बॉलिवूड म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात तीन खान ! ते म्हणजे सलमान, शाहरुख आणि आमिर… वेगवेगळ्या भूमिका किंवा वेगळे विषय हाताळणारे चित्रपट तिनही खान्सने केले खरे पण इतरही बरेच अभिनेते होते ज्यांनी बॉलिवूड इंडस्ट्री आपल्या अभिनयाने, अॅक्शनने तरुन ठेवली. यातीलच एक नाव म्हणजे विशाल देवगण… कन्फ्यूज झालात? अहो म्हणजे आपला सिंघम किंवा विजय साळगांवकर साकारणारा अजय देवगण… तुम्हाला माहित आहे का… अजयने आत्तापर्यंत १०० पेक्षा अधिक चित्रपट केलेत. पण यातली एक खास गोष्ट म्हणजे अजय देवगणने तब्बल ९ वेळा बॉलिवूडमध्ये मराठी पात्र साकारलं आहे. अगदी डेब्यू चित्रपटातील अजय साळगांवकर पासून सुरु झालेला मराठी कॅरेक्टरचा त्याचा प्रवास दृश्यममधील विजय साळगांवकर पर्यंत येऊन ठेपला आहे.. आज अजय देवगणच्या याच मराठी पात्र साकारलेल्या मुव्हीजबद्दल आपण जाणून घेऊ. (Ajay Devgan)
अजय देवगणचं बालपणापासूनच बॉलिवूडशी कनेक्शन होतं… त्याचे वडिल वीरू देवगण हे अॅक्शन मास्टर… त्यामुळे लहानपणापासूनच कॅमेरा, अॅक्शन या सगळ्या गोष्टी अजय शिकला होता… आणि अभिनयाची वाट पकडून त्याने १९९१ मध्ये फुल औंर कांटे या चित्रपटातून अभिनेता म्हणून एन्ट्री केली… त्याने डेब्यूमधूनच केलेली आयकॉनिक एंट्री तर आपल्या सर्वांनाच माहीत असेल. पहिल्याच चित्रपटात अजयने मराठी पात्र साकारलं होतं ज्याचं नाव होतं अजय साळगांवकर ! (Bollywood Movies)
बॉलिवूडमध्ये प्रत्येकाच्या कॅरेक्टर्सची नावं ही त्यांची ओळख होण्याचा एक ट्रेण्ड होता जो आजही कायम आहे… म्हणजे राहूल म्हटलं की शाहरुख खान…प्रेम म्हणजे सलमान खान.. तसं अजय देवगणने आपल्याच नावाचा ब्रॅण्ड तयार केला आणि स्वत:ची ओळख निर्माण केली… त्यात त्याने नाव हे अजयच निवडलं.
तर पुन्हा येऊयात अजयच्या मराठी कनेक्शनवर… अजय देवगण आणि मराठीचं एक वेगळंच कनेक्शन आहे… त्याची सासू मराठी… त्यामुळे बायकोमुळे घरात पंजाबीसोबत मराठी वातावरण आलंच.. या सगळ्याचं रिफ्लेक्शन अजयने साकारलेल्या बऱ्याच चित्रपटांमध्येही दिसलं… मघाशी सांगितलं तसं अजयच्या डेब्यू चित्रपटाची सुरुवातच मराठी कॅरेक्टरने झाली.. त्यानंतर अजयने २००१ मध्ये आलेल्या तेरा मेरा साथ रहे या चित्रपटात राज दीक्षित हे पात्र साकारलं.. या चित्रपटात त्याने मराठी कॅरेक्टर प्ले केलं होतंच शिवाय चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. अजय सोबत चित्रपटात सोनाली बेंद्रे, नम्रता शिरोडकर, दुश्यंत वाघ, रिमा लागू, शिवाजी साटम, जयंत सावरकर आणि स्वत: महेश मांजरेकर या मराठी कलाकारांनी कामं केली होती.(Ajay Devgan)
त्यानंतर, २००४ मध्ये आलेल्या खाकी चित्रपटात त्याने व्हिलन यशवंत आंग्रे ही भूमिका साकारली होती.. मग, आला आपल्या सगळ्यांचा आवडता सिंघम … रोहित शेट्टीने २०११ मध्ये सिंघमपासून कॉप युनिवर्स बॉलिवूडमध्ये आणलं.. आता पोलिस म्हणजे मराठी माणूस हवाच.. त्यामुळे अजय देवगणने साकारला बाजीराव सिंघम … आणि हे मराठी पात्र इतकं लोकप्रिय झालं की आजही त्याची क्रेझ वाढतच आहे… त्याच वर्षात म्हणजे २०११ मध्ये रास्कल्स हा चित्रपट आला होता ज्यात अजयच्या कॅरेक्टरचं नाव भगत भोसले होतं… एकीकडे बाजीराव सिंघम हे पोलिस पात्र साकारणारा अजय रास्कल्स चित्रपटात चोराच्या म्हणजे अगदी उलट भूमिकेत दिसला होता. (Top Stories)
अजयने साकारलेल्या सिंघमच्या फिव्हरमधून आपण बाहेर येत होतोच तितक्यात २०१५ मध्ये अजयने दृश्यम चित्रपटातून विजय साळगांवकर हे स्ट्रॉंग मराठी कॅरेक्टर सादर करत प्रेक्षकांना पुन्हा एकदा बुचकळ्यात पाडलं. मग २०२० मध्ये आला तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावरील ऐतिहासिकपट ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ ज्यात अजयने सुभेदार तान्हाजी मालूसरेंची भूमिका उत्कृष्टरित्या सादर केली. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात काजोल, शरद केळकर, देवदत्त नागे, अजिंक्य देव, शिवराज वाळवेकर या मराठी कलाकारांनी कामं केली होती. कथा तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची होतीच पण त्याचं दिग्दर्शन ते अगदी माय भवानी हे गाणंही अजय अतूल या जोडीने केलं होतं.. (Ajay Devgan)
मग २०२१ मध्ये आलेल्या भूज चित्रपटात अजयने squadron leader विजय कर्णिक ही भूमिका साकारली होती. आणि शेवटी २०२४ मध्ये औरो में कहा दम था या चित्रपटात कृष्णा हे कॅरेक्टर त्याने प्ले केलं होतं ज्यात मराठमोळ्या चाळ संस्कृतीत राहणारा कृष्णा आणि त्याचं आयुष्य चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. यात तब्बू त्याची नायिका होती आणि तब्बूच्या तरुणपणीची भूमिका सई मांजरेकर हिने केली होती…(Bollywood Movies)
================
हे देखील वाचा : World Luckiest Man : तो सात वेळा मरणाच्या दारात होता.. पण वाचला कसा ?
================
आजवर १०० पेक्षा अधिक चित्रपट अजय देवगण (Ajay Devgan) याने केले पण त्यात त्याने मराठी कॅरेक्टर्स सादर करुन चाहत्यांची विशेष मनं जिंकली.. इतकंच नाही तर आपला माणूस या मराठी चित्रपटाची त्याने निर्मिती केली होती आणि त्यात नाना पाटेकर यांच्या मुलाची भूमिकाही त्याने साकारली होती.. एकीकडे सगळे खान मंडळी असूनही दुसरीकडे विविध पात्र साकारुन आपलं स्वत:च कलाविश्व आणि फॅन फॉलोईंग अजय देवगण याने तयार केली. चित्रपटांमधून हिंदीत अमराठी असूनही मराठीपण जपणारा हा कलाकार आहे यात शंकाच नाही…(Top Stories)
अजय असा स्थिर गंभीर चेहऱ्याचा असूनही त्याने फुल औंर कांटे चित्रपट केला आणि ऑल द बेस्ट, किंवा गोलमालची फ्रेंचायझी असे विनोदी चित्रपटही केले.. अॅक्शन आणि स्टंट हिरो अशी ओळख १९९१ पासून आज २०२५ पर्यंत कायम टिकवून ठेवणाऱ्या आणि अजय ते विजय ही नावं जरी वेगळी असली तरी साळगांवकर हे आडनाव कायमस्वरूपी प्रेक्षकांना लक्षात राहील.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
.