भारताच्या प्राचीन वैदिक परंपरा आणि तिची खोल सांस्कृतिक मुळे जगाला नवी दिशा देण्याची क्षमता ठेवतात. अखंड भारताची संकल्पना व्यापक आहे. भारत हा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्ती आहे. जगाला मार्ग दाखवण्याची क्षमता भारताकडे आहे, असे गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत, अलेक्झांडर डुगिन यांनी. हे अलेक्झांडर डुगिन कोण, असा प्रश्न पडला तर हे अलेक्झांडर डुगिन हे खूप मोठं आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे गुरु म्हणून अलेक्झांडर डुगिन यांची ओळख आहे. राजकीय तत्वज्ञानी आणि विश्लेषक म्हणून प्रसिद्ध असलेले अलेक्झांडर डुगिन हे फॅसिस्ट विचारसरणीचे समर्थक मानले जातात. रशियातील एका टिव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये डुगिन यांनी बदलत्या भारताबद्दल जे गौरवोद्गार काढले आहेत, त्यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. शिवाय त्यांनी या मुलाखतीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही भरभरुन कौतुक केले आहे. जगापुढे सध्या अनेक समस्या आहेत. या सर्वांतून मार्ग काढायचा असेल तर भारताच्या आध्यात्मिक शक्तीला बरोबर घेतले पाहिजे, असे सांगून त्यांनी भारताच्या आध्यात्मिक शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. (Alexander Dugin)
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना राजकारण शिकवणारे त्यांचे गुरू अलेक्झांडर डुगिन यांनी भारताविषयी व्यक्त केलेल्या विचारांमुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका कशी महत्त्वाची आहे, आणि भविष्यात जगातील सर्वात शक्तीशाली म्हणून आपला देश ओळखला जाणार आहे, याची माहिती मिळते. अलेक्झांडर डुगिन यांनी या मुलाखतीमध्ये अखंड भारताच्या भूमिकेला आपला पाठिंबाही दिला आहे. त्यामुळे अखंड भारत हा शब्द ऐकल्यावर ज्या देशांना मनस्ताप होतो, त्यांनाही अप्रत्यक्ष धक्का बसला आहे.राजकीय तत्वज्ञानी आणि विश्लेषक म्हणून प्रसिद्ध असलेले अलेक्झांडर डुगिन हे फॅसिस्ट विचारसरणीचे समर्थक मानले जातात. त्यांनी मांडलेल्या भारतविषयक भूमिकेची चर्चा सुरु झाली आहे. अखंड भारताच्या कल्पनेने प्रभावित झालेल्या अलेक्झांडर डुगिन यांनी भारताला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्ती म्हणून गौरवले आहे. शिवाय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची ताकद वाढत आहे, हा बदलता भारत आपल्या परंपराही तेवढ्याच सहजपणे जपत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. रशियन राज्य माध्यम रशिया टीव्ही वर झालेल्या या मुलाखतीमध्ये अलेक्झांडर डुगिन यांनी भारताला आपली महान हिंदू सभ्यता पुन्हा स्थापित करण्याचे आवाहन केले आहे. भारताने आपली महान हिंदू संस्कृती पुनर्संचयित करण्याची आवश्यकता असल्याचेही स्पष्ट केले आहे. (International News)
======
हे देखील वाचा : अमेरिकेत गाजरांची दहशत !
====
अलेक्झांडर डुगिन यांनी यावेळी भारताच्या प्राचीन वैदिक परंपरा आणि तिची खोल सांस्कृतिक मुळे जगाला नवी दिशा देण्याची क्षमता ठेवतात, असे मत व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या प्राचीन वैदिक परंपरांना आधुनिकतेशी जोडण्याचे काम केल्याचे सांगितले तसेच पतंप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळे भारत एक शक्ती म्हणून उदयास आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. डुगिन हे ब्रिक्स परिषदेने भारावून गेले आहेत. याचे वर्णन त्यांनी नवीन जागतिक व्यवस्थेचे प्रतीक म्हणून केले आहे. ही संघटना सत्तेचा समतोल मजबूत करते आणि स्पर्धेऐवजी सहकार्याला चालना देते, असेही मत डुगिन यांनी व्यक्त केले आहे. पुतिन यांचे गुरु असलेल्या डुगिन यांनी भारताचा केलेला हा गौरव अनेकदृष्टा महत्त्वाचा आहे. डुगिन हे जागतिक पातळीवर राजकीय तत्वज्ञानी, विश्लेषक म्हणून ओळखले जातात. पाश्चात्य देशांमध्ये, डुगिन हे फॅसिस्ट विचारसरणीचे कट्टर समर्थक मानले जातात. अलेक्झांडर डुगिन यांनीच युक्रेनचे नाव नोव्होरोसिया, म्हणजेच नवीन रशिया ठेवले आहे. अलेक्झांडर डुगिन यांचा जन्म मॉस्को येथे सोव्हिएत लष्करी गुप्तचर विभागातील कर्नल-जनरल गेली अलेक्झांड्रोविच दुगिन यांच्या घरी झाला. त्यांची आई गॅलिना ही डॉक्टर होती. डुगिन यांनी रशियाला कायम सर्वोच्च स्थान दिले आहे. आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची त्यांची भूमिका आहे, त्यामुळेच त्यांना रशियाचे अध्यक्ष व्लादेमिर पुतिन हे गुरु मानतात. पुतिन यांना राजकारणात आणण्याचे श्रेयही डुगिन यांच्याकडेच आहे. केबीसीमध्ये गुप्तहेर असलेल्या पुतिन यांना राजकारणाचे शिक्षण तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल सजग करण्यात डुगिन यांचा वाटा मोठा असल्याची माहिती आहे. (Alexander Dugin)
सई बने