बॉलिवूडची क्युट बबली गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलिया भट्टचे जगभरत कोट्यवधी चाहते आहेत. आलिया नेहमीच चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
आलियाला उत्तम अभिनेत्रीसोबतच एक उत्तम फॅशनेस्टा देखील म्हटले जाते. ती नेहमीच तिच्या लुक्सवर विविध एक्सपेरिमेंट करून वाहवा मिळते. सध्या सर्वत्र आलियाची कमालीची चर्चा होताना दिसत आहे. मीडियासोबतच सोशल मीडियावरही फक्त आलियाचीच जादू पाहायला मिळते आहे.
याचे कारण म्हणजे पॅरिस फॅशन वीक. आलिया भट्टने सोमवारी ‘पॅरिस फॅशन वीक 2024’ मध्ये रॅम्प वॉक केला. या इव्हेंटमध्ये आलिया भट्टला पहिल्यांदा पाहण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक दिसत होते. आलिया खूपच स्टायलिश दिसत होती.
आलियाने या इव्हेंटमध्ये एक स्टायलिश ड्रेस परिधान केला होता. तिने मेटॅलिक सिल्व्हर बस्टियर घातलेले दिसले. जे तिने काळ्या ऑफ-शोल्डर जंप सूटसह पेअर केले होते.
अतिशय मिनिमल मेकअप आणि कर्ली केसांसह आलियाने तिचा लूक कॅरी केले. यावेळी आलिया खूपच क्यूट दिसत होती. यासोबतच तिने कानात मेटॅलिकचेच मोठे इरिंग्स देखील घातले होते.
दरम्यान या कार्यक्रमात आलियाने एका नामांकित ब्युटी ब्रँडसाठी खास अंदाजात रॅम्प वॉक केला. आलियाने तिचे या शोचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.