हॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट हे परग्रही आणि त्यांच्या ग्रहावर बनवण्यात आले आहेत. परग्रही म्हणजेच एलियन दिसतात कसे हे यातून दाखवण्यात आले आहेत, शिवाय एलियन आणि माणसं यातील युद्धही दाखवण्यात आलं आहे. काही चित्रपटात एलियन पृथ्वीवर येऊन माणसांना गुपचूप घेऊन जात असल्याचेही दाखवण्यात आले आहेत. या माणसांचा ते अनेक प्रयोगांसाठी वापर करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र हे जर प्रत्यक्षात होत असेल तर. (Alien)
वास्तवात परग्रही आहेत का, आणि असल्यास ते पृथ्वीवर येतात का, हा अनेक वर्षापासूनचा संशोधनाचा विषय आहे. यावरुन दोन तट पडले आहेत. मात्र यापैकी एका गटानं आता परग्रही आहेत आणि ते पृथ्वीवर नियमीत येत असल्याचा दावा केला आहे. शिवाय ते पृथ्वीवरून लोकांना पळवून नेऊन त्यांच्यावर विशिष्ट प्रयोग करीत आहेत. अमेरिकेतील एका प्रतिष्ठीत विद्यापीठातील संशोधकांनी हा दावा केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अमेरिकेत एलियन आणि युएफओ संदर्भात दररोज नवे दावे करण्यात येतात. आता त्या दाव्यात आणखी एक भर पडली आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित येल विद्यापीठातील एक चर्चासत्रात एलियन संदर्भात मोठा दावा करण्यात आला. वकील म्हणून काम करणा-या डॅनी शीहान यांनी एलियन्स आणि यूएफओबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी जाहीर चर्चासत्रात एलियन मानवांचे अपहरण करुन मानवी शुक्राणू आणि अंडी चोरत असल्याचे सांगितले. (International News)
एवढ्यावरच डॅनी थांबले नाहीत तर त्यांनी यापासून एलियन हे मानवापेक्षा प्रगत प्रजाती तयार करत असल्याचेही सांगितले. डॅनी यांनी आपल्या या दाव्याच्या पुष्ठीसाठी अनेक युएफओचे फोटो जाहीर केले. त्यांच्यामते पृथ्वीवर युएपओच्या माध्यमातून एलियन सतत ये-जा करीत असतात. पृथ्वीवर एलियनचे अनेक छुपे तळ आहेत. समुद्राच्या आतही एलियनचे तळ आहेत. त्यातून ते सहजपणे ये-जा करीत आहेत. गेल्या 70 वर्षात एलियनचा पृथ्वीवरील प्रवास वाढला असून आता ते मानवाचे अपहरणही करत असल्याचा दावाच डॅनी यांनी केला. एलियन महिलांकडून अंडी आणि पुरुषांकडून शुक्राणू काढतात. ते एकत्र करुन स्त्रियांच्या गर्भाशयात पुन्हा रोपण करतात. अशा महिलांचे अपहरण करुन त्यांचे गर्भाशय एलियन काढून घेतात. (Alien)
या गर्भाशयात स्वतंत्ररित्या मुल वाढवले जात असल्याचे डॅनी यांनी सांगितले. यातून एलियन एक प्रगत प्रजाती तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्वांसाठी एलियनची भव्य अशी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळा समुद्राच्या तळाशी असून याचा शोध कुठल्याही मनुष्याला घेता आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. ग्वाडालुपे बेटाच्या जवळ ही जागा आहे, येथून युएफओ येतांना आणि जातांनाची चित्रे अमेरिकेच्या युद्धनौकेनं काढल्याचा दावाही डॅनी यांनी केला आहे. डॅनी यांच्या या दाव्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. ग्वाडालुपे हा एक विरळ लोकसंख्येचा समुद्रकिनारा आहे. अमेरिकेत एलियन संदर्भात असेच दावे रोज होत असतात. गेल्या काही वर्षापूर्वी खगोलशास्त्रज्ञ अवि लोएब यांनी एलियन पृथ्वीवरच रहात असल्याचा दावा केला होता. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक असलेले लोएब यांनी एलियन आणि युएफओ यांचा पृथ्वीवरचा वावर वाढला असून भविष्यात ते मानवाबरोबरच रहातील असा दावा करुन खळबळ उडवून दिली होती. (International News)
====
हे देखील वाचा : ती ट्रेन बोगद्यात शिरली आणि प्रवाश्यांसह गायब झाली
====
अवि लोएब यांनी एलियन आणि माणूस यांची मैत्री एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं होईल असे सांगून त्यासंदर्भात उदाहरणंही दिली होती. त्यांच्या मतानुसार अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जगभरातील अंतराळ संशोधन संस्था या आता अन्य ग्रहांवर रोबोट पाठवून शोध घेत आहेत. हे प्रगत तंत्रज्ञान एलियनना माहित आहे. त्यामुळे त्यातूनच ते माणसाबरोबर संपर्क साधणार आहेत. अमेरिकेत एलियन संदर्भात वारंवार होणा-या या दाव्यांसोबत एलियन आणि युएफओ यांचे फोटोही व्हायरल होत असतात. याची दखल घेऊन आता नासानं या फोटोंना एकत्र करण्यासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना केली आहे. या विभागातून फोटोंची पडताळणी करण्यात येते आणि बनावट फोटोंची सत्यता लगेच जनतेसमोर आणली जाते. मात्र यापैकी काही फोटो हे कधीही समोर येत नाहीत. हे फोटो खरे आहेत, आणि नासा एलियन संदर्भात स्वतंत्रपणे संशोधन करीत असल्याचे एलियन असल्याचा दावा करणा-या सर्व संशोधकांचे म्हणणे आहे. (Alien)
सई बने