अक्षय्य तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया हा वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस असून तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते आणि हिंदू धर्मात त्याचे विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचा जन्म परशुरामाच्या सहाव्या अवतारात झाला होता.(Akshaya Tritiya 2023 Date And Shubh Muhurat)
ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेचा दिवस खूप खास असतो कारण या दिवशी सूर्य आणि चंद्र दोघेही उच्च राशीत असतात, त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढते.नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. चला जाणून घेऊया यंदा अक्षय्य तृतीया केव्हा आहे? या दिवशी शुभ मुहूर्त कोणता? आणि पंचांगानुसार त्याचे महत्त्व काय.
यंदा अक्षय तृतीया कधी?
हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते. यंदा हा दिवस 22 एप्रिल 2023 रोजी असून अक्षय तृतीया सकाळी 7 वाजून 49 मिनिटांनी सुरू होईल आणि 23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी संपेल.
अक्षय तृतीया 2023 शुभ मुहूर्त
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी पूजेचा शुभ काळ सकाळी ७ वाजून ४९ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २० मिनिटांपर्यंत आहे.(Akshaya Tritiya 2023 Date And Shubh Muhurat)
=================================
हे देखील वाचा: नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे, मकरसंक्रात…
=================================
अक्षय तृतीयेचे महत्व
अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ असून या दिवशी देवी लक्ष्मीची विधिपूर्वक पूजा केल्यास तिची कृपा कायम राहते, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी माता अन्नपूर्णा हिची देखील पूजा केली जाते. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया शुभ दिवसांमध्ये गणले जाते आणि या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी आपल्याला मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लोक शुभ आणि मंगल काम करतात. तसेच नवीन कार्याच्या प्रारंभासाठी हा दिवस शुभ मानला जातो.या दिवशी सोने खरेदी सुद्धा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेल्या कामात व्यक्तीला यश मिळते. हा दिवस सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येतो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेचा दिवस लग्न किंवा साखरपुडा केल्यास शुभ मानले जाते.