‘हॅरी पॉटर’ (Harry Potter) हे नाव कानी पडताच प्रत्येक मुलांच्या चेह-यावर आनंद पसरतो. जेके रोलिंग यांच्या हॅरी पॉटर या पुस्तकानं मुलांना नव्यानं वाचनसंस्कृतीची ओळख करुन दिली. या जादूची भूरळ लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही पडली. नंतर या हॅरी पॉटरवर चित्रपटही आले आणि मग हा हॅरी प्रत्येक घराघरात दिसू लागला. आता या हॅरीची जादू पुन्हा एकदा चालणार आहे. कारण हॅरी पॉटरवर लवकरच एक टिव्ही मालिका येणार आहे. या टिव्ही मालिकेचा टीझर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत, मुलांना सुट्ट्या पडल्या आहेत, अशावेळी हॅरी पॉटरची मालिका येत असल्यामुळे मुलांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. त्यामुळेच हॅरीच्या टीझरला लाखो लाईक मिळत आहेत.

हॅरी पॉटरची (Harry Potter) जादू किती आहे, याचा अंदाज पुन्हा एकदा आला आहे. टिव्ही मालिकेच्या स्वरुपात येणा-या या हॅरी पॉटरला पुन्हा मोठा पाठिंबा मिळत आहे. जेके रोलिंग यांच्या या पुस्तकांनं अनेक विक्रम केले आहेत. या लोकप्रिय पुस्तकाचे चाहते सर्व वयोगटातील आहेत. या पुस्तकावर तयार झालेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले आहेत. आता हाच हॅरी पॉटर टिव्हीचा छोटा पडदाही काबिज करायला तयार झाला आहे. हॅरी पॉटर (Harry Potter) या चित्रपटाचे रुपांतर आता टीव्ही मालिकेच्या स्वरुपात होत आहे. या मालिकेची घोषणा एचबीओ मॅक्सने केली आहे. त्यामुळे लेखक जेके रोलिंग यांच्या या जादूई पुस्तकाची पुन्हा नवी जादू सर्वत्र पसरणार आहे.
जगभरात हॅरी पॉटरच्या चाहत्यांची कमतरता नाही. हॅरी पॉटर (Harry Potter) चित्रपटांमध्ये जादू, प्रेम आणि मैत्रीची कथा आहे. सर्वच वयोगटातील वाचकांना या पुस्तकांनी वेड लावले. नंतर यावर चित्रपट आले आणि मग या चित्रपटानं बॉक्स ऑफीसवर अनेक रेकॉर्ड केले. हॅरी पॉटरवरील लोकांचे प्रेम पाहून चित्रपट निर्मात्यांनी त्याचे टिव्ही मालिकेत रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. हॅरी पॉटरवरील ही टीव्ही मालिका आता एचबीओ मॅक्सवर प्रसारीत होणार आहे. लेखक जेके रोलिंग यांनी लिहिलेली हॅरी पॉटर ही प्रसिद्ध कल्पनारम्य कादंबरीवरील ही टीव्ही मालिका चित्रपटाच्या चाहत्यांना आणि नवीन पिढीला तेवढीच आवडेल अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. हॅरी पॉटर हे हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन (2001) पासून सुरू होणारे चित्रपट हॅरी पॉटर (Harry Potter) अँड द डेथली हॅलोज – भाग 2 (2011) असे आठ भाग आहेत. या चित्रपटांची निर्मिती डेव्हिड हेमन यांनी केली. यातून डॅनियल रॅडक्लिफ, रुपर्ट ग्रिंट आणि एम्मा वॉटसन ही तीन प्रमुख पात्र हॅरी पॉटर, रॉन वेस्ली आणि हर्मिओन ग्रेंजर म्हणून एवढी परिचित झाली की या कलाकारांची मुळ नावं वगळून त्यांना हॅरी पॉटरमधील पात्रानुसार बोलवण्यात येऊ लागलं होतं. या चित्रपटाच्या मालिकेत चार दिग्दर्शकांनी काम केले आहे. त्यात ख्रिस कोलंबस, अल्फोन्सो कुआरोन, माइक नेवेल आणि डेव्हिड येट्स यांचा समावेश आहे. हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज, या मालिकेतील सातवी आणि शेवटची कादंबरी, दोन वैशिष्ट्य-लांबीच्या भागांमध्ये रूपांतरित करण्यात आली. या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर सर्व रेकॉर्ड तोडले. जगभरात $7.7 बिलियन कमाई या चित्रपटांच्या मालिकेनं केली आहे.
======
हे देखील वाचा : ‘सिंहासन’ची बदलेली ४४ वर्ष… जेव्हा शरद पवार प्रीमियर शो ला येतात
======
हॅरी पॉटर (Harry Potter) या पुस्तकांनी जेके रोलिंगचे आयुष्यही एकदम बदलले. एकेकाळी रोलिंगकडे स्वतःचे घर नव्हते. पण आता रोलिंग हॅरी पॉटर या पुस्तकांच्या मालिकांमुळे सर्वात श्रीमंत लेखिका म्हणून ओळखली जाते. वॉर्नर ब्रदर्सने या पुस्तकावर चित्रपट काढण्याची योजना आखली. सुरुवातीला ही जादूई कथा चित्रपटात बसू शकत नाही अशे वाटत होते, मात्र नंतर हॅरी पॉटरचे (Harry Potter) चित्रपट आल्यावर चित्रपट आणि पुस्तक या दोघांनाही हॅरीच्या चाहत्यांनी पसंती दिली. यातील हॅरी, रॉन आणि हरमायनी ही तीनही पात्र पहिल्या भागात जी होती, त्यांनीच अखेरच्या भागापर्यंत या चित्रपटात काम केले. हे सुद्धा चित्रपटाचे वैशिष्ट ठरले. आता हेच हॅरी, रॉन आणि हरमायनी आता सुट्ट्यामध्ये पुन्हा बच्चे मंडळींना घराघरात भेटायला येणार आहेत.
सई बने