भारतात अशी अनेक मंदिरे आहेत, ज्यांच्यामध्ये शिलालेख आहेत. हे शिलालेख या मंदिरांप्रमाणेच जुने आहेत. त्यांना ऐतिहासिक वारसा आहे. आणि त्यात आपल्या संस्कृतीच्या वैभवाचे अनेक दाखले लिहिण्यात आले आहे. मुळात हिंदू संस्कृती किती व्यापक होती, याचा पुरावा म्हणजेच हे शिलालेख आहेत. मात्र हे सर्व शिलालेख ज्या लिपीमध्ये आहेत, ती लिपी आता वाचता येत नाही. भारतात आढळणारे शिलालेख आणि त्यातील लिपीचा उलगडा करण्याचा आतापर्यत अनेकवेळा प्रयत्न करण्यात आला. पण तो फोल ठरला आहे. या शिलालेखांमधील लिपी आणि त्याद्वारे त्यातून मजकूर समजला तर ऐतिहासिक काळातील अनेक गुढ उघड होणार आहेत. आता यासाठी AI तंत्रज्ञान (AI Technology) मदतीस येणार आहे. AI प्रणालीतून 5000 वर्षे जुनी लेखन पद्धती जाणून घेता येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारतातील अनेक शिलालेखांचे वाचन सुलभ होणार आहे.
शिलालेख म्हणजे दगडावर अथवा शिळेवर कोरून ठेवलेला मजकूर. हजारो वर्षापूर्वी माहितीचे संकलन करण्यासाठी ती माहिती, तत्कालीन लिपीत दगडावर कोरून ठेवण्याची पद्धत होती. त्याला शिलालेख म्हटले जाते. भारतात अनेक ठिकाणी असलेल्या या शिलालेखांमध्ये राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक माहिती कोरुन ठेवण्यात आली आहे. 5000 हजार वर्ष आणि त्याहून अधिक वर्षापासून लिहून ठेवलेला हा अमुल्य माहितीचा खजिना आता AI तंत्रज्ञानाच्या (AI Technology) माध्यमातून जाणता येणार आहे. असे झाल्यास AI तंत्रज्ञानापासून मिळणारी ही सर्वात मोठी भेट ठरणार आहे.

यासंदर्भात काम करणा-या एका संगणक शास्त्रज्ञाने सांगितले की, एआयच्या मदतीने सर्वात जुनी लेखन प्रणाली समजण्यासाठी काम करण्यात येत आहे. या शिलालेखांवरील लिपी समजण्यासाठी खास टूल बनवण्यात येत आहे. असे झाल्यास एआय एका क्लिकवर 5000 वर्ष जुन्या लिपींचा उलगडा करु शकते. शिलालेखांवरील ही लिपी सर्वात जुनी असल्याचे मानले जाते. आतापर्यंत जगभरातील केवळ हातावर मोजण्याइतकेच भाषातज्ञ या लिपीचा उलगडा करु शकले आहेत. तरीही जगभरात असलेल्या अनेक शिलालेखांचे कोडे अद्यापही बाकी आहे. भारतात तर अनेक पुरातन मंदिरांमध्ये असे शिलालेख जागोजागी आढळतात. (AI Technology)
ही लिपी डिकोड करण्याचा प्रयत्न आतापर्यंत अनेकांनी केला आहे. मात्र आता इस्रायलमधील पुरातत्वशास्त्रज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञांच्या टीमने प्राचीन अक्काडियन क्यूनिफॉर्मसाठी एआय-संचालित अनुवाद कार्यक्रम तयार केला आहे. ज्याच्या मदतीने एका क्लिकवर त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर होऊ शकणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने 5000 वर्षे जुन्या लेखन पद्धतीचे भाषांतर झाले तर जगभरातील असेच शिलालेख वाचता येणार आहे. हा मानवी इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानण्यात येईल. (AI Technology)
जागतिक स्तरावर, ग्रंथालये, संग्रहालये आणि विद्यापीठांमध्ये अर्धा दशलक्षाहून अधिक शिलालेख आहेत. शिवाय जगभरातील ऐतिहासिक वास्तूंमध्येही असेच शिलालेख आहेत. भारतातही अनेक किल्ल्यांवर शिलालेख असल्याचे निदर्शनास येते. ही लिपी, चित्रलिपी असल्याचेही काही तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र आता एआय तंत्रज्ञान या लिपीचा डिकोड करण्यासाठी काम करत आहे. जसे Google Translate मधून जगभरातील कुठलीही भाषा आपल्याला समजणा-या भाषेत वाचता येते. तसेच भाषांतर AI तंत्रज्ञानावर (AI Technology) होत आहे. या तंत्रज्ञानासाठी जगभरातील पुरातत्वशास्त्रज्ञांनी शुभेच्छा दिल्या असून यातून आपल्या पूर्वजांनी साकारलेल्या शोधांचीही माहिती होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
=========
हे देखील वाचा : जगातील अशी शाळा जेथे ४७० वर्षांपासून बदललेला नाही विद्यार्थ्यांचा युनिफॉर्म
=========
या प्रोजेक्टवर काम करणा-या एका शास्त्रज्ञाच्या मते, हे जेव्हा प्रत्यक्षात साकारेल तेव्हा कुठल्याही शिलालेखावरील मजकूर जाणण्यासाठी अक्कडियन समजून घेण्याची आवश्यकता नाही. तर त्यासाठी एक फोटोच उपयोगी होईल. यातून या शिलालेखातील मजकूर आपल्याला हव्या त्या भाषेत वाचता येणार आहे. इस्त्रायलमध्ये चालू असलेल्या या संशोधनाचा भारताला मोठा फायदा होणार आहे. भारतात, अशोकस्तंभ, आणि लेण्यांच्या भिंतींवर कोरलेल्या शिलालेखांचा संग्रह आहे. असेच अनेक शिलालेख सध्याच्या पाकिस्तान, नेपाळ आणि भारत या सर्व देशांमध्ये विखुरलेले आहेत. सम्राट अशोकाच्या काळात भारतात सर्वाधिक शिलालेख लिहिले गेले. या सर्व शिलालेखांचे गुढ उलगडण्याचा प्रयत्न झाला. पण त्यात यश आले नाही. आता या नव्या तंत्रज्ञानातून हा अमुल्य खजिना सर्वांनाच माहिती होणार आहे.
सई बने