व्हाइट हाउसने माहिती देत असे सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांनी घोषणा केली आहे की, जनरल अटलांटिकचे वाइस चेअरमन अजय बंगा (Ajay Banga) यांना वर्ल्ड बँकेच्या प्रमुख पदासाठी निवडले गेले आहे. या नॉमिनेशन नंतर अजय बंगा वर्ल्ड बँकेचे नवे चीफ बनू शकतात. व्हाइट हाउसने बांगा यांच्याबद्दल सांगताना असे म्हटले की, भारतीय-अमेरिकन व्यावसायिक लीडर ग्लोबल ऑर्गनाइजेशनचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे. इतिहासात ही एक विशिष्ट रुपात महत्वपूर्ण क्षण आहे. तर वर्ल्ड बँकेने सध्याचे चीफ डेविड मलपास यांनी पद सोडण्याची घोषणा केली आहे. अजय बांगा यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास तर त्यांना जगात बड्या पदांवर काम केले आहे. सध्या ते अटलांटिकच्या व्हाईस चेअरमॅनच्या पदावर कार्यकरत आहेत. त्याचसोबत मासेक मध्ये Exor चे अध्यक्ष आणि स्वतंत्र निर्देशक आहेत.
कोण आहेत अजय बंगा?
अजय बंगा यांचे पूर्ण नाव अजयपाल सिंह बंगा आहे. त्यांचा जन्म १० नोव्हेंबर १९५९ मध्ये पुण्यातील खडकी मध्ये झाला होता. त्यांचा परिवार हा मूळचा पंजाब मधील जालंधर येथील आहे. मात्र ते अमेरिकेत राहतात. अजय बंगा यांचे वडिल भारतीय सैन्यात लेफ्टिनेंट-जनरलच्या पदावर कार्यरत होता. तर त्यांचा भाऊ एमएस बंगा हे युनिलीवरमध्ये एका मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
अजय बंगा यांचा अनुभव
अजय बंगा (Ajay Banga) यांचे शिक्षण आणि अनुभवाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी आपले बीए ओनर्स इकोनॉमिक्सचे शिक्षण दिल्लीतील युनिव्हर्सिटीतून घेतले आहे. त्यानंतर बंगा यांनी IIM अहमदाबाद मधून मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. तसेच अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी कमीशनमध्ये सदस्याच्या रुपात ही त्यांनी काम केले आहे. अजय बंगा यांनी युएस-इंडिया बिझनेस काउंसिलच्या अध्यक्षाच्या रुपात ही काम केले. सध्या ते इक्विटी फर्म जनरल अटलांटिक मध्ये व्हाईस चेअरमनच्या आधारावर काम करत आहेत. बंगा यांनी सेंट्रल अमेरिकेसाठी सह-अध्यक्षाच्या रुपात अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यासोबतही काम केले आहे.
हे देखील वाचा- ४ लाख महिन्याला पगार, हॉलिडे ट्रिप तरीही नोकरीसाठी कोणीही तयार नाही, पण का?
काही पुरस्काराने सन्मानित
अजय बंगा यांना त्यांच्या कामासाठी काही पुरस्कार ही मिळाले आहेत. २०१२ मध्ये बंगा यांना फॉरेन्स पॉलिसी असोसिएशन मेडल, २०२६ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार, २०१९ मध्ये एलिस आयलँन्ड मेडल ऑफ ऑनर आणि बिझनेस काउंसिल फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँन्डिंग ग्लोबल लीडरशिपचा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांना सिंगापुर पब्लिक सर्विसच्या प्रतिष्ठीत मित्र अवॉर्डने ही सन्मानित करण्यात आले आहे.