Home » पुतिन यांचा मास्टरमांइड अलेक्जेंडर दुगिन कोण आहेत, ज्यांच्या मुलीला स्फोटात उडवले?

पुतिन यांचा मास्टरमांइड अलेक्जेंडर दुगिन कोण आहेत, ज्यांच्या मुलीला स्फोटात उडवले?

by Team Gajawaja
0 comment
Alexander Dugin
Share

मॉस्को मध्ये झालेल्या कारच्या स्फोटात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचा निटकवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलेक्जेंडर दुगिन (Alexander Dugin) यांची मुलगी दारिया दुगिन हिचा मृत्यू झाला आहे. स्फोट नक्की कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण समोर आलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या कारमध्ये स्फोट झाला त्यामध्ये अलेक्जेंडर दुगिन हे बसणार होते. परंतु त्यांनी स्फोटापूर्वी त्या कारमध्ये बसण्याचा निर्णय टाळला आणि ते बचावले. अशातच आता चर्चांना उधाण आले आहे की, कोण आहे नक्की अलेक्जेंडर दुगिन, कसे बनले रशियाचा ताकदवर चेहरा आणि पुतिन यांच्यासोबत त्यांचे खास संबंध काय आहेत? याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात.

कोण आहेत अलेक्जेंडर दुगिन?
अलेक्जेंडर दुगिन हे पेशाने खरंतर रणनीतिकार आणि विश्लेषक आहेत. परंतु त्यांची विचारसरणी ही फॅसिस्ट राहिली आहे. जगातील बहुतांश पाश्चिमात्य देश त्यांना पुतिनचे डोकं असे संबोधित करतात. पुतिन जे काही महत्वाची पावले उचलतात त्यामध्ये अलेक्जेंडर दुगिन यांचा सल्ला घेतलाच जातो. त्यांना युक्रेनध्ये झालेल्या हल्ल्याच्या योजनेचा मास्टरमाइंड असल्याचे ही सांगितले जाते. अलेक्जेंडर दुगिन बहुतांश वेळा युक्रेनवर ताबा मिळवणे किंवा त्याचे रशियात एकीकरण करण्याबद्दल खुप वेळा बोलले आहेत.

Alexander Dugin
Alexander Dugin

स्वच्छता कर्मचारी ते राजकिय विश्लेषकचा प्रवास
मॉस्को मध्ये जन्मलेले अलेक्जेंडर दुगिन (Alexander Dugin) यांचे वडिल गेली अलेक्जेंड्रोविच दुगिन सोवियत सेनेत कर्नल जनरल होते. आई गॅलीना एक डॉक्टर होती. अलेक्जेंडर यांच्या वडिलांनी जेव्हा ते ३ वर्षांचे होते तेव्हाच त्यांची साथ सोडली होती. मॉस्को मध्ये अलेक्जेंडर दुगिन यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले आणि १९७९ मध्ये मॉस्को एविएशन इंस्टिट्युमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यांचा व्यवहार ठिक नसल्याने त्यांना तेथून काढून टाकण्यात आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुगिन लेनिन लाइब्रेरीमध्ये आपली ओळख तयार करण्यासाठी रस्त्यावरील साफसफाई करणारे कर्मचारी झाले आणि त्यांनी त्या कामाची सुरुवात केली. त्यांना खासकरुन फॅसिस्ट आणि मुर्तिपूजक यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांमध्ये फार आवड होती. त्यांनी इटॅलियन, जर्मन, फ्रेंट, स्पॅनिश आणि इंग्रजी भाषा शिकली.

दुगिन यांनी नंतर पत्रकाराच्या रुपात नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यांचे पहिले लग्न रशियाच्या कार्यकर्त्या एवगेनिया डेब्रियनस्काया यांच्यासोबत झाले होते. १९८८ मध्ये अल्ट्रानेशनलिस्ट समहू पमायत मध्ये सहभागी झालेल्या याच समूहाने नंतर रशियातील फॅसिस्टला जन्म दिला. दुगिन यांनी रशिया संघच्या कम्युनिस्ट पार्टीसाठी राजकीय कार्यक्रम तयार करण्यास मदत केली. अशाप्रकारे ते राजकरणाच्या जवळ येऊ लागले आणि विश्लेषक झाले.

हे देखील वाचा- सोमालियातील हॉटेलवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटनेला नक्की काय हवंय ?

नेहमीच युक्रेन विरोधी राहिलेले दुगिन आणि पुतीन जवळ आले
दुगिन २००९ ते २०१४ दरम्यान मॉस्को युनिव्हर्सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये समाजशास्र विभागात प्रमुख होते. युक्रेनच्या विरोधी असल्याच्या कारणास्तव त्यांनी तेथील नागरिकांबद्दल बहुतांश वेळा टिप्पणी सुद्धा केली होती. त्याचमुळे त्यांना आपले युनिव्हर्सिटीतील पद गमवावे लागले होते. ३० पुस्तके लिहिणारे दुगिन (Alexander Dugin) जियोपॉलिटिका नावाचे मॅगजीन चालवायचे, ज्याच्यामुळे अमेरिकेने त्यांच्या मॅगजीनसह त्यांच्या मुलीवर बंदी घातली होती. त्यांची मुलगी वेबसाइट युनाइडेट वर्ल्ड इंटरनॅशनलची एडिटर होती.

युक्रेन संबंधित नेहमीच विरोधाची भुमिका असल्याने ते पुतिन यांच्या नजरेत आले. त्यानंतर पुतिनचे निकटवर्तीय झाले. राजकरण ते रशियात योजना तयार करण्यापर्यंत पुतिन त्यांच्याकडून सल्ला घेऊ लागले. रशियाच्या सरकारमध्ये दुगिन यांचा खास प्रभाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रशिया सरकारच्या परराष्ट्र नीतिंमध्ये त्यांची महत्वाची भुमिका राहिली आहे. असे म्हटले जाते की, युक्रेनवर हल्ला करण्याची रणनिती सुद्धा त्यांना बनवल्याने त्यांना त्याचा मास्टरमाइंडची सुद्धा भुमिका निभावली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.