Home » त्याचा दोष काय ?

त्याचा दोष काय ?

by Team Gajawaja
0 comment
Ambuj Sharma
Share

आपल्या शेजारी असलेल्या बांगलादेशमध्ये सध्या जे चाललं आहे, ते पाहून कुठल्याही भारतीयाचा संताप झाल्याशिवाय राहत नाही. बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर खुलेआम हल्ला होत आहे. शिवाय हिंदू नागरिकांना पकडून त्यांना मारहाण करण्यात येत आहे. तेथील कट्टरवादी संघटना जाहीरपणे हिंदूंचे गळे कापा असे आवाहन करतांना दिसत आहेत. या सर्वांचे येणारे व्हिडिओ पाहून चिड व्यक्त होत आहे. बांगलादेशच्या प्रगतीसाठी झडणा-या हिंदूंना तेथील कट्टरपंथीयांच्या मुजोरपणामुळे स्वतःची मालमत्ता गमवावी लागली आहे. अनेक घरातील महिला, मुलींवर अत्याचार झाले आहेत. तर अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशाच एका तरुण व्यापा-याच्या मृत्यूचा व्हिडिओ सध्या येत आहे. बांगलादेशातील या तरुण उद्योगपतींचे नाव अंबुज शर्मा आहे. (Ambuj Sharma)

बांगलादेशमधील कट्टरपंथी त्याला मारत असल्याचा हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही मनात त्याचा काय दोष हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहणार नाही. कपडे काढलेल्या अंबुज शर्मा यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असून ते आपल्या मारेक-यांकडे आपल्याला सोडा, अशी विनंती करतांना दिसत आहेत. अंबुज शर्मा हे बांगलादेशातील हे उद्योगपती होते. त्यांच्या कापडाच्या व्यवसायातून त्यांनी अनेक बांगलादेशातील नागरिकांना नोकरी दिली आहे. त्यात मुस्लिम बांगलदेशींचाही मोठ्या संख्येनं समावेश आहे. पण बांगलादेशमध्ये दंगे चालू झाल्यावर याच मुस्लिम नोकरदारांनी अंबुज शर्मा यांचा कारखाना लुटला आणि त्यांना अत्यंत निघृणपणे मारुन टाकले. आता अंबुज शर्मा यांचा व्हिडिओ सर्वत्र शेअर होतांना त्यांच्यासारख्या किती होतकरु तरुणांची या कट्टरपंथीयांकडून हत्या करण्यात येणार आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. बांगलादेश हा तेथील हिंदू जनतेसाठी नरक ठरत आहे. (International News)

रोज तिथून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. या सर्वात बांगलादेशातील एक प्रमुख हिंदू व्यापारी अंबुज शर्मा यांच्या हत्येची आलेली बातमी आणि दृश्य मन हेलावून टाकणारी आहेत. अंबुज शर्मा यांना केवळ त्यांच्या धर्मामुळे मारण्यात आले. पण ज्यांना अंबुज शर्मा यांनी नोकरीची संधी दिली, त्यानीच त्यांना क्रूरपणे मारले, ही अत्यंत क्लेशकारक गोष्ट आहे. बांगलादेशातील हिंदू व्यापारी अंबुज शर्मा यांचा मोठा कपड्यंचा कारखाना होता. तसेच अलिशान घरही होते. या कपड्याच्या कारखान्यात 200 बांगलादेशी काम करत होते. यामध्ये मुस्लिमांची संख्या अधिक होती. मात्र बांगलादेशमध्ये दंगे सुरु झाल्यावर या अंबुज शर्मा यांचे घर लुटण्यात आले तसेच कारखानाही लुटण्यात आला. अंबुज शर्मा यांनी अनेक सामाजिक उपक्रमही राबवले होते. समाजात मानाचे स्थान असलेल्या या हिंदू व्यापा-याचा मृत्यू रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात झाला. बांगलादेशात आता हिंदूंवर होणारे हल्ले ही नित्याची घटना झाली आहे. इस्कॉनचे सचिव चिन्मय प्रभू यांनाही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. (Ambuj Sharma)

=======

हे देखील वाचा :  बायकोला वाचवण्यासाठी मार्शल लॉ !

========

चिन्मय प्रभू यांना तुरुंगात अन्नपाणीही दिले जात नसल्याची बातमी आहे. शिवाय इस्कॉन ही धार्मिक कट्टरतावादी संघटना असून त्यावर बंदी घालावी अशी मागनी न्यायालयात करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूवरील अत्याचारासाठी चिन्मय प्रभू यांनी आंदोलन उभे केले होते. त्यांनी सनातन जागरण मंचची स्थापना करुन चितगाव आणि रंगपूरमध्ये अनेक सभा केल्या होत्या. या सर्व घटना देशाच्या विरोधी असल्याचा ठपका ठेवत आता बांगलादेश सरकारनं चिन्मय प्रभू यांना तुरुंगात टाकले आहे. त्यांच्या अटकेचा विरोध करणा-यांवर बांगलादेशी पोलीसांनी मोठ्याप्रमाणात लाठीहल्ला केला आहे. तसेच हिंदू वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात छापे मारुन हिंदू तरुणांना अटक करण्यात येत आहे. चिंतेची गोष्ट अशी की, पोलिसांसोबतच कट्टरवादी संघटनांचे तरुणही हिंदू वस्त्यांमध्ये फिरुन दहशत पसरवत आहेत. हे लोक हिंदूंच्या घरांवर खुणा करून पोलिसांना येथे छापा मारा, असे सांगत आहेत. चितगाव येथे या घटना मोठ्याप्रमाणात होत असून एकट्या दुकट्या असणा-या हिंदूंना जाहीरपणे मारण्यात येत आहे. ही सर्व परिस्थिती अती चिंताजनक असून वर्षानुवर्ष ज्या देशाच्या प्रगतीसाठी आम्ही झटत राहिलो, तिथेच आमची संपत्ती लुटली जात आहे, आम्हाला मारण्याची धमकी दिली जात आहे, आणि यात पोलीस काहीही कारवाई करत नसल्याचे हतबल हिंदू सांगत आहेत. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.