जगभरात प्रत्येक वर्षाला १५ लाख लोकांचा वेळेआधीच मृत्यू होण्याचे कारण वायू प्रदुषण असू शककते. एका अभ्यासत असे समोर आले की, वायू प्रदुषणाचा कमी स्तर हा विचारापेक्षा ही खतरनाक आहे. डब्लूएचओने नुकत्याच केलेल्या अध्ययनानुसार, प्रत्येक वर्षी वायू प्रदुषणाच्या बारीक कणांच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यास ४२ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू वेळीआधीच होतो. (Air Pollution Deaths)
साइंस एडवांसेज मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासातून असे कळते की, प्रदूषण या बारीक कणांच्या संपर्कात आल्याने जगभरात होणाऱ्या प्रत्येक वर्षातील मृत्यूचा आकडा हा अधिक असू शकतो. केवळ सूक्ष्मदर्शीने पाहू शकतो असे कण हृदय किंवा श्वसन संबंधित आजार आमि कॅन्सरचे कारण असू शकते. कॅनडात मॅकगिल युनिव्हर्सिटीत सहाय्याक प्रोफेसर आणि मुख्य अनुसंधानकर्ता स्कॉट विचेंथल यांनी असे म्हटले की, बाहेरच्या सूक्ष्म कणांमुळे जगभरात १५ लाखांपेक्षा अधिक मृत्यू होऊ शकतात.

प्रदुषणासाठी भारताकडून मागितली मदत
मिस्रच्या शर्म अल-शेख मध्ये सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्र जलवायू शिखर सम्मेलन COP27 दरम्यान भारत आणि चीन कडून मदतीची मागणी करण्यात आली आहे. द्वीपीय देश अँन्टीगुया आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी असे म्हटले की, मोठ्या स्तरावरच्या प्रदुषणासाठी अर्थव्यवस्था जबाबदार आहे.
दरम्यान, हवेतील विषारी घटकांचे प्रमाण मोजण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्स पाहिला जातो. तर दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स पाहिल्यास तो खुप आहे. प्रदुषणामुळे हवेतील सूक्ष्म कण ज्याला पी एम पार्टिक्युलेट मॅटर किंवा पी एम २.५ असे म्हटले जाते त्याबद्दलचाच हा वरील रिपोर्ट आहे. याआधी करण्यात आलेल्या संशोधनात हवेतील सूक्ष्म किंवा दूषित घटक हे आरोग्यासाठी हानिकारक नव्हते. मात्र आता त्याची संख्या खुप वाढल्याने लाखोंच्या घरात लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (Air Pollution Deaths)
हे देखील वाचा- शरिरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यास होऊ शकतात ‘या’ समस्या, वेळीच काळजी घ्या
७० लाख कॅनडिन लोकांवर झाला अभ्यास
संशोधकांनी देशभरात पी एम २.५ संदर्भात पंचवीस वर्षाच्या कालावधीत एकत्रित झालेल्या ७० लाख कॅनेडियन लोकांच्या आरोग्य आणि मृत्यू दरासंदर्भात अभ्यास केला आहे. अभ्यासात असे अधिक स्पष्टपणे दिसले की, वायू प्रदुषण जागतिक स्तरावर आरोग्याला कशा प्रकारे प्रभावित करते.
दरम्यान, दिल्लीतील वायु प्रदूषणाचे प्रमाण अधिक वाढल्याने महामार्ग, रस्ते, उड्डाणपूल, बांधकाम अशा सार्वजनिक कामांना स्थगिती दिली गेली आहे. तर कार्यालयातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्यास सांगितले गेले आहे. शाळा, महाविद्यालयांना या स्थितीमुळे सुट्टी दिली गेली आहे.