गोलमटोल चेहरा, लांबलचक मिशी, तुरा असलेली पगडी, लांब नाक आणि लाल रंगाचे वस्र… असलेल्या व्यक्तीला तुम्ही ओळखलेच असेल. खरंतर एयर इंडियाचा महाराजाबद्दल आपण बोलत आहोत. एयर इंडियाच्या महाराज हा विमानसेवेची एक शान बनला आहे. याची सुरुवात टाटा यांनी केली होती आणि काही वर्षांपर्यंत फिरून फिरून पुन्हा टाटांकडेच आला. एयर इंडियाचा लूक बदलत आहे. कंपनी कोट्यावधी रुपये खर्च करुन एयर इंडियाचे इंटिरियर, कॅबिनमध्ये बदल करणार आहे. ब्रँन्डिंगची जबाबदारी लंडनच्या कंसल्टेंसी फ्यूचरब्रांन्ड्सला दिली गेली आहे. एयर इंडियाच्या मेकओवरमध्ये महाराजा आता बदलला जाणार आहे. भले त्याचा लूक बदलला जाई पण पगडी असणारा महाराज हा नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत राहिल. एयर इंडिया प्रमाणे त्याच्या महाराजाची कथा सुद्धा फार जुनी आहे. (Air India logo maharaja)
एयर इंडियाचे महाराजा इंडियन एयरलाइन्सची शान बनले आहे. १९६४ पासून एयर इंडियासोबतचा त्यांचा प्रवास सुरु झाला होता. जेआरडी टाटा यांनी जेव्हा टाटा एयरलाइन्सची सुरुवात केली होती तेव्हा त्यासाठी एक खास लोगो तयार करण्याची जबाबदारी मार्केटिंगचे जादूगर म्हटल्या जाणाऱ्या बॉबी कूका यांना दिली होती. त्यांनी केवळ अशीअट ठेवली होती की, असा लोगो बनवा की, जो केवळ अनोखाच नव्हे तर त्यात भारतीयतेची ओळख सुद्धा असेल. तो राजासारखा हवा पण शाही नको. जेआरडी टाटा यांनी दिलेल्या सुचनांनुसार बॉबी कुका यांनी लोगोवर काम करण्यास सुरुवात केली.
बॉबी कूका आणि त्यांचा मित्र उमेश रॉव यांनी यावर काम करण्यास सुरु केले. महिन्यांच्या मेहनतीनंतर लोगो तयार झाला. फार कमी लोकांना माहिती आहे की, त्याचे पाकिस्तानाशी कनेक्शन आहे. खरंतर कूका आणि जेआरटी टाटा यांच्यात मैत्री होतीच. पण त्यांचा आणखी एक मित्र सैयद वाजिल अली साहिब हा लाहौरमध्ये रहायचा. पाकिस्तानातील मोठ्या व्यवसायात तो होता. व्यवसायाच्या कामासाठी तो मित्र मुंबईत आला होता. त्याची अनोखी पर्सनालिटी होती. लांब-रुंद खांदे, वाढलेल्या मिश्या, चेहऱ्यावर एक वेगळीच ओळख होती. तुरा असलेली पगडी. त्याला भेटल्यानंतर कूका यांना आपला लोगो कसा असावा याचा क्लू मिळाला. पाकिस्तानचे उद्योगपति सैयद वाजिद अली साहिब यांची प्रेरणा घेत त्यांनी महाराजाचा लोगो तयार केला. (Air India logo maharaja)
हेही वाचा-Success Story: नेत्रहिन असूनही इतरांच्या आयुष्याला प्रकाश देणारे- भावेश भाटिया
सैयद वाजिद अली साहिब हे पाकिस्तानातील बडे उद्योगपती होते. त्यांच्या मिश्या चेहऱ्याला अधिक आकर्षक बनवायच्या. रुबाबदार पर्सनालिटी, मात्र तेवढाच मित्रत्वाचा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या पर्सानिटीमुळे प्रभावित होत बॉबी कूका यांनी एयर इंडियाच्या मस्कटला तयार केले आणि नाव दिले ‘महाराजा’. 1964 मध्ये एयर इंडियाच्या मुंबई ऑफिसमध्ये महाराजाचा पहिला कटआउट लावण्यात आले होते. जे हळूहळू ऐवढे प्रसिद्ध झाले की, एयर इंडियाची ती ओळख बनली गेली.