Alum Water Face Wash Benefits : त्वचेसाठी तुरटी अगदी फायदेशीर मानली जाते. तुरटीने चेहरा स्वच्छ धुतल्यास त्वचेवरील डाग, पिंपल्ससह सुरकुत्यांची समस्या दूर होते. तुरटीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुण असतात. यामुळे त्वचेसंबंधित काही समस्या दूर होण्यास मदत होते. सलूनमध्ये पुरुष मंडळींच्या चेहऱ्याचे शेविंग केल्यानंतर तुरटी लावली जाते. पण तुरटीच्या पाण्याने चेहरा धुतल्याने कोणते फायदे होतात हे माहितेय का? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
सुरकुत्यांच्या समस्येवर फायदेशीर
सुरकुत्यांची समस्या असल्यास तुरटीच्या पाण्याचा वापर करू शकता. यामुळे त्वचेवरील फाइन लाइन कमी करण्यासह स्किन घट्ट होण्यासही मदत होते.
पिंपल्सपासून मुक्तता
वारंवार पिंपल्स किंवा एक्नेची समस्या उद्भवत असल्यास तुरटीच्या पाण्याने चेहरा धुवा. यामध्ये असणाऱ्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे त्वचेवर होणारे इंफेक्शन दूर राहते. याशिवाय सूजेची समस्याही होत नाही.
तेलकट त्वचेसाठी फायदेशीर
तुरटीचा वापर तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वचेमधील अतिरिक्त तेल शोषून घेतले जाते. याशिवाय त्वचेवरील डेड स्किन सेल्सही दूर होतात. (Alum Water Face Wash Benefits)
रॅशेज आणि जळजळ
तुरटीच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेवर येणारे रॅशेज, खाजची समस्या सहज कमी होऊ शकते. यामध्ये अँटी-इन्फ्लेमेंटरी गुणधर्म असल्याने त्वचेला थंडावा मिळतो.
आणखी वाचा :