Home » Akshay Tritiya : जाणून घ्या भारतातील विविध प्रांतातील अक्षय्य तृतीया सणाबद्दल

Akshay Tritiya : जाणून घ्या भारतातील विविध प्रांतातील अक्षय्य तृतीया सणाबद्दल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Akshay Tritiya
Share

अक्षय्य तृतीया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आता अनेकांच्या घरात या दिवशी काय खरेदी करावे याबद्दल चर्चा चालू झाल्या असतील. कारण हा दिवसच इतका शुभ आणि महत्वाचा आहे की, यादिवशी खरेदी केलेली प्रत्येक गोष्ट अक्षय राहते, तिची कधीही झीज होत नाही. असा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला महत्वाचा दिवस. यंदा ३० एप्रिल गुरुवार रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक प्रांतानुसार अक्षय्य तृतीयेचे महत्व बदलत जाते.अक्षय्य तृतीया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. (Akshay Tritiya)

आता अनेकांच्या घरात या दिवशी काय खरेदी करावे याबद्दल चर्चा चालू झाल्या असतील. कारण हा दिवसच इतका शुभ आणि महत्वाचा आहे की, यादिवशी खरेदी केलेली प्रत्येक गोष्ट अक्षय राहते, तिची कधीही झीज होत नाही. असा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला महत्वाचा दिवस. यंदा ३० एप्रिल गुरुवार रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक प्रांतानुसार अक्षय्य तृतीयेचे महत्व बदलत जाते. (Akshay Tritiya Information)

धार्मिक पौराणिक कथेनुसार असे सांगितले जाते की, महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना त्यांच्या अज्ञात वासाच्या काळात एक अक्षय पात्र भेट दिले होते. यामुळे त्यांना आपल्या प्रवासात कधीही उपाशी राहावे लागले नाही. कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा, कधीही क्षय न होणार. यामुळे हा दिवस पवित्र मानतात. (Marathi News)

Akshay Tritiya

याशिवाय या दिवसाबद्दल अजून एक कथा सांगितली जाते ती म्हणजे, फार जुनी गोष्ट आहे की, धरमदास नावाचे एक व्यक्ती एका छोट्या गावात कुटुंबासह राहत होते. ते खूप गरीब होते. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते. धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते. एकदा त्यांनी अक्षय्य तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केले. (Marathi Top News)

========

हे देखील वाचा : Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला कोणती खरेदी करणे लाभदायक आहे?

========

नंतर पद्धतशीरपणे भगवान विष्णूची पूजा आणि आरती केली. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पाण्याची भांडी, जव, सत्तू, तांदूळ, मीठ, गहू, गूळ, तूप, दही, सोने, कपडे इत्यादी वस्तू देवाच्या चरणी ठेवून दान केल्या. ही सर्व देणगी पाहून धर्मदास यांच्या कुटुंबीयांनी व त्यांच्या पत्नीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, जर धरमदास यांनी या सर्व गोष्टी दानधर्मासाठी दिल्या तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार? तरीही धर्मदास आपल्या दानधर्माने आणि पुण्यकर्माने विचलित झाले नाहीत आणि त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दान दिले. (Marathi Trending News)

प्रत्येक अक्षय्य तृतीयेला त्यांनी पूजा केली आणि दान विधी केले. म्हातारपण, आजार, कुटुंबाचा त्रास आदी गोष्टी त्यांना या त्यांच्या परंपरेपासून विचलित करू शकल्या नाही. या जन्माच्या पुण्य परिणामामुळे पुढच्या जन्मी धर्मदासांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला. कुशावती राजा अतिशय प्रतापी होता. त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे सुख, संपत्ती, सोने, हिरे, रत्ने, संपत्ती कोणत्याही प्रकारे कमतरता नव्हती. त्याच्या राज्यात लोक खूप सुखी होते. अक्षय्य तृतीयेच्या पुण्यपूर्ण प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली, परंतु ते कधीही लोभाला बळी पडले नाही. (Marathi)

Akshay Tritiya

एका मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान करत तिचे वस्रहरण केले होते. तर या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली. (Marathi Latest News)

भारतातील साऊथ भागात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान कुबेर यांची शिवपुरम नावाच्या ठिकाणी पूजा केली जाते. कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले. कुबेरांनी लक्ष्मीजींकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले. तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय्य तृतीयेला लक्ष्मीजींची पूजा केली जाते. दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्रमाची पूजा केली जाते, ज्यामध्ये विष्णू, लक्ष्मीजींसोबत कुबेराचेही चित्र असते. (Marathi Top News)

भारतातील ओरिसामध्ये अक्षय्य तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो. या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू लागतात. ओरिसातील जगन्नाथपुरी येथून या दिवशी रथयात्रा काढली जाते. पंजाबमध्येही या दिवसाला खूप महत्त्व आहे. या अक्षय्य तृतीयेला ब्रह्म मुहूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष मंडळी त्यांच्या शेताकडे जातात. त्या रस्त्यावर जितके प्राणी-पक्षी आढळतात, तितकेच ते कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जाते. राजस्थानातही हा दिवस शुभ मुहूर्त समजला जातो. तेथे या दिवसाला आखा तीज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागांत या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे. (Marathi Trending News)

Akshay Tritiya

========

हे देखील वाचा : Electricity : ‘या’ सोप्या टिप्स वापरून कमी करा विजेचे बिल

=========

अनेक ठिकाणी अक्षय्य तृतीयेला मृत लोकांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तर्पण केले जाते, पिंडदान केले जाते. हा दिवस पितरांचा दिवस म्हणून देखील ओळखला जातो. आपल्या महाराष्ट्रातील खान्देशमध्ये अक्षय्य तृतीयेच्या सणाला “आखाजी” म्हटले जाते. खान्देशात आखाजी या सणाला कमालीचे महत्व आहे. हा सण दिवाळी इतकाच महत्त्वाचा समजला जातो. अनेकांच्या घरात या दिवशी पितरांच्या नावाने घागर देखील भरली जाते.

याशिवाय अक्षय्य तृतीया हा सण वैशाख महिन्यात येतो. वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ, घागर किंवा रांजण दान करावे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते. तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय्य तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते. अक्षय्य तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्र पठण अखंड टिकून राहते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.