Home » त्वचेसाठी फायदेशीर ठरेल बदामाची साल, असा करा वापर

त्वचेसाठी फायदेशीर ठरेल बदामाची साल, असा करा वापर

by Team Gajawaja
0 comment
almond peel benefits
Share

Almond Peels Benefits बदामाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे शरिराला उर्जा मिळण्यासह त्वचेलाही फायदा होतो. बहुतांशजणांना बदाम सालीशिवाय खाण्याची सवय असते. यामुळे बदामाची साल फेकून दिल जाते. पण बदामाची साल त्वचेसाठी फायदेशीर ठरते हे माहितेय का? खरंतर, बदामाच्या सालीमध्ये काही नैसर्गिक तत्त्वे असतात जे त्वचेसंबंधित काही समस्या दूर करण्यास मदत करतात. बदामामध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन आणि मिनिरल्स असतात जे त्वचेला ग्लो आणि हेल्दी बनवण्यास मदत करतात. स्किन केअर रुटीनमध्ये नैसर्गिक वस्तूंचा वापर करायचा असल्यास तुम्ही बदामाची साल ट्राय करू शकता.

बदामाच्या सालीचे फायदे
त्वचेला डीप क्लिन करते
बदामाची साल स्क्रबच्या रुपात वापरली जाऊ शकते. यामुळे त्वचा डीप क्लिनसह डेड स्किन सेल्स हटवण्यास मदत होईल. यामुळे त्वचा ग्लोइंग आणि स्वच्छ दिसेल.

पिग्मेंटेशन आणि डार्क स्पॉट कमी होतील
पिग्मेंटेशन आणि डार्क स्पॉट्सच्या समस्येने त्रस्त असाल तर बदामाच्या सालीचा वापर करू शकता. या सालीमध्ये असणारे अँटीऑक्सिडेंट्स डार्क स्पॉट्स आणि पिग्मेंटेशनची समस्या कमी करण्यास मदत करेल. यामुळे त्वचेचा टोनही सुधारला जातो.

almond peel benefits

almond peel benefits

त्वचेला ग्लो येईल
आजकाल हेल्दी आणि ग्लोइंग त्वचेसाठी महिला महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. याचा कालांतराने त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्याएवजी बदामाच्या सालीचा वापर करू शकता. बदामाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेला पोषण देते.

=======================================================================================================

हेही वाचा : 

Banarasi Saree ओरिजनल बनारसी साडी ओळखण्याच्या सोप्या ट्रिक्स

Jeans योग्य जीन्स निवडण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

=======================================================================================================

बदामाच्या सालीचा असा करा वापर
स्क्रब तयार करा
बदामाची साल सुकवून त्याची पावडर तयार करा. यामध्ये मध आणि दही मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्क्रब प्रमाणे चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा.

फेस मास्क तयार करा
बदामाच्या साली बारीक वाटून त्यामध्ये एलोवेरा जेल आणि गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

टॅन हटवण्यासाठी
बदामाची पावडर तयार करुन त्यामध्ये लिंबूचा रस आणि बेसन मिक्स करा. टॅनिंग असणाऱ्या त्वचेवर पेस्ट लावून 10 मिनिटांनी स्वच्छ करा. (Almond Peels Benefits)

डार्क सर्कल्ससाठी फायदेशीर
बदामाची साल बारीक वाटून घेत त्यामध्ये दूध मिक्स करा. ही पेस्ट डोळ्यांखाली लावा. 10 मिनिटांनंतर थंड पाण्याने स्वच्छ करा. या उपायाने डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होईल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.