Home » Ekadshi : भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ‘अजा एकादशी’

Ekadshi : भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ‘अजा एकादशी’

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ekadshi | Top Stories
Share

एकादशीची तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे आणि सर्व व्रतांपैकी एकादशी व्रत सर्वात मोठे मानले जाते. प्रत्येक महिन्यात दोन अशा वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात. प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला देखील मोठे महत्व आहे. भाद्रपद महिन्यातील एकादशीला अजा एकादशी म्हणतात. या महिन्यातील एकादशीचे विशेष महत्त्व आहे. असे सांगितले जाते की, या एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते. अजा एकादशीला स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व मानले जाते. ही एकादशी भगवान विष्णूची सर्वात आवडती एकादशी मानली जाते. शिवाय ही एकादशी जन्माष्टमीच्या चार दिवसानंतर येते. (Marathi News)

अजा एकादशी कधी आहे?
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी अजा एकादशी साजरी केली जाते. अजा एकादशीच्या दिवशी, भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवास देखील केला जातो. हे व्रत पाळल्याने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. तसेच, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंद आणि सौभाग्य वाढते. अजा एकादशीचा शुभ मुहूर्त वैदिक कॅलेंडरनुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी १८ ऑगस्ट सोमवार रोजी सायंकाळी ०५.२२ वाजता सुरू होईल. (Aja Ekadshi)

तर एकादशी तिथी १९ ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी ०३.३२ वाजता संपेल. सनातन धर्मात, उदय तिथीपासून गणना होते. यामुळे अजा एकादशी १९ ऑगस्ट मंगळवार रोजी साजरी केली जाईल. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेचा मुहूर्त सकाळी ९ वाजून ०८ मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी २ वाजून ०२ मिनिटांपर्यंत असेल. अजा एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग आणि सिद्धी योग तयार होत आहेत. या शुभ योगांमध्ये भगवान नारायणाची पूजा केल्याने सर्व त्रास आणि समस्यांपासून सुटका होते. (Todays Marathi Headline)

अजा एकादशी पूजा विधी
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूर्व दिशेला चौरंगावर पिवळे कापड पसरून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावा आणि कलश ठेवा. यानंतर भगवान विष्णूला फळे, पिवळी फुले, सुपारी, नारळ इत्यादी अर्पण करून आरती करावी. ओम अच्युते नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करा. दिवसभर व्रत करा आणि संध्याकाळी विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा यासोबतच अजा एकादशीची व्रत कथा ऐका. यानंतर फलाहार करा. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजनदान करून आणि गरजू व्यक्तीला दान देऊन उपवास सोडता येतो. अजा एकादशीच्या दिवशी, “उपेंद्राय नमः, ओम नमो नारायणाय मंगलम् भगवान विष्णू, मंगलम गरुध्वज. मंगलम् पुंडरीकाक्ष, मंगलय तनोहरिः।” या मंत्राचा जप करावा. (Top Marathi Headline)

Ekadshi

एकादशी व्रत महत्त्व
अजा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला अनेक फायदे होतात. पद्मपुराणानुसार जी व्यक्ती अजा एकादशीचे व्रत करते तो सर्व पापांपासून मुक्त होतो. अजा एकादशी व्रताच्या प्रभावामुळे माणसाची पापे नष्ट होतात. तसेच मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो, असेही मानले जाते की हे व्रत केल्यास अश्वमेध यज्ञ केल्याचे शुभ फल प्राप्त होते. (Top Trending News)

अजा एकादशीची कथा
पौराणिक काळात हरिश्चंद्र नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करत होतो. राजा त्याच्या सचोटी आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होता . एकदा देवांनी त्यांची परीक्षा घेण्याची योजना आखली. राजाने स्वप्नात पाहिले की त्याने आपले राज्य विश्ववामित्र ऋषींना दान केले आहे. एके दिवशी राजाने आपले वचन पाळण्यासाठी आणि मागच्या जन्मातील कर्माच्या परिणामामुळे आपला मुलगा आणि पत्नी यांना विकले. स्मशानभूमीत लोकांच्या अंत्यसंस्काराचे काम करणाऱ्या चांडाळाने हरिश्चंद्राला विकत घेतले. (Latest Marathi News)

तो स्वतः चांडालचा गुलाम झाला. त्या चांडाळातून कफन घेण्याचे काम त्यांनी केले. परंतु, त्याने सत्य कधीही सोडले नाही. बरीच वर्ष निघून गेल्यानंतर त्याला आपल्या या कृत्याबद्दल वाईट वाटले. तो या सगळ्यातून सुटण्याचा मार्ग शोधू लागला. गौतम ऋषी आपल्या जवळ पोहोचावे असे त्याला वाटत असताना ते समोर आले. हरिश्चंद्राने त्याला प्रणाम केला आणि त्याच्या दु:खाची गोष्ट सांगू लागला. (Top Marathi News)

राजा हरिश्चंद्राची दु:खद कथा ऐकून महर्षि गौतमही दु:खी झाले. तेव्हा ते राजाला म्हणाले. हे राजा! श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव अजा एकादशी आहे. या एकादशीला विधीप्रमाणे व्रत करा तसेच रात्री जागरण करुन पारायण करा. यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होतील. असे सांगून महर्षी गौतम अंतर्धान पावले. अजा एकादशी आली तेव्हा राजा हरिश्चंद्राने महर्षींच्या सल्ल्यानुसार विधीवत व्रत आणि पारायण केले. या व्रताच्या प्रभावाने राजाची सर्व पापे नष्ट झाली. तसेच स्वर्गात ढोल वाजू लागले आणि फुलांचा वर्षाव सुरू झाला. राजाला समोर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि देवेंद्र असे देव उभे राहिलेले दिसले. आपला मृत मुलगा जिवंत पाहिला आणि त्याची पत्नी शाही वस्त्रे आणि दागिने परिधान केलेली दिसली. (Top Stories)

==============

हे देखील वाचा : Shrikrushna : श्रीकृष्णांचा मृत्यू कसा झाला?

===============

व्रताच्या प्रभावामुळे राजाला त्याचे राज्य परत मिळाले. ऋषींनी हे सर्व राजाची परीक्षा घेण्यासाठी केले होते, परंतु अजा एकादशीच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे ऋषींनी निर्माण केलेला सर्व भ्रम संपला आणि शेवटी हरिश्चंद्र आपल्या कुटुंबासह स्वर्गात गेले. जे लोक हे व्रत नियमितपणे पाळतात आणि रात्री जागरण करतात, त्यांची सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी त्यांना स्वर्ग प्राप्त होतो. या एकादशी व्रताची कथा नुसती श्रवण केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते. (Social Updates)

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.