‘शार्क टॅंक इंडिया (Shark Tank India)’ हा जगातील ‘नंबर १ बिझनेस रियालिटी शो’ कालपासून सोनी एन्टरटेनमेन्ट टेलिव्हिजनवर चालू झाला आहे. या शोच्या माध्यमातून भारतामधील उद्योग जगतातील इकोसिस्टमला प्रोत्साहन आणि होतकरू व्यवसायिकांना एक नवा कोरा अनुभवही मिळणार आहे. या शोमधील ‘शार्क्स’ म्हणजे स्वकष्टाने पुढे आलेले नामवंत व्यावसायिक आहेत.
या क्रांतिकारी शोच्या माध्यमातून उगवत्या उद्योजकांना शोमधील शार्क्ससमोर आपल्या व्यवसायाची कल्पना सादर करून त्यांच्याकडून गुंतवणूक मिळवण्याची आणि व्यवसाय वाढवण्याची संधी मिळणार आहे. ‘शार्क्स’कडून गुंतवणूक मिळविण्यासाठी स्पर्धकांना आपल्या व्यवसायाची कल्पना त्यांच्यासमोर योग्य प्रकारे मांडून ती कशी उत्कृष्ट आहे, हे पटवून द्यायचे आव्हान पेलावे लागणार आहे.
या शोमधील ‘शार्क्स’ स्पर्धकाच्या व्यवसायाची कल्पना समजून घेतील, त्याचे मूल्यांकन करतील आणि योग्य वाटल्यास गुंतवणुकीची ऑफर देतील. “ज्याची असेल कल्पना बेस्ट, त्याच्यात करतील शार्क्स इन्व्हेस्ट”.
जरी तुमचा व्यवसाय करायचा विचार नसेल तरीही तुम्ही ‘शार्क टॅंक इंडिया’ आवर्जून बघायला हवा. कारण हा शो म्हणजे प्रेक्षकांसाठी ‘उद्योजकतेचा क्रॅश कोर्स’ असणार आहे.
शार्क टॅंकच्या भारतीय आवृत्तीमध्ये प्रेक्षकांना, “जिथे मोठमोठे सौदे होतात, तिथे बंद दरवाजांच्या मागे नक्की काय होते”, याबद्दलची माहिती मिळेल. मनोरंजनासोबत आणि व्यावसायिक ज्ञान व अनुभव यांचा संगम असणाऱ्या या शोचा प्रत्येक एपिसोड म्हणजे उद्योजकतेविषयीचे क्रॅश कोर्सच असतील.
यातून तुम्हाला गुंतवणूक करणे, पिचिंग करणे आणि उत्पादन विकसित करणे याविषयीची माहिती मिळेल. नियमितपणे काही एपिसोड बघितल्यानंतर व्यवसायातील काही युक्त्या प्रेक्षकांना व्यवस्थित समजू लागतील.
स्टार्ट-अप उद्योगातील दिग्गज शार्क्सच्या रूपात असणार
देशाच्या काना-कोपर्यातून आलेल्या तेजस्वी, होतकरू व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी शार्क्स सज्ज झाले आहेत. हे शार्क्स स्वतः यशस्वी उद्योजक आहेत.
शार्क टॅंक इंडिया (Shark Tank India) या शोच्या पहिल्यावहिल्या आवृत्तीमधील अत्यंत प्रतिभावंत शार्क्स असतील – अशनीर ग्रोव्हर (भारतपे चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक), विनीता सिंह (शुगर कॉस्मेटिक्सची CEO आणि सहसंस्थापक), पीयुष बन्सल (लेन्सकार्टचा संस्थापक आणि CEO), नमिता थापर (एमक्योर फार्मास्यूटिकल्सची कार्यकारी संचालक), अनुपम मित्तल (शादी.कॉम – पीपल ग्रुपचा संस्थापक आणि सीईओ), गझल अलग (ममाअर्थची सह-संस्थापक आणि मुख्य ममा) आणि अमन गुप्ता (बोट कंपनीचा सह-संस्थापक आणि मुख्य मार्केटिंग अधिकारी).
शार्क टॅंक इंडियाचा पहिला होस्ट
या शो मधील शार्क्स भारतातील उद्योजकीय इकोसिस्टम विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, तर धडाडीचा अभिनेता आणि तरुणांचा लाडका रणविजय सिंह या शोच्या पहिल्यावहिल्या आवृत्तीचा होस्ट असणार आहे.
अरे बापरे! जगातील सर्वात लहान सिरीयल किलर आहे अवघ्या आठ वर्षाचा…
‘न तळलेले, न बेक केलेले’ पॉप्ड पोटॅटो चिप्स, पौष्टिक आणि प्रिझर्व्हेटिव्ह-मुक्त, अस्सल दार्जिलिंग मोमोज, उन्हात वाळवलेली लोणची, EV बाईक्स, इत्यादी अनेक प्रकारच्या बिझनेस आयडीयाज यामध्ये बघायला मिळतील. न जाणो तुम्हालाही यामधून एखादी चांगली व्यवसाय कल्पना सुचेल आणि ध्यानी मनी नसताना अचानक एखाद्या दिवशी तुम्हीही या शो मध्ये ‘शार्क्स’ समोर आपल्या व्यवसायाची कल्पना मांडून त्यांच्याकडून गुंतवणुकीची एखादी चांगली ऑफर मिळवताना दिसाल.
हे सुद्धा वाचा: ‘आयपीएल (IPL)’ मध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा ‘हा’ खेळाडू वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी क्रिकेट मधून बाहेर पडला होता
हा शो २० डिसेंबरपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९:०० वाजता, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे. शार्क टॅंक इंडियाच्या जगात उडी मारून स्वप्न सत्यात उतरताना बघा!