Home » अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष कोण?

अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष कोण?

by Team Gajawaja
0 comment
Kamala Harris VS Donald Trump
Share

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा प्रचार एकदम जोरदार चालला आहे. वेगवेगळ्या पक्षाचे बडे नेते मतदारसंघात जाऊन जाऊन आपल्या उमेदवारांसाठी मत गोळा करण्याचं काम करत आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेत राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुका आज संपतील आणि येत्या काही दिवसांत त्याचा निकाल लागेल. तज्ञांच्या मते अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालाचा संपूर्ण जगावरच परिणाम होईल. या निवडणुकीत एकीकडे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मैदानात आहेत, तर दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाकडून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या निवडणूक लढवत आहेत. याआधी डेमोक्रॅटिक पक्षाकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन उमेदवार होते. पण आरोग्याच्या समस्येमुळे त्यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण आता जे २ उमेदवार रणांगणात आहेत. त्यांच्या विजयामुळे भारतावर त्याचा काय परिणाम होईल अमेरिकेत इलेक्शनची प्रक्रिया काय आहे. हे जाणून घेऊया. (Kamala Harris VS Donald Trump)

अमेरिकेत निवडणुकांमध्ये फक्त EVM मशीनचाच नाही, तर बॅलेट पेपरचा सुद्धा वापर केला जातो. अमेरिकेत बहुतांश लोकं EVM पेक्षा बॅलेट पेपरचा वापर करूनच मतदान करण्याला पसंती देतात. कारण मशीनला सहज हॅक केलं जाऊ शकतं. पण पेपरला हॅक केल जाऊ शकत नाही या विश्वासमुळेच मतदान करण्यासाठी अमेरिकेत बॅलेट पेपरचा जास्त वापर होतो. यावर्षी अमेरिकेत ९८ टक्के लोक मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर करणार आहेत. भारतात मतदानाच्या ३६ ते ४८ तासांआधी उमेदवाराला प्रचार स्वत:चा प्रचार थांबवावा लागतो. तेच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या अंतिम टप्प्यात मतदानाच्या मुख्य तारखेच्या आधीच मतदान सुरु होतं. भारताच्या पोस्टल बॅलेट प्रक्रियेसारखं हे मतदान असतं. म्हणजे पत्राद्वारे मतदान करता येतं. भारतात विशिष्ट लोकांचा अशाप्रकारे मतदान करण्याचा अधिकार दिला जातो. मुख्य तारखेच्या आधी होणाऱ्या वोटिंग प्रक्रियेला अर्ली-वोटिंग म्हटलं जातं. (International News)

जसं भारतात खासदारांंच्या संख्येवर सत्ता स्थापन होते. तसे अमेरिकेत Electors च्या संख्येवर सत्ता स्थापन होते. अमेरिकेत 50 राज्यांमध्ये एकूण 538 इलेक्टोरल कॉलेज वोट आहेत. कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी २७० किंवा त्याहून अधिक Electors आवश्यक असतात. अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये स्विंग स्टेट्सला महत्त्व असतं. स्विंग स्टेट्सला सोप्या भाषेत समजवायचं झालं, तर काही ठरविक मतदारसंघ हे पांपरिकरित्या एकाच पक्षाला मतदान करतात. अशा मतदार संघांचा निवडणूक निकालावर जास्त परिणाम होतं नाही. पण काही मतदारसंघ असे असतात ज्यांच मत नेहमी वेगवेगळ्या पक्षाला असतं. अशाच मतदारसंघाला स्विंग स्टेट म्हणतात. (Kamala Harris VS Donald Trumps)

त्यामुळे दोन्ही पक्षांकडून प्रामुख्यानं स्विंग स्टेट्सवर लक्ष केंद्रीत केलं जातं. कारण निवडणुकीत कुणाचं पारडं जड असणार, हे या ठिकाणचे मतदारच ठरवत असतात. अमेरिकेत सध्या सहा स्विंग स्टेट्स आहेत. विस्कांसिन, नेवाडा, मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना, अ‍ॅरिझोना आणि पेन्सिल्व्हेनिया. याच राज्याचे मतदार ठरवणार अमेरिकेचा पुढचा राष्ट्रध्यक्ष कोण होणार. भारत आणि अमेरिकेच्या संबंधांचा विचार केला, तर गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेशी भारताचे संबंध अधिक दृढ आणि सशक्त झाले आहेत. जो बायडन यांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांचे संबंध आणखी मजबूत झाले आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगली मैत्री आहे. त्यामुळे दोन्हींपैकी कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला तर त्याचा भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम होणार नाही ते पूर्वीप्रमाणेच राहतील. (International News)

अमेरिकेच सध्याचा परराष्ट्र धोरण पहिलं तर अमेरिकेने युक्रेन आणि इस्रायल दोघांनीही सार्वभौमत्व, लोकशाही आणि दहशतवादविरोधी लढाईसाठी मजबूत पाठिंबा दिला आहे. शियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे अमेरिकेने रशियाविरुद्ध कडक आर्थिक निर्बंध लागू केले होते. पण भारत हा कायम भक्कमपणे रशियाच्या बाजूनेच उभा राहिला आहे. त्यामुळे जो बायडनच्या सरकारला तरी हे मान्य नव्हतं. ट्रम्पचं सुद्धा याबाबत काही वेगळं मत नसेल. चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या दरम्यान मोठा व्यापार आहे. पण चीनने व्यापार धोरणांतून अपारदर्शक पद्धती वापरल्याचे आरोप अमेरिकेने केले होते. (Kamala Harris VS Donald Trump)

अमेरिकेची परराष्ट्र धोरण आणि आशिया-प्रशांत क्षेत्रातील धोरणांचा भारतावर मोठा परिणाम होतो. चीनच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिकेचे धोरणात्मक सहकार्य महत्त्वाचे असू शकते. निवडणुकीनंतर नवा अमेरिकन अध्यक्ष या क्षेत्रात कोणती धोरणे घेतो, त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होऊ शकतो. लोकांच्या मते, कमला हॅरिस राष्ट्राध्यक्ष बनल्या तर बायडन यांचं सध्याचं परराष्ट्र धोरण कायम राहू शकतं. डोनाल्ड ट्रम्पहे स्वत:च्या मनानुसार वागणारे नेते आहेत. गेल्या वेळी ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी हार्ले डेवीडसनचा एक मोठा मुद्दा बनवला होता. भारत सरकारने हार्ले डेवीडसन कंपनीवर लावलेल्या करावरून, “ भारत हा सर्वात जास्त कर घेणारा देश आहे.” अशी टीका त्यांनी केली होती. (International News)

======

हे देखील वाचा : अमेरिकेत दिवाळीनंतर कोण साजरी करणार दिवाळी !

====

हा मुद्दा सोडला तर भारताचे आजवर जे काही मोठे ऐतिहासिक करार झाले आहेत ते रिपब्लिकन पक्षाच्या प्रशासन काळात झाले आहेत.डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रध्याक्ष झाले तर हे सुद्धा भारतासाठी फायद्याचं ठरू शकतं. पण ट्रम्पयांच्या स्थलांतरितांबाबत खूप कठोर धोरण आहे. याच कठोर धोरणामुळे भारतालाही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कमला हॅरिस आणि त्यांच्या डेमोक्रॅट पक्षाची धोरणं मानवाधिकार, धार्मिक स्वातंत्र्य आणि नैतिक मुद्द्यांवर इतर देशांना आरोप करणारी राहिली आहेत. त्यामुळे ते स्थलांतरितांबाबत खूप कठोर धोरण आखणार नाहीत. आता या सगळ्या परिस्थितीवरून तुम्हाला काय वाटतं अमेरिकेचा पूढील राष्ट्रध्यक्ष कोण असेल. डोनाल्ड ट्रम्प की भारतीय वंशाच्या कमला हॅरिस. (Kamala Harris VS Donald Trump)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.