Home » राजकरणातील दादा ते घरातील मंडळींसाठी आधारवड- अजित पवार

राजकरणातील दादा ते घरातील मंडळींसाठी आधारवड- अजित पवार

by Team Gajawaja
0 comment
Ajit Pawar birthday
Share

Ajit Pawar Birthday- महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्राच्या राजकरणातील एक धडाडीचा उत्तम वक्ता म्हणून ओळख असणाऱ्या अजित पवारांना सर्वजण दादा असे म्हणतात. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे. राजकरणात शरद पवार आणि अजित पवार यांच्या जोडीची नेहमीच चर्चा असते. तर अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ मधील आहे. आता वयाची साठी जरी अजित दादांनी ओलांडली असली तरीही ते राजकरणात त्यांचा दरारा हा यापूर्वी सारखाच कायम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अजित दादांच्या कामाचे तोंडभरुन कौतुक केल्याचे आपण पाहिले. मात्र राजकरणात सक्रिय नेता ते घरातील मंडळींसाठी नेहमीच आधारवड वाटणारे दादा नेहमीच खंबीरपणे उभे राहतात हे आपण वेळोवेळी पाहिले आहे. तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त दादांबद्दल राजकरणातील किस्से नव्हे तर घरातील मंडळींसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल जाणून घेणार आहोत.

सुनेत्रा पवार- अजित पवार
सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांची पहिली भेट ही मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमावेळचीच. त्यावेळी सर्व पवार कुटुंबिय सुनेत्रांजींच्या घरी गेले होते. १ मे रोजी दादांनी सुनेत्रांजींना पाहिले आणि डिसेंबरमध्ये त्यांचे लग्न झाले. परंतु त्या दरम्यान दोघांच्या अधूमधून भेटी होत होत्याच. सुनेत्राजींना दादांमधील लग्नाला होकार देण्यापूर्वी आवडलेली गोष्ट म्हणजे ते फॅक्टरीचे डायरेक्टर तर होतेच पण त्याचसोबत ते उत्तम शेतकरी सुद्धा होते. लग्नानंतर ही दादांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले पण नेहमीच सुनेत्राजी या त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या, कारण सुनेत्राजींच्या घरातील वातावरण सुद्धा राजकराणातील होतेच. त्यामुळेच त्यांचे पवार कुटुंबियातील मंडळींशी नेहमीच जुळले.

दादा बारामतीकर असल्याने त्यांचा आवाज हा नेहमीच मोठा असतो. पण ते सर्वसाधारण त्याच आवाजात बोलतात. फक्त राग आला की, त्यांचा तापट स्वभाव हा दिसतो. मात्र मनाने ते हळवे असल्याचे सुनेत्राजींनी एका मुलाखतीत सांगितले होते. कारण घरातील मंडळींना काही झाले किंवा आजारी जरी कोण असेल तरीही त्यांचे मन हळवं होत पण ते कधीच दाखवत नाहीत. खंबीरपणे सर्वांच्या पाठीशी ते उभे राहतात. या व्यतिरिक्त वक्तशीरपणा, स्वच्छता, धडाडीने निर्णय घेण्याची क्षमता, कामाचा सखोल अभ्यास हेच गुण सुनेत्राजींना दादांमधील फार आवडतात. राजकरणात असतात तेव्हा ते त्या हिशोबाने वागतात पण घरी असल्यावर दादा हे नेहमीच एखाद्या घरातील मंडळीप्रमाणे वागतात. तर आतापर्यत मिळाले सर्वात मोठ गिफ्ट हे दादाच असल्याचे सुनेत्राजींनी नेहमीच म्हटले आहे.(Ajit Pawar Birthday)

Ajit Pawar Birthday
Ajit Pawar Birthday

सुप्रिया सुळे-अजित पवार

सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची राजकरणातील समीकरण ही नेहमीच जुळल्याची दिसून आली. परंतु सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामधील भावा-बहिणीचे नाते सुद्धा तितकेच नेहमीच हेल्थी रिलेशनशिप असल्याचे आपण वेळोवेळी पाहिले आहे. पवार कुटुंबात कोणताही कार्यक्रम असतो सर्व घरातील मंडळी ही एकत्रित येतातच. या व्यतिरिक्त अजित पवार यांच्या मुलांनी किंवा सुप्रिया सुळे यांच्या मुलांनी चुक केली तरीही हे दोघेजण एकमेकांना मुलांना तेथच्या तेथेच ओरडतात ही आणि समजावून ही सांगतात. सुप्रिया सुळेंसाठी नेहमीच दादा यांनी राजकरणात असो किंवा घरात असो त्यांनी पाठिंबा दिला आहे. जसे की एखादा भाऊ आपल्या बहिणीसाठी जे काही करता येईल त्या दृष्टीकोनातून अजित पवार हे नेहमीच सुप्रिया सुळेंसाठी करताना दिसतात.

खरंतर या दोघांमधील अधिक घट्ट नाते हे अशावेळी दिसून आले जेव्हा २०१९ मधील निवडणूक. कारण त्याचवेळी अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. हा निर्णय सर्व पवार कुटुंबियांसाठी धक्कादायक होताच. पण सुप्रिया सुळेंना दादा स्वगृही परतणार अशी आशा होतीच. त्यासाठी सोशल मीडियात ही दादांसाठी एक भावूक पोस्ट लिहिली होती. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी ‘सत्ता येत-जात असते पण संबंध फार महत्वाचे असतात. आमच्या परिवारासाठी सध्या कठीण काळ सुरुय. पण याच काळात काही लोक आमच्या समर्थनार्थ आले. अखेर अजित दादा परत स्वगृही परतल्याने सुप्रिया सुळेंनी आनंद व्यक्त केला होता. माझा दादा परत आल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे बहिण-भावाचे नाते संपूर्ण महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिले होते. तर आपले कुटुंब एकच आहे हे सुद्धा त्यांनी दाखवून दिले.

हे देखील वाचा- शिवसेने सोबत बंडखोरी केलेले ‘हे’ नेते सध्या काय करतात ?

Ajit Pawar Birthday
Ajit Pawar Birthday

शरद पवार- अजित पवार
अजित पवार यांच्या शैक्षणिक काळातच शरद पवार यांना राजकरणातील उगवता तारा म्हणून पाहिले जात होते. बारामतीकर असलेले अजित पवार प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. १९८२ मध्ये अजित पवार यांची खऱ्या अर्थाने राजकरणात एन्ट्री झाली होती. राजकरणात उतरल्यानंतर ते लोकसभेतून बारामती येथून निवडून आले होते. परंतु तेव्हा दादांनी ती जागा शरद पवारांसाठी सोडली होती. पण दादांना विधानसभेवर मात्र आमदारकी मिळाली होती. शरद पवार यांच्यासारखे राजकरणातील चहूबाजूंचा विचार आणि सखोल ज्ञान असलेले काका लाभल्याने दादा हे नेहमीच राजकरणात अधिकाधिक सक्रिय होत गेले. ज्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा सुद्धा दादांना त्यांनी मंत्री मंडळात स्थान दिले होते.(Ajit Pawar Birthday)

दरम्यान, याआधी दादा आणि शरद पवार यांच्यामधील मतभेदाचा मुद्दा हा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत राहिला होताच. पण २००४ मधील विधानसभा निवडणूकीनंतर अधिक प्रकर्षाने त्या दोघांमधील वाद अधिक दिसून आला. त्यानंतर ही त्या दोघांमध्ये वाद झालेच. पण राजकरण आणि घरातील मंडळी म्हणून शरद पवार आणि अजित दादा या दोघांमधील नाते अधिक घट्ट आहे. दोघांचा स्वभाव जरी वेगवेगळा असला तरीही ते राजकरणात पवार कुटुंबिय हे नेहमीच एकत्रित असल्याचे दाखवून देतात. तर आमच्या घरात कुटुंबप्रमुखाचा शब्द हा अंतिम मानला जातो आणि आमचे कुटुंबप्रमुख हे शरद पवारच आहेत असे ही अजित पवारांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते.

Ajit Pawar Birthday
Ajit Pawar Birthday

तर अजित पवार हे उत्तम राजकरणी आहेतच. पण त्यांची पुढची पिढी सुद्धा राजकरणातच उतरली आहे. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याला २०१९ मधील लोकसभेच्या निवडणूकीत मावळ येथून रिंगणात उतरवण्यात आले होते. पण पार्थ पवारांचा त्यामध्ये पराभव झाला होता. हे तरं झालं दादांच्या घरातील मंडळींसोबतचे नाते. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की, दादांचे सकाळच्या शपथविधी पासून ते लसीपर्यंत आणि गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतचे चर्चेत राहिलेले डायलॉग हे कोणीच विसरु शकत नाहीत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.