Home » Baba Vanga : फिफा विश्वचषकापूर्वी पृथ्वीवर येणार परग्रही !

Baba Vanga : फिफा विश्वचषकापूर्वी पृथ्वीवर येणार परग्रही !

by Team Gajawaja
0 comment
Baba Vanga
Share

नवीन वर्ष सुरु होण्यासाठी काही दिवसांचा अवधी राहिला की बल्गेरियन अंध भविष्यवक्ता बाबा वांगा यांचे नाव चर्चेत येते. बाबा वांगा यांनी आगामी वर्षासाठी काय भविष्य सांगितले आहे, याची उत्सुकता वाढते. दरवर्षी याच बाबा वांगा यांनी सांगितलेल्या भविष्यातील घटना काही प्रमाणात ख-या ठरल्यामुळे बाबा वांगा यांच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. मात्र २०२६ साठी बाबा वांगा यांनी जे भविष्य सांगितले आहे, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. कारण बाबा वांगा यांनी २०२६ मध्ये होणा-या फिफा विश्वचषक स्पर्धेचा आणि परग्रहींचा संबंध काय असेल, याबाबत भविष्यवाणी केली आहे. याशिवाय बाल्कनचा नोस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणा-या बाबा वांगा यांनी २०२६ मध्ये तिसरे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि एआयचा वाढता प्रभाव याबबतही भविष्य सांगितले आहे. युरोप, अमेरिका, रशिया, चीन आणि तैवानपर्यंत युद्धाचे ढग पसरतील असेही सांगितले आहे. (Baba Vanga)

भूकंप, ज्वालामुखींचा उद्रेक अशा घटनांसह मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागेल, असा इशाराही त्यांनी आपल्या भविष्यवाणीद्वारे दिला आहे. पण या सर्वात फिफा विश्वचषकादरम्यान परग्रहींचे यान पृथ्वीवर दाखल होईल, ही त्यांची भविष्यवाणी चर्चेत आली आहे. बाबा वांगाचे चाहते या सर्वांचा 3I/ATLAS या अंतराळात असणा-या रहस्यमयी वस्तूकडेही लक्ष वेधत आहेत. हे यानही पृथ्वीच्या दिशेनं येत असल्यामुळे हे परग्रहींचेच यान असल्याचे काहींचे ठाम मत आहे. आता बाबा वांगा यांची भविष्यवाणी आल्यामुळे खरोखरच परग्रही २०२६ मध्ये पृथ्वीवर येणार का याची उत्सुकता लागली आहे. फुटबॉल हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. नव्या वर्षात, २०२६ मध्ये फुटबॉलचा महाकुंभ म्हणून ओळखला जाणारा फिफा विश्वचषक होणार आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे त्याचा ड्रॉ काढून झाला आहे. ११ जून ते १९ जुलै, २०२६ दरम्यान होणा-या या फुटबॉल महाकुंभसाठी आत्तापासूनच बुकींगही सुरु झाले आहे. (International News)

जगभरातील करोडो फुटबॉलचे चाहते, या स्पर्धेची आतुरतेनं वाट पहात आहेत. याच स्पर्धेच्या दरम्यान परग्रही पृथ्वीवर आले तर काय होईल. अर्थात अशीच भविष्यवाणी बाबा वांगा यांनी केली आहे. फिफा स्पर्धेबाबत बाबा वांगाच्या या भविष्यवाणीची जगभर चर्चा होत आहे. त्या पुन्हा एकदा जगभरात व्हायरल होत आहेत. ही स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोसह जगभरातील १६ शहरांमध्ये होणार आहे. यात १०४ सामने खेळवले जातील. २०२६ चा फिफा विश्वचषक कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्स हे या स्पर्धेचे यजमान आहेत. इतिहासात पहिल्यांदाच तीन देश मिळून फिफाचे यजमानपद भूषवत आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना न्यूयॉर्क-न्यू जर्सीमधील मेटलाइफ स्टेडियमवर होणार आहे. (Baba Vanga)

या सर्वांच्या दरम्यान परग्रही पृथ्वीबरोबर संवाद साधणार असल्याचा दावा बाबा वांगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीतून केला आहे. बाबा वांगा यांची ही भविष्यवाणी ब्रिटनच्या द मेल अँड स्काय हिस्ट्रीसह अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रकाशित केली आहे. या बाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, आकाशात एक नवीन प्रकाश किंवा अज्ञात उडणारी वस्तू यावेळी दिसेल. ही घटना घडणार तेव्हा पृथ्वीवर सर्वात मोठा खेळाचा उत्सव चालू असेल. त्यामुळे करोडो लोक हे दृष्य बघणार आहेत. बाबा वांगा यांची ही भविष्यवाणी फिफा विश्वचषकासोबत जोडून घेण्यात येत आहे. या विश्वचषकाचे सामने बघण्यासाठी जगभरातील करोडो नागरिक उपस्थित असतात. अशावेळी आकाशात रहस्यमयी वस्तू दिसली तर तिथे काय परिस्थिती असेल, याचा विचारही करता येत नाही. (International News)

========

हे देखील वाचा :  Japan : कब्रस्तान हवे असले तर तुमच्या देशात जा !

========

बाबा वांगा यांची ही भविष्यवाणी प्रसिद्ध झाल्यावर मोठी खळबळ उडाली आहे. काही शास्त्रज्ञानी ही हास्यास्पद भविष्यवाणी असल्याचे सांगितले आहे. मात्र बाबा वांगा यांच्या चाहत्यांनी त्यांच्या यापूर्वीच्या वास्तवात आलेल्या भविष्यवाणींचे दाखले दिले आहेत. यासोबतच बाबा वांगाच्या एका भाकितेमध्ये २०२६ हे पृथ्वीसाठी कठीण वर्ष असू शकते, असेही सांगण्यात आले आहे. अनेक शक्तिशाली भूकंप, सक्रिय ज्वालामुखीचा उद्रेक होण्याच्या घटना वाढतील, असेही त्यांनी सांगितले आहे. सोबतच २०२६ या वर्षात रशिया-अमेरिका तणाव, चीन-तैवान वाद वाढणार असल्याचेही सांगितले आहे. अर्थात या भविष्यवाणी ख-या होतात की नाही, हे आता काही दिवसांनी येणा-या नवीन वर्षातच स्पष्ट होणार आहे. (Baba Vanga)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.