Home » Amarnath Yatra : अमरनाथ गुहेचे आश्चर्यचकित करणारे रहस्य

Amarnath Yatra : अमरनाथ गुहेचे आश्चर्यचकित करणारे रहस्य

by Jyotsna Kulkarni
0 comment
Amarnath Yatra
Share

नुकतीच अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली. आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढे महत्व चारधाम यात्रेला आहे, तेवढेच महत्व अमरनाथ यात्रेला देखील प्राप्त आहे. बाबा बर्फानीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक जातात. भारतामध्ये शिवशंकराचे १२ ज्योतिर्लिंगांसोबतच इतर अनेक महत्वाची ठिकाणं आहेत. त्यातलेच एक मुख्य ठिकाण म्हणजे अमरनाथ. हिंदू धर्मात असलेल्या तीर्थयात्रांपैकी महत्वाची तीर्थयात्रा म्हणजे अमरनाथ यात्रा. हिंदू धर्मात अमरनाथ यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा अमरनाथ यात्रेला नुकतीच सुरुवात झाली आहे. अमरनाथ यात्रा ३ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत ही अमरनाथ यात्रा चालणार आहे. (Amarnath Yatra)

सनातन धर्मात अमरनाथ गुहेचे विशेष महत्त्व आहे. येथे घडणारे चमत्कार आजही लोकांना चकित करतात. दरवर्षी मोठ्या संख्येने महादेवाचे भक्त अमरनाथ शिवलिंगाच्या दर्शनासाठी लांब आणि खडतर प्रवास करतात. अमरनाथ गुहेत दरवर्षी १० ते १२ फूट उंचीचे बर्फाचे शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगरपासून जवळपास १३० किलोमीटरवर अमरनाथ गुहा आहे. ही गुहा ३८८८ मीटर उंचीवर असून, ही नैसर्गिकरित्या तयार झालेली बर्फाची रचना आहे. (Marathi News)

याला हिंदू धर्मात भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते. सांगितले जाते की शिवलिंगासारखी दिसणारी आकृती दररोज १५ दिवस थोडी थोडी वाढत जाते. या १५ दिवसांत या बर्फाच्या शिवलिंगाची उंची २ यार्डांपेक्षा जास्त होते. जेव्हा चंद्र कमी होण्यास सुरुवात होते तेव्हा या शिवलिंगाचा आकारही हळूहळू कमी होऊ लागतो आणि चंद्र अदृश्य होताच शिवलिंगही अदृश्य होते. म्हणजेच पौर्णिमा असते तेव्हा शिवलिंग पूर्ण आकारात असते. दुसरीकडे, अमावस्येच्या दिवशी शिवलिंगाचा आकार थोडा कमी होतो. (Todays Marathi HEadline)

Amarnath Yatra

अमरनाथ गुहेपर्यंत पोहचायला भक्तांना ४८ दिवसांचा अतिशय खडतर प्रवास करावा लागतो. या गुहेची लांबी १९ मीटर आणि रुंदी १६ मीटर आहे. वर्षभर ही गुहा प्रचंड बर्फामुळे झाकलेली असते. मात्र उन्हाळ्यात हा बर्फ वितळायला लागल्यावर काही काळ ही गुहा भाविकांसाठी खुली केली जाते. अमरनाथ यात्रा ही देशातील सर्वात कठीण आणि खडतर यात्रा समजली जाते. पुराणानुसार, असे सांगण्यात आले आहे की, अमरनाथ यात्रा केल्याने भक्ताला २३ तीर्थयात्रे करण्याइतके पुण्य मिळते. त्यामुळे देशभरातील भक्तगण या यात्रेत सहभागी होतात. (Top Marathi Headline)

अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाला ‘बाबा बर्फानी’ असे म्हटले जाते. हे शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार होते. दरवर्षी श्रावण महिन्यात हे शिवलिंग पूर्ण आकारात येते. पण, हे लिंग नैसर्गिकरित्या कसे तयार होते, हे रहस्य आजही कायम आहे. ज्‍या गुहेत बर्फापासून शिवलिंग तयार होते, त्‍या गुहेतील बर्फ मात्र कच्‍चा आहे. हा बर्फ हातात घेतले तरी विरघळतो. शिवलिंग ज्‍या बर्फापासून तयार होते तो बर्फ मात्र मजबुत असतो. (Top Trending News)

अमरनाथ गुहेचा शोध कोणी लावला?
एका माहितीनुसार अमरनाथ गुहेचा शोध बुट्टा मलिक नावाच्या मेंढपाळाने लावला असल्याचे सांगितले जाते. त्याबाबत एक कथा देखील सांगितली जाते. त्यानुसार मेंढ्या चरायला निघालेल्या बुट्टा मलिकला वाटेत एक साधू भेटले. या साधूने त्याला कोळशाची पिशवी दिली. घरी आल्यावर बुट्टाने ती पिशवी उघडून पाहताच कोळश्याचे रूपांतर सोन्याचे झालेले त्याला दिसले. यानंतर बुट्टा जेव्हा साधूच्या शोधात निघाला तेव्हा त्याला तेथे अमरनाथ गुहा दिसली. तेव्हापासून हे ठिकाण तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. (Latest Marathi News)

Amarnath Yatra

अमरनाथ गुहेची आख्यायिका
पुराणानुसार, भगवान शिवाने या गुहेत माता पार्वतीला अमरत्वाची कहाणी सांगितली होती, त्यामुळेच या गुहेला अमरनाथ हे नाव प्राप्त झाले असे सांगितले जाते. या आख्यायिकेनुसार, एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना त्यांच्या अमरत्वाचे कारण विचारले. तेव्हा शंकरानी त्यांना अमर कथा ऐकण्यास सांगितले. अमर कथा ऐकण्यासाठी पार्वती यांनी आशा जागेचा शोध सुरू केला. जिथे अमर होण्याचे रहस्य इतर कोणी ऐकू शकणार नाही. अशी जागा शोधत असताना त्या अमरनाथ गुहेत पोहोचल्या. अमरनाथ गुहेत पोहोचण्यापूर्वी भगवान शिव यांनी पहलगाममध्ये नंदी, चंदनवाडी येथे चंद्र, शेषनाग तलावाच्या काठी नाग, महागुण पर्वतावर गणेश, पंचतर्णीमध्ये पाच तत्वे यांना सोडले. (Top Stories)

=========

हे देखील वाचा : Tibetan Buddhist : दलाई लामांची निवड आणि स्वप्नातील संकेत !

==========

पार्वतीसोबत अमरनाथ गुहेत पोहोचल्यानंतर भगवान शिव यांनी समाधी घेतली. त्यानंतर त्यांनी कालाग्नीला गुहेभोवतीच्या सर्व सजीवांचा नाश करण्याचा आदेश दिला. जेणेकरून इतर कोणीही अमर कथा ऐकू नये. यानंतर शिव यांनी पार्वतीला अमरत्वाची कथा सांगितली. पण, यावेळी कबुतराच्या जोडीनेही ही कथा ऐकली आणि ते अमर झाले. आजही अनेक भाविक अमरनाथ गुहेत कबुतरांची जोडी पाहिल्याचा दावा करतात. इतक्या उंच आणि थंड परिसरात या कबुतरांचे जगणे आश्चर्यचकित करणारे आहे. अमरनाथ गुहेजवळ ऑक्सिजनचे प्रमाण जवळपास नगण्य असूनही ही कबुतरं इथे कशी राहतात? हा प्रश्न अनेकांना पडतो. येथे कबुतर पाहणे म्हणजे शिव-पार्वतीच्या दर्शनासारखे मानले जाते. (Social Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.