Home » अजमेर 92 अडकला वादाच्या भोव-यात

अजमेर 92 अडकला वादाच्या भोव-यात

by Team Gajawaja
0 comment
Ajmer 92
Share

अजमेर 92 (Ajmer 92) या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच वादानं घेरलं आहे. जमियत उलेमा ए हिंद या मुस्लिम संघटनेनं चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना अजमेर 92 (Ajmer 92) चित्रपटातून अल्पसंख्यक समुदायला लक्ष्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अजमेर 92 हा चित्रपट भारताच्या इतिहासातील एका भयंकर घटनेवर आधारित आहे. ही घटना एवढी भयंकर होती की, यामुळे राजकीय सत्ताही हादरली होती. त्यात भारतातल्या मोठ्या प्रशासकीय अधिका-यांच्या मुलींना बळी करण्यात आलं. 30 वर्षांपूर्वी अजमेरमध्ये किशोरवयीन मुलींवर झालेल्या या घटनेनं खळबळ उडवली. दुदैवानं अद्यापही या घटनेतील अपराध्यांना शिक्षा झालेली नाही. याच घटनेवर आधारीत अजमेर 92 या चित्रपटाची घोषणा झाल्यावरच त्याला मोठा विरोध होणार हे गृहीत धरण्यात आलं होतं, त्याचीच सुरुवात. जमियत उलेमा-ए-हिंदने केली आहे.  

राजस्थानच्या अजमेरमध्ये 30 वर्षापूर्वी झालेल्या या घटनेची व्याप्ती एवढी मोठी होती की, त्यामुळे तत्कालिन राजकीय व्यवस्था अस्वस्थ झाली होती. यात अनेक मुलींना लक्ष करण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात अगदी काही मुली तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आल्या. यातील बहुतांश मुली या अल्पवयीन होत्या. महिला समिती नेमण्यात आली. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. मात्र आरोपींना शिक्षा झाली नाही. आता त्याच गाजलेल्या घटनेवर अजमेर 92 (Ajmer 92) हा चित्रपट येत असल्यामुळे खळबळ उडणार हे अपेक्षितच होतं. यासंदर्भात जमियतचे अध्यक्ष मौलाना मेहमूद मदनी यांनी अजमेर शरीफ दर्ग्याची बदनामी करण्यासाठी हा चित्रपट केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

पुष्पेंद्र सिंग दिग्दर्शित ‘अजमेर 92’ (Ajmer 92) मध्ये जरीना वहाब, सयाजी शिंदे, मनोज जोशी आणि राजेश शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा वास्तवावर आधारित आहे. चित्रपटात 30 वर्षापूर्वी बळी ठरलेल्या 100 हून अधिक तरुणींची कथा दाखवण्यात आली आहे.  या अल्पवयीन मुलींना  ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. वास्तवामध्ये या मुलींची संख्या जास्त असल्याचीही तेव्हा चर्चा होती. यासंदर्भात अनेक बातम्या वृत्तपत्रात येत होत्या. मात्र जशी या घटनेची चर्चा सुरु झाली, तेवढ्याच वेगानं या घटनेची चर्चा थांबली.  1992 साली अजमेरमध्ये ही घटना घडली होती, ज्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. माहितीनुसार अजमेरमध्ये सुमारे 300 मुलींना न्यूड फोटोच्या नावाखाली ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेत अजमेरमधील अनेक प्रतिष्ठित सामिल होते.  संतोष कुमार या पत्रकाराने शहरातील एका मुलींच्या शाळेतील 300 हून अधिक मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा केला.   यासंदर्भात लेख प्रसिद्ध झाल्यावर संपूर्ण देश हादरला. याच घटनेवर आता ‘अजमेर 92’ (Ajmer 92) हा चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित होत आहे.  

========

हे देखील वाचा : हिटरलच्या आठवणी

========

‘अजमेर 92’चे (Ajmer 92) दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंह आहेत. पुष्पेंद्र यांना अजमेर 92 (Ajmer 92) ही वेबसिरीज तयार करायची होती. मात्र ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’च्या प्रचंड यशानंतर ही कथा चित्रपटाच्या रूपात सादर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार चित्रपटाच्या कथेत बदल करण्यात आला. अर्थात ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे, यावर पुष्पेंद्र सिंह ठाम आहेत.  

अजमेर शहरात घडलेला हा घोटाळा अजमेर सेक्स स्कँडल’ म्हणून ओळखला जातो. हे प्रकरण देशातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल मानले जात आहे. या गैरप्रकारामुळे अनेक शाळकरी मुलींनी आत्महत्या केल्या आहेत. या मुलींवर बलात्कार करून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यापूर्वी शाळेतील निष्पाप मुलींसोबत मैत्रीचे नाटक करण्यात आले होते. यानंतर त्यांचे नग्न छायाचित्र काढून ब्लॅकमेल करून त्या मुलींना त्यांच्या मैत्रिणी, बहिणी आणि अन्य मुलींनाही आणण्यास भाग पाडण्यात आले. ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’ हे दोन्ही चित्रपट वादाच्या भोव-यात सापडले होते.  पण त्यानंतरही त्यांना यश लाभले.  आता नवा येणारा चित्रपट अजमेर 92 (Ajmer 92) हा सुद्धा वादात सापडणार आहे. त्याला ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’ या दोन चित्रपटांसारखे यश लाभते का हे जुलै महिन्यात स्पष्ट होईल.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.