सर्वसामान्यांसाठी विमान प्रवास हा १९५० च्या आसपास सुरु झाला. परंतु तेव्हा विमानाचा वेग हा थोडा कमी होता आणि खिडक्या या चौकोनी आकाराच्या होत्या. परंतु काही वर्षानंतर जेव्हा विमानाचा वेग वाढू लागला तेव्हा २ विमान अपघात झाले. १९५३ मध्ये २ विमानांचे हवेतच नुकसान झाले. या दोन्ही घटनांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला. विमान क्रॅश होण्याचे कारण म्हणजे विमान हे सामान्य लोकांसाठी उडण्यासाठी सुरु झाली होती. तेव्हा त्यामध्ये चौकोनी खिडक्या होत्या. याच खिडक्यांमुळे हे विमान क्रॅश झाले होते. (Airplane window)
या घटनेनंतर वैज्ञानिकांनी विमानाच्या खिडक्यांमध्ये काही बदल करण्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या खिडक्या या गोलाकार किंवा उभटं गोलाकार करण्यात आल्या. नेहमीच आपण विमानातील खिडकीच्या जागेवर बसणे पसंद करतो. परंतु आपले कधी लक्ष त्यांच्या गोलाकार खिडक्यांकडे जात नाही. किंवा त्यांचा आकार असा का असतो असा प्रश्न ही पडत नाही. तर जाणून घेऊयात यामागील कारणं काय आहेत.
तज्ञांच्या मते, जर खिडक्यांचा आकार चौकोनी असतील तर त्या मजबूत नसतात. कारण अशा पद्धतीचे डिझाइनमध्ये ४ कमकुवत स्पॉट असतील आणि त्यावर प्रेशर पडल्यानंतर व हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना तडा जाऊ शकतो. मात्र गोलाकार असतील तर त्यावर पडणारे प्रेशर हे विभागले जाते आणि खिडक्यांना तडा जाण्याची संभावना कमी होते.
हे देखील वाचा- फ्लाइटमध्ये एअर हॉस्टेस चहा-कॉफी का पीत नाहीत? जाणून घेऊयात काही सीक्रेट्स
चौकोनी खिडक्या या गोलाकार खिडक्या कशा झाल्या यामागे काही कारणं ही सांगितली जातात. पहिले कारण असे की, आपण जसे पाहिले सुरक्षिततेच्या कारणास्तव. आकाशात उड्डाण केल्यानंतर विमानाच्या आतमध्ये आणि बाहेर सुद्धा हवेचे प्रेशर असते. गोलाकार खिडकी असेल तर हवेचा दबाव बदलण्याच्या स्थितीत डॅमेज होण्याचा धोका हा उद्भवत नाही. विमानाची गती वाढल्यास आणि अधिक उंचीवर उड्डाणाच्या कारणास्तव त्यावर अधिक दबाव वाढला जातो. (Airplane window)
१९५० च्या दशकात विमान ही धिम्या गतीने चालत होते. त्यासाठी इंधनाचा खर्च सुद्धा अधिक यायचा आणि वेळ ही अधिक लागायचा. विमानाचा ट्रेंन्ड जेव्हापासून वाढला तेव्हा विमान कंपन्यांनी त्यांच्या ऑपरेटिंगचा खर्च कमी करण्याचा त्याचा वेग वाढवला. त्यानंतर वाढत्या वेगामुळे वेगाचा दाब कमी करण्यासाठी खिडक्या या गोलाकार करण्यात आल्या. तर चौकोनी खिडक्यांपेक्षा गोल खिडक्याही चांगल्या दिसतात.