद करणे आणि भुक लागल्यानंतर फ्लेवरच्या गोळ्या खाणे अशा काही गोष्टी त्याला शिकवल्या गेल्या होत्या. वैज्ञानिकांना त्याला ट्रेनिंग देणे आव्हानात्मक होते. या मिशनसाठी हॅमला एक कोड नेम #65 असे दिले होते. ट्रेनिंग नंतरच त्याला आंतराळात पाठवण्यासाठी तयार केले गेले. वैज्ञानिकांनी आंतराळात पाठवण्यासाठी चिम्पँजीला निवडण्यामागे खास कारण होते. त्यांना हे जाणून घ्यायचे होते की, आंतराळात व्यक्तीला कशाप्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो.

America first space monkey
America first space monkey

हॅमला निवडण्यामागे वैज्ञानिकांचे असे म्हणणे होते की, चिम्पँजी यांची शारिरीक रचना ही एका व्यक्तीसारखीच असते. त्यामुळे आंतराळातील मिशनसाठी चिम्पँजीला पाठवले गेले. प्रोजेक्ट मरकरी (MR-2) अंतर्गत पाठवले गेले. लॉन्च पॅड फ्लोरिडाच्या टापूवर उभारले गेले होते. हॅमला एका कॅप्सूलमध्ये बसवून आंतराळात पाठवले गेले. उड्डाण केल्यानंतर १६.३० मिनिटानंतर तो आंतराळात पोहचला होता.

रिपोर्ट्सनुसार, हॅमला कॅप्सूल ५८०० किमीवेगाने १५७ किमी उंचीवर पोहचला होता. जेव्हा पृथ्वीतलावर आलेले कॅप्सूल १३०किमी दूरवर अटलांटिक महासागरात पडले. हॅमला वाचवण्यासाठी एक जहाज ही पाठवले गेले. ते कॅप्सुल काढल्यानंतर १९६३ मध्ये वॉशिंग्टन्या नॅशनल झू मध्ये त्याला ठेवले गेले. त्यानंतर त्याला नॉर्थ कॅरोलिनातील झू मध्ये पाठवले गेले.(America first space monkey)

हे देखील वाचा- नाणी किंवा नोटा नव्हे तर दगडाच्या करंसिने येथील लोक व्यवहार करतात

एका वर्षानंतर १८ जानेवारीला त्याचे निधन झाले. हॅमवर करण्यात आलेला प्रयोग यशस्वी झाला. यामुळे वैज्ञानिकांना काही गोष्टी कळल्या. जसे की, व्यक्तीला आंतराळात पाठवण्यासाठी किती तयारी करणे गरजेचे आहे. या प्रयोगानंतर व्यक्तीला आंतराळात पाठवले गेले. जेव्हा चिम्पँजी पृथ्वीतलावर परत आला तेव्हा त्याचे नाव हॅम ठेवले गेले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.