उत्तरप्रदेशमधील अलीगढ मुस्लिम विद्यापीठ सध्या वादाच्या भोव-यात सापडलं आहे. वास्तविक अलीगढ मुस्लिम विद्यापीठ अशाप्रकारे अनेकवेळा वादात सापडलं आहे. पण आता या विद्यापीठातील सर शाह सुलेमान वसतिगृहात रविवारी दुपारच्या जेवणात चिकन बिर्याणीऐवजी बीफ बिर्याणी दिल्याची नोटीस व्हायरल झाली, आणि अलीगढ विद्यापीठाबाबत पोलींसामध्ये गुन्हा दाखल झाला. गेल्या काही महिन्यात विद्यापीठात झालेल्या मारहाणी प्रकरणी तपास चालू असतांना आता हे बिर्याणी प्रकरण पुढे आले आहे. उत्तरप्रदेशमध्ये महाकुंभ सारखा हिंदू धर्मातील सर्वोच्च सोहळा चालू आहे. (Aligarh Muslim University)
या महाकुंभमध्ये करोडो हिंदू भाविक जगभरातून येत आहेत. अशात अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या सुलेमान हॉस्टेलमध्ये बीफ बिर्याणी आणली आणि त्याची नोटीस व्हायरल झाली. अर्थात ही नोटीस व्हायरल झाली की मुद्दामहून व्हायरल करण्यात आली, यापासून तपास सुरु झाला आहे. कारण यावरुन दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा उद्देश आहे का, याचाही तपास होत आहे. एएमयूमध्ये बीफ बिर्याणी प्रकरणी करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेंद्र सिंह यांनी या कृत्यामुळे हिंदू समाजाच्या, विशेषतः एएमयूमध्ये शिकणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्याची तक्रार केली आहे. एएमयूकेमध्ये अनेकवेळा वाद होत असातात. विद्यापीठात 30 टक्के विद्यार्थी हिंदू आहेत, मात्र त्यांना विद्यापीठाकडून कधीही सहकार्य होत नसल्याची ओरड होते. आता या सर्वात बीफ बिर्याणी वादाची भर पडली आहे. चारशे वर्षाची परंपरा असलेल्या या विद्यापीठाबाबत नित्य वाद होत असले तरी यातील ग्रंथालयात लाखो पुस्तके असून यात अनेक दुर्मिळ फारशी पुस्तकांचाही समावेश आहे. आधुनिक शिक्षणाची गरज म्हणून स्थापन झालेल्या या विद्यापीठाची सुरुवात कशी झाली, हे जाणून घेण्यासारखे आहे. (Latest News)
अलीगढ मुस्लिम विद्यापीठ हे भारतातील प्रमुख केंद्रीय विद्यापीठांपैकी एक आहे. या विद्यापीठात पारंपारिक आणि आधुनिक शिक्षणाच्या शाखांमध्ये 250 हून अधिक अभ्यासक्रम आहेत. याच आधुनिक शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून समाजसुधारक सर सय्यद अहमद खान यांना 1875 मध्ये एक शाळा सुरू केली होती. याच शाळेला नंतर 1920 मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. अनेक प्रमुख मुस्लिम नेते, उर्दू लेखक आणि विद्वानांनी विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. या विद्यापीठातील आझाद ग्रंथालय हे अभ्यासूंसाठी अखंड वाहणा-या ज्ञानगंगेसारखे आहे. तब्बल 14 लाख पुस्तके यात आहेत. ज्यामध्ये पुराण, रामायण, कुराण, मुघलकालीन पत्रे, दुर्मिळ हस्तलिखिते यांचा समावेश आहे. (Aligarh Muslim University)
शिवाय मुघल राजवटीच्या काळातील ऐतिहासिक वस्तू देखील यात असल्यामुळे हे ग्रंथालय प्रेक्षणीयही झाले आहे. विशेष म्हणजे, मौलाना आझाद ग्रंथालयात एक पर्शियन भाषेत लिहिलेली भगवद्गीता आहे. ही भगवद्गीता 400 वर्षाहून अधिक जुनी असल्याची माहिती आहे. अकबराच्या काळात, संस्कृत पुस्तके फारसीमध्ये लिहिली गेली. त्यातील अनेक जुने ग्रंथ या ग्रंथालयात बघायला मिळतात. याशिवाय या ग्रंथालयात हजार वर्ष जुनी कुराणाची प्रतही आहे. तामिळ भाषेतील भोजपत्रांचेही या ग्रंथालयात जतन करण्यात आले आहे. यासोबत जहांगीरचे चित्रकार मन्सूर नकाश यांनी काढलेली अद्भुत चित्रंही येथे बघायला मिळतात. दुर्मिळ पुस्तकांसह तेवढ्याच दुर्मिळ कलाकृतींनाही या ग्रंथालयानं सांभाळून ठेवलं आहे. या ग्रंथालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भेट दिली आहे. येथील ग्रंथसंपदा बघून तेही भारावून गेले होते. (Latest News)
=============
हे देखील वाचा : Uttarakhand : चलो चारधाम !
Interstellar : आपण ‘ब्लॅक होल’मध्ये जिवंत राहू शकतो का ?
=============
असे असले तरी, हे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ त्याच्या वादांबद्दल कुप्रसिद्ध आहे. या विद्य़ापीठात शिक्षण घेणा-या एकूण विद्यांर्थ्यांपैकी 30 टक्के विद्यार्थी हिंदू आहेत. वैद्यकीय आणि कायदा यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये हिंदू विद्यार्थ्यांची संख्या 40 टक्क्यांपर्यंत आहे. मात्र या विद्यार्थ्यांना समान वागणूक मिळत नसल्याची ओरड अनेकवेळा होते. काही महिन्यापूर्वी एक विद्यार्थ्यांनं विद्यापीठातील प्राध्यापक हिंदू विद्यार्थ्यांकडे कानाडोळा करत असल्याची तक्रार केली होती. या विद्यापीठाला अल्पसंख्याक विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. त्याबाबतही सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु आहे. येथील केनेडी हॉलमध्ये मुलींसाठी स्कार्फ आणि पुरुषांसाठी टोप्या घालण्याची परंपरा आहे. याच हॉलमध्ये एकदा अभिनेते नसीरुद्दीन शहा आले असतांना त्यांनीही टोपी घातली नसल्यामुळे वाद निर्माण झाला होता. अनेक हिंदू विद्यार्थी विद्यापीठात वावरतांना असुरक्षित भावना जाणवते असे सांगतात. आता त्यात या बीफ बिर्याणी वादाची भर पडली आहे. (Aligarh Muslim University)
सई बने