Home » जगातील सर्वात मोठे बर्फाचे शिवलिंग अमरनाथमधले नसून, ते आहे ऑस्ट्रियामध्ये…

जगातील सर्वात मोठे बर्फाचे शिवलिंग अमरनाथमधले नसून, ते आहे ऑस्ट्रियामध्ये…

by Team Gajawaja
0 comment
Shiva Linga in Austria
Share

अमरनाथ यात्रा करण्याचे स्वप्न तमाम शिवभक्तांचे असते. बाबा अमरनाथांचे नाव घेत अवघड असलेला रस्ता पार करत दरवर्षी लाखो भक्त बाबा अमरनाथांच्या नैसर्गिक शिवलिंगाचे दर्शन घेतात. अमरनाथ हे हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. काश्मीरमध्ये असलेल्या अमरनाथ बाबांच्या गुहेतील बर्फाचे नैसर्गिक शिवलिंग तमाम शिवभक्तांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे अत्यंत कठिण असलेली ही अमरनाथ यात्रा कितीही अडथळे आली तरी शिवभक्त भक्तीनं पार पाडतात. (Shiva Linga in Austria)


मात्र आता अमरनाथ शिवलिंगासारखे एक आणखी शिवलिंग अन्यत्र असल्याची माहिती मिळाली आहे. हे शिवलिंग ऑस्ट्रियामध्ये (Shiva Linga in Austria) असून अमरनाथ शिवलिंगापेक्षा या शिवलिंगाचा आकार मोठा आहे. विशेष म्हणजे हे शिवलिंगही बर्फाचे असून ते निसर्ग निर्मित आहे. या शिवलिंगाला बघण्यासाठी आणि त्याचे दर्शन करण्यासाठी ऑस्ट्रियाच्या साल्झबर्ग शहराजवळ शिवभक्तांची गर्दी होते. आणि हो…ही यात्राही अमरनाथ यात्रेसारखीच कठीण मानण्यात येते.


शिवभक्त भगवान शंकराचे दर्शन कुठल्याही अडथळ्यावर मात करायला तयार असतात. ‘जय बाबा भोले…’ असा जयघोष करत हे भक्त शिवशंकराच्या आराधनेत मग्न होतात. या भक्तांसाठी अमरनाथ बाबांचे दर्शन हा एक उत्साहाचा आणि आपली श्रद्धा, भक्ती सफल झाल्याची जाणीव करुन देणारा क्षण असतो. पण बाबा अमरनाथांच्या शिवलिंगासारखे बर्फाचे शिवलिंग ऑस्ट्रियामध्येही असल्याचे उघड झाले आहे.
ऑस्ट्रियाच्या साल्झबर्ग शहराजवळ वेर्फेनमध्ये 40 किमी लांबीची बर्फाची गुहा आहे. या गुहेमध्ये सर्गिक शिवलिंगासारखी आकृती आहे. हे शिवलिंग अमरनाथच्या शिवलिंगापेक्षा कित्येक पट मोठे आहे. या गुहेमध्ये शिवलिंगापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी सुमारे एक किलोमीटरच्या पायऱ्या आहेत. या बर्फाच्या शिवलिंगाची उंची सुमारे 75 फूट आहे. (Shiva Linga in Austria)

====

हे देखील वाचा – अद्भुत, विलक्षण आणि इच्छापूर्ती करणारे मध्यप्रदेशातील शारदा देवी मंदिर


अमरानाथ बाबांच्या गुहेत जाणण्यासाठीची वाट खडतर आहे, तशीच या गुहेत जाण्यासाठीही भक्तांना मोठा खडतर मार्ग पार करावा लागतो. ही जगातील सर्वात लांब बर्फाची गुहा असल्याचे सांगण्यात येते. या गुहेचा शोध 1879 साली लागला. या गुहेमध्ये शिवलिंगासारखे दिसणारे अनेक आकार पाहायला मिळतात. या परिसरात गुहेला ‘हिमगुहा’ असे नाव देण्यात आले आहे.
(Shiva Linga in Austria)


ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांमध्ये ही ‘हिमगुहा’ खूप प्रसिद्ध आहे. ही ‘हिमगुहा’ मे ते ऑक्टोबर पर्यंत खुली असते. नंतर मात्र या भागात जाणेही शक्य होत नाही. मे पासून ही गुहा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली तरी तिथे बऱ्यापैकी थंड वातावरण असते. त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेऊनच या हिमगुहेत जावे लागते. मात्र ही गुहा नितांत सुंदर असून, त्यातील बर्फाचे नैसर्गिक शिवलिंग बघण्यासारखे असल्याची प्रतिक्रीया या गुहेला भेट दिलेल्या भाविकांनी दिली आहे. (Shiva Linga in Austria)


हा सर्व भाग स्थानिक सरकारकडून पर्यटनासाठी विकसीत करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. हा सर्वच परिसर अत्यंत सुंदर असल्याने दरवर्षी या भागात पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

  • सई बने

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.