खरंच अकबराने (Akbar) जोधाबाई यांच्याशी लग्न केले होते? मुघल साम्राज्याचा बादशहाबद्दल खुप पुस्तक लिहिण्यात आली आहेत. आपण ही काही पुस्तके वाचली असतील तर त्याच्याबद्दलचे सिनेमे सुद्धा पाहिले असतील. त्यानंतर असे झाले की, जोधाबाई या मुघल शासक अकबराच्या पत्नी होत्या. मात्र अकबराच्या आयुष्यावर नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक ‘अल्लाहु अकबर:’ अंडरस्टँडिंग द ग्रेट मुगल इन टुडेज इंडियाचे लेखक मणिमुग्ध एस शर्मा यांनी याचा विरोध केला आहे.
त्यांनी असे लिहिले की, वास्तवात अकबर याची चौथी पत्नी हिचे नाव हिरा उर्फ हरखा बाई असे होते. जी आमेरची राजकुमारी होती. तर सिनेमा निर्माते आशुतोष गोवारीकर यांनी आपला सिनेमा जोधा अकबरमध्ये जोधाबाईला राजा भारमल यांची मुलगी आणि अकबरची एकुलती एक पत्नी दाखवले आहे. जे तथ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. मणिमुग्ध शर्मा यांच्या मते, अकबरची पहिली पत्नी रुकैया होती. अकबरचे तिच्याशी अत्यंत जवळचे संबंध होते. कारण त्यांच्या नात्यात ती त्याची चुलत बहिण आणि लहानपणीची मैत्रीण होती. हरखा बाई यांच्याप्रमाणेच ती लग्नानंतर मुघल झाली नाही, कारण जन्मापासूनच ती मुघल होती.
आमेरची राजकुमारी जोधा नव्हे तर हरखा
आमेर एक लहान शहर होते, तेथील राजा भारमल कछवाह होता आणि हरखाबाई ही त्यांचीच मुलगी होती. आमेरच्या गादीसाठी राजा भारमल याचे त्यांचा भाऊ पूनरमल याच्यासोबत वाद सुरु होता आणि त्याला मुघल गवर्नर मिर्जा शरफुद्दीन याचे समर्थन मिळत होते. आमेरवर बाजूच्या राठौर घराण्याची सुद्धा नजर होती. राजा भारमल कमजोर होत होते आणि काही ठिकाणाहून घेरले सुद्धा गेले होते. याच परिस्थितीत अकबरकडे त्यांनी मदत मागितली. त्या बदल्यात त्याने आपली मुलगी हरखा हिच्यासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अकबरने हा प्रस्ताव स्विकार केला. त्यानंतर त्याने आपल्या गवर्नरला राजा भारमल यांच्या नातेवाईकांना बंदी केले होते त्यांना सोडण्यास सांगितले.
हे देखील वाचा- मुंडेश्वरी मंदिरातील सात्विक बलिदानाची अदभूत प्रथा…
हिंदू धर्माचे पालन करायच्या हरखा बाई
अकबरने (Akbar) जेव्हा हरखा बाई यांच्याशी लग्न केले तेव्हा त्या २० वर्षाच्या होत्या. त्यांच्या लग्नानंर हरखा बाई यांनी पिता राजा भारमल यांना त्यांचे राज्य परत जिले, हरखा बाई यांना अकबरने मरियम-उज-जमानी दिले. तो तेव्हाचा काळ होता जेव्हा हरखा बाईला अकबरच्या हरममध्ये एन्ट्री मिळाली होती. त्यांनी आपल्या हिंदू धर्माशी संबंदित सर्व परंपरा आणण्यास परवानगी दिली गेली. हरखा, बादशाह अकबरची पहिली बेकायदेशीर पत्नी मुस्लिम पत्नी होत्या ज्यांचे धर्मांतरण करण्यात आलेले नव्हते.
अकबर हा हरखा बाईवर अत्यंत खुश होते. त्यांच्याच म्हणण्यानुसार, अकबरने गोमास खाण्याचे सोडले होते. ऐवढेच नव्हे तर आपल्या दरबारातील लोकांना सुद्धा त्याने गोमास खाण्यावर बंदी घातली. अकबरच्या या निर्णयामुळे खुप जण दुखावले गेले होते.