जगभरातील अनेक देशांच्या सीमा युद्धजन्य वातावरणामुळे अशांत आहेत. मात्र या युद्धापेक्षा जगाच्या भविष्यात आणखी एक भयानक युद्ध होणार आहे का? अशी भीती व्यक्त कऱण्यात येत आहे. कारण नोव्हेंबरमध्ये परग्रही पृथ्वीवर हल्ला करणार असल्याची शक्यता हार्वर्ड विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या खगोलशास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार सौर मंडळातून मार्ग काढत एक गुढ यान वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. शास्त्रज्ञांनी त्याचे नाव 3I/ATLAS असे ठवले आहे. हे परग्रही जहाज आहे की, धुमकेतू आहे, याचा तपास सुरु आहे. मात्र या वस्तूचा आकार बघून शास्त्रज्ञ धास्तावले आहेत. ही गुढ वस्तू 15 मैल व्यासाची असण्याची शक्यता आहे. म्हणजेच अमेरिकेच्या मॅनहॅटन शहरापेक्षा मोठा आकार या गुढ वस्तूचा आहे. (Area-51)
या वस्तूचा वेग एवढा आहे की, पृथ्वीवरील सर्वात वेगवान रॉकेट देखील त्याला गाठू शकत नाहीत. सर्वात खळबळजनक गोष्ट म्हणजे, बल्गेरियन भविष्यवेत्ता वांगा बाबा यांनीही 2025 या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात परग्रही आणि मनुष्य यांच्यात संघर्ष होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. या दोन्ही गोष्टींना एकत्र करुन आता खरोखरच नोव्हेंबर महिन्यात परग्रही पृथ्वीवर येणार का, अशी चर्चा रंगली आहे. आत्तापर्यंत परग्रही किंवा एलियन या विषयावर अनेकवेळा चर्चा झाली आहे. मुळात एलियन आहेत किंवा नाही, यावरही बरेच वाद झाले आहेत. पण एलियन या विषयावर जेवढे हॉलिवूडपट आले आहेत, तेवढे चित्रपट कुठल्याही विषयावर आले नाहीत. बॉलिवडूमध्येही एलिनयनवर चित्रपट आले आहेत. अनेक पुस्तकंही याविषायवर लिहिली गेली आहेत. पण वास्तवात एलियन कोणी बघितले, यावर अद्याप कोणाचाही विश्वास बसत नाही. (International News)
अर्थात अमेरिकेमध्ये एका गुप्त जागेमध्ये एलियन असल्याचा दावा कऱण्यात येतो. या जागेला ‘एरिया-51’ असे म्हणण्यात येते. या सगळ्या चर्चा चालू असतांनाच आता एका प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञांनी एलियनचे मोठे अंतराळयान पृथ्वीकडे खूप वेगाने येत असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. या दाव्यामध्ये नोव्हेंबरपर्यंत परग्रही आपल्या पृथ्वीवर येणार असल्याचे सांगितले आहे. साधारण 1 जुलैच्या आसपास चिलीमधील एका महाकाय दुर्बिणीद्वारे अंतराळातून ही अज्ञात वस्तू शोधण्यात आली. त्याचे निरिक्षण केल्यावर ही वस्तू सौरमंडळाच्या बाहेरील असल्याचे स्पष्ट झाले. या वर्षी नोव्हेंबरमध्ये ही वस्तू पृथ्वीजवळ पोहोचेल, त्यानंतर ती सूर्याच्या मागे जाईल. त्यानंतर ही गुढ वस्तू पृथ्वीवरून दिसणार नाही. शास्त्रज्ञांनी या गुढ वस्तूचे नाव 3I/ATLAS ठेवले आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार सुमारे 20 किलोमीटर लांबीचे हे यान आहे. (Area-51)
या वस्तूचा वेग प्रति सेकंद 60 किलोमीटर मोजण्यात आला आहे. काही शास्त्रज्ञांनी ही गुढ वस्तू म्हणजे, लघुग्रह असल्याचे सांगितले आहे. मात्र हार्वर्डचे प्राध्यापक एव्ही लोएब आणि त्यांच्या टीमने असा दावा केला आहे की या गुढ वस्तूची कक्षा, रचना आणि वेग यावरुन हे परग्रहींचे यान असल्याचेच स्पष्ट होत आहे. एव्ही लोएब हे हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एलियन्सवर एक पुस्तकही लिहिले आहे. त्यात त्यांनी कधीना कधी परग्रही पृथ्वीवर हल्ला करणार असा सिद्धांत मांडला आहे. याआधी 2017 मध्ये त्यांनी ओमुआमुआ नावाच्या लघुग्रहाबद्दलही ते परग्रहींचे यान असल्याचा दावा केला होता. पण नंतर तो एक लघुग्रह असल्याचे निष्पन्न झाले. आता एव्ही लोएब यांनी जो दावा केला, त्यावेळी त्यांच्या टीममध्ये लंडनस्थित इनिशिएटिव्ह फॉर इंटरस्टेलर स्टडीजचे अॅडम हिबर्ड आणि अॅडम क्रॉल यांच्यासह अनेक इतर शास्त्रज्ञांचा समावेश आहे. (International News)
===================
हे देखील वाचा : Cambodia and Thailand : भगवान शंकराच्या मंदिरावरुन दोन देशांमध्ये युद्ध
===================
या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की 3I/ATLAS नावाचे गुढ जहाज कक्षेत फिरत आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये हे गुढ जहाज सूर्याच्या अगदी जवळ पोहोचेल आणि अशा परिस्थितीत यावरुन पृथ्वीवर खूप वेगाने हल्ला होण्याची भीती या शास्त्रज्ञांना आहे. प्रोफेसर लोएब यांच्या दाव्यानुसार ही वस्तू जाणूनबुजून अशा कक्षेत येत आहे ज्याचे पृथ्वीवरून निरीक्षण करणे कठीण होईल. शिवाय, त्याचा वेग इतका वेगवान आहे की सध्या पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून तो थांबवता येणार. सोशल मीडियावर लोक याला कॉस्मिक ट्रोजन हॉर्स असेही म्हणत आहेत. अर्थात या सर्व दाव्यामुळे बाबा वांगाही पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी 2025 या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात परग्रही पृथ्वीवर येणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. अशा परिस्थितीत, 3I/ATLAS या गुढ वस्तूचा आणि भविष्यवाणीचा संबंध जोडण्यात येत आहे. (Area-51)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics