अमेरिकेमध्ये गेल्या काही महिन्यात विमान अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याला प्रमुख कारण ठरले आहे, ते येथील एअर ट्रॅफीक कंट्रोलवर वाढत असलेल्या ताणाचे. अमेरिकेमध्ये खाजगी विमानांची संख्या मोठी आहे. शिवाय तेथील अंतर्गत वाहतूकही विमानांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत तेथील सर्वच विमानतळे ही चोवीस तास व्यस्त असतात. (America)
त्यातच फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन विभागात कर्मचा-यांची कमतरता आहे. हवाई वाहतूक नियंत्रक हे मोठे जबाबदारीचे पद आहे. एफएएकडे सध्या 10 हजार विमान वाहतूक नियंत्रक असले तरी प्रत्यक्षात अमेरिकेला 14 हजाराहून अधिक विमान वाहतूक नियंत्रकांची गरज आहे. शिवाय अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने संघीय संस्थांमध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका अमेरिकन फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन विभागाला बसला आहे. यामध्ये आधीच वाहतूक नियंत्रकांची संख्या कमी होती, ती अजून कमी कऱण्यात आली आहे. त्यामुळे त्या कर्मचा-यांवर कामाचा ताण वाढला आहे. परिणामी अमेरिकेत विमान अपघातांचे प्रमाण वाढल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (International News)
अमेरिकेत विमान अपघातांची संख्या वाढली आहे. जवळपास रोज एखाद्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी येत आहे. काही अपघातांमध्ये स्पष्ट झाले आहे की, हवामान हे ढगाळ किंवा विमान उड्डानासाठी योग्य नसतांनाही विमानाचे उड्डान झाल्यानं अपघात झाले आहेत. याला कारण ठरत आहे, ते अमेरिकेतील फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन विभागातील कर्मचा-यांची कमतरता. (America)
यासंदर्भात राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळानं आता चौकशी सुरु केल्यावर विमान नियंत्रकांची कमतरता आणि त्यांच्यावर असलेला ताण यामुळे अपघात घडत असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनाच्या खर्च कपातीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून हवाई सुरक्षेत मदत करण्यासाठी जबाबदार असलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्याचा परिणाम अमेरिकेतील विमान वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. विमान वाहतूक सुरळीत असण्यामागे विमान नियंत्रकांची भूमिका महत्त्वाची असते. याच विमान नियंत्रकांच्या कमतरतेमुळे अमेरिकेत बहुधा रोजच विमानांचे अपघात होत आहेत. अमेरिकेच्या हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेवर खूप जास्त भार आला आहे. अमेरिकन फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन विभागाकडे सध्या 10,800 प्रमाणित नियंत्रक आहेत. मात्र जवळपास 15,000 हजार विमान नियंत्रकांची सध्या गरज आहे. ही कमी दूर केल्याशिवाय विमान वाहतूक सुरक्षित असणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. (International News)
मात्र ट्रम्प प्रशासनानं आता कुठल्याही सरकारी विभागात भरती बंद असल्याचे जाहीर केल्यामुळे ही तुट भरुन काढणे सध्यातरी शक्य होणार नाही. त्यामुळे त्या कर्मचा-यांवर कामाचा ताण अधिक वाढणार आहे. अमेरिकेत खाजगी विमानांची संख्या मोठी असून अलिकडे झालेले अपघात हे खाजगी विमानांचेच अधिक आहेत. अनेक विमानांच्या उड्डानालाही विलंब होत आहे, तर काही उड्डानेही रद्द करण्यात येत आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी एफएएने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अमेरिकेत 20 हजाराच्या आसपास विमानतळ असल्याचे सांगण्यात येते. यात खाजगी विमानतळांचाही समावेश आहे. यापैकी 5217 विमानतळ ही सार्वजनिक वापरासाठी खुली आहेत. तर यापैकी 503 विमानतळ हे व्यावसायिक उड्डाणांसाठी चालवली जातात. 102 विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. ही विमानतळ जगभरातील देशांबरोबर जोडलेली आहेत. येथे चोवीस तास विमानांची ये-जा चालू असते. ब-याचवेळा अनेक विमानांना हवेतच प्रतीक्षा करावी लागते, इतकी ही विमानतळ व्यस्त असतात. (America)
=========
हे देखील वाचा : Pamban Bridge : जाणून घ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजची वैशिष्ट्ये
Donald Trump : रक्ताचा बदला घेणार ट्रम्प यांना धोका वाढला !
==========
शिवाय खाजगी विमानतळांचा होणारा वापरही अमेरिकन विमान नियंत्रक कक्षांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ब-याचवेळा येथून उड्डान करणारी विमाने ही वाहतूक निरक्षक कक्षाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेत अंदाजे 14,632 खाजगी विमाने आहेत. अर्थात हे प्रमाण जगभरातील खाजगी विमानांच्या तुलनेत 60 टक्के आहे. यावरुनच येथे खाजगी विमानांची वाहतूक किती मोठी आहे, याचा अंदाज येतो. वाढत्या विमानांच्या अपघातांमुळे आता संबंधित विभाग या खाजगी विमानांची चौकशी कऱण्याच्या विचारात आहेत. शिवाय काही विमानांची नोंदणी न झाल्याचाही संशय आहे, अशा सर्वच खाजगी विमानांची नोंदणी करत त्यांच्यासाठी वेगळी वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि नियम करण्याची मागणी करण्यात येत आहे. (International News)
सई बने