अमेरिका आणि चीन या दोन शक्तीशाली देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्याला निमित्त झाले आहे ते चीनच्या फुग्यांचे. अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात चिनी गुप्तहेर फुगा असल्याचा संशय अमेरिकेच्या गुप्तचर अधिका-यांनी व्यक्त केला आणि एकच खळबळ उडाली. चंद्रासारखा दिसणा-या या फुग्याला अध्यक्ष बायडन यांच्या आदेशानं पाडण्यात आलं मात्र बायडन यांनी याबाबतीत मवाळ धोरण घेतल्याची टिका त्यांच्यावर झाली. ही घटना होते ना होते तोच कोलंबियाच्या हवाई क्षेत्रातही असाच फुगा आढळून आला. फार काय भारतामध्येही महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये असे फुगे आढळल्याचे सांगण्यात आले (War). चिन या फुग्यांच्या माध्यमातून हेरगिरी करत असल्याचा संशय आहे. अमेरिकेनं चिनचा एक फुगा मिसाईलच्या द्वारे नष्ट केला. मात्र यावर चिननं तिखट प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. मुळात चिननं हे फुगे हेरगिरी असल्याचे साधन असल्याचे मान्यच केले नाही. आपल्यावर आरोप करण्यात येत असून चीन हे आरोप सहन करणार नाही, असा उलटा इशाराच चीनकडून महाशक्ती म्हणून ज्या देशाचा उल्लेख केला जातो, त्या अमेरिकेला दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. ही तणावाची परिस्थिती अशीच राहिली तर युद्धाचे ढग दाटू शकतात, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.(War)

अमेरिकेच्या हवाई क्षेत्रावर दिसलेल्या फुग्याला पाडण्यात आल्यावर चीननं या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. अशा स्थितीत दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढू शकतो का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा फुगा पाडण्यात आल्यावर चीननं संताप व्यक्त केला. मात्र त्यांच्या कारवाया थांबल्या नाहीत. कारण त्यानंतर लगेच कोलंबियाच्या हवाई क्षेत्रातही एक फुगा दिसला आहे (War). कोलंबियाच्या हवाई दलाने दावा केला आहे की, अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात दिसला त्याच प्रकारचा हा फुगा आहे. त्यामुळे पुन्हा संशयाची सुई चीनकडे वळली आहे. याशिवाय लॅटिन अमेरिकेतही आणखी एक चिनी गुप्तचर फुगा असल्याचे उघड झाले. या फुग्यांद्वारे चीन, अमेरिका आणि त्याच्या आसपासच्या परिसराची महत्त्वाची माहिती गोळा करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी चीन दौरा पुढे ढकलला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हा फुगा पाडण्याचे आदेश दिले. यासाठी अमेरिकन फायटर जेट F-22 चा वापर करण्यात आला. फायटर जेटच्या मदतीने या हेरगिरी करणा-या फुग्यावर क्षेपणास्त्राने हल्ला करून तो नष्ट करण्यात आला. चीन आणि अमेरिका काही मुद्द्यावर आमने सामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. उत्तर आणि दक्षिण कोरिया, तैवानसह अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देश विकसित आहेत आणि जगात त्यांची स्वतःची शक्तीमान देश अशी ओळख आहे.
या सर्वांचा परिणाम जो बायडेन यांच्या प्रतिमेवरही झाला आहे. रिपब्लिकन खासदारांनी संशयित चिनी गुप्तचर फुग्यावर निर्णय घेण्यास विलंब केल्याबद्दल अध्यक्ष बायडेन यांच्यावर टीका केली आहे. चीनच्या बाबतीत बायडेन यांची भूमिका मवाळ असल्याचा आरोप आता त्यांच्यावर करण्यात येतोय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेची भूमिका खंबीरपणे मांडणे आणि अंतर्गत विरोधाला तोंड देणे अशी दुहेरी कसरत जो बायडेन यांना करावी लागत आहे. दरम्यान अमेरिकेचे सुप्रसिद्ध संरक्षण तज्ज्ञ एचआय सटन यांनी चीनने केवळ अमेरिकेवरच नव्हे तर भारतावरही असा गुप्तचर फुगा उडवला असल्याचा दावा केला आहे. चीनने हिंद महासागरातील भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांवर गुप्तहेरगिरी करण्यासाठी असाच फुगा उडवला असल्याचे सटन यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जपानवरही असाच फुगा उडवून चीनने गुप्तहेरगिरी केल्याचा दावीही त्यांनी केला आहे. यामुळे चीनच्या हेतूंबाबत शंका व्यक्त होत आहे. (War)
========
हे देखील वाचा : तुर्की आणि सीरियातील भुकंप जीवघेणा का ठरला?
=======
वास्तविक या गुप्तचर फुग्यांचा इतिहास दुसऱ्या महायुद्धाचा (War) आहे. हे फुगे अनेक चौरस फूट मोठे आहेत. त्यांच्यात सहसा जमिनीपासून मोठ्या उंचीवर उडण्याची क्षमता असते. ज्यामुळे त्यांचा वापर हवामानाशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. विशेषत: विशिष्ट क्षेत्राचे हवामान जाणून घेणे. मात्र, आकाशात प्रचंड उंचीवर उडण्याची क्षमता असल्याने त्यांचा हेरगिरीसाठीही वापर केला जातो. हे फुगे जमिनीपासून 24 हजार ते 37 हजार फूट उंचीवर सहज उडू शकतात. चिनी फुगा 60 हजार फूट उंचीवर उडत होता. त्यामुळे जमिनीवरून त्यांचे निरीक्षण करणे खूप अवघड आहे. यूएस एअर फोर्सच्या एअर कमांड अँड स्टाफ कॉलेजच्या अहवालानुसार, हे गुप्तचर फुगे कधीकधी उपग्रहांपेक्षा चांगले गुप्तचर साधन असल्याचे सिद्ध होतात. वास्तविक, ते उपग्रहापेक्षा अधिक सहजतेने आणि वेळेसह क्षेत्र स्कॅन करू शकतात. याद्वारे, संवेदनशील गुप्त माहिती गोळा करू शकतात, जी माहिती उपग्रहाच्या अंतरामुळे स्कॅन करणे कठीण आहे. एवढेच नाही तर उपग्रहांद्वारे कोणत्याही एका क्षेत्रावर लक्ष ठेवणे देखील खूप महागडे ठरू शकते, कारण त्यासाठी खूप महागडे स्पेस लॉन्चर्स लागतात. दुसरीकडे, गुप्तचर फुगे, उपग्रहांसोबत खूप कमी खर्चात तेच काम करू शकतात.(War)
आता या चीनच्या फुग्यांच्या हेरगिरीचे परिणाम काय होणार आहेत, हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील युद्ध अजून सुरु असतांना आणखी दोन प्रबळ देशांमध्ये युद्धाची बोलणी होऊ लागल्यानं चिंता व्यक्त होत आहे.
सई बने