Home » अरे कशाचा दाऊद…दाऊद करत बसलास; अजित पवारांचं पत्रकाराच्या प्रश्नाला भन्नाट उत्तर

अरे कशाचा दाऊद…दाऊद करत बसलास; अजित पवारांचं पत्रकाराच्या प्रश्नाला भन्नाट उत्तर

by Correspondent
0 comment
Share

भारताला हवा असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये नसल्याचे रविवारी पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले. यावर पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी भन्नाट उत्तर दिलं.

दाऊदबाबत पाकिस्तानने केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “अरे कशाचा दाऊद…दाऊद करत बसलास! दाऊदबाबत काहीतरी कोणीतरी टीव्हीला दाखवत होते. आपल्याकडील वातावरण खराब करण्याचं काम त्या टोळीनं केलं आहे. यावर केंद्र आणि संबंधित अधिकारी चर्चा करतील आणि त्याला आणण्याचा निर्णय घेतील. यावर निर्णय घेण्यात ते सक्षम असून आम्ही त्यावर वक्तव्य करणं बरोबर नाही.”

इ-पासबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, इ-पास बाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोललो असून गृहमंत्र्यांना देखील याबाबत माहिती दिली आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.