Home » लग्नाच्या आठ वर्षानंतर टीव्ही अभिनेत्री कार्तिका सेंगर आणि अभिनेता निकेतन धीर झाले आईबाबा 

लग्नाच्या आठ वर्षानंतर टीव्ही अभिनेत्री कार्तिका सेंगर आणि अभिनेता निकेतन धीर झाले आईबाबा 

by Team Gajawaja
0 comment
kartika sengar
Share

मनोरंजन विश्वासाठी २०२२ हे वर्ष खऱ्या अर्थाने आनंद देणारे ठरत आहे. यावर्षात अनेक कलाकार आईबाबा झाले तर काही लवकरच आईबाबा होणार आहे. आतापर्यंत भारती सिंग, देबिना बॅनर्जी आदी अभिनेत्रींनी बाळांना जन्म दिला असून लवकरच अजून काही अभिनेत्री आई होणार आहे. आता आई झालेल्या अभिनेत्रींच्या यादीत अजून एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. टीव्ही अभिनेत्री असलेली कार्तिका सेंगर(kartika sengar) नुकतीच आई झाली आहे. 

कार्तिका सेंगर (kartika sengar) ने १२ मे २०२२ रोजी सकाळी एका मुलीला जन्म दिला असून बाळ आणि कार्तिका दोघेही छान असल्याचे समजत आहे. चित्रपट अभिनेता निकेतन धीर आणि टीव्ही अभिनेत्री कार्तिका सेंगर यांनी नोव्हेंबर २०२१मध्ये ते आईबाबा होणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले होते. त्यानंतर त्यांच्या फॅन्सला त्यांच्या बाळाबद्दल खूपच उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता कार्तिका ने मुलीला जन्म दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसोबतच फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

कार्तिका सेंगर (kartika sengar) आणि निकेतन धीर यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचे पहिले मॅटर्निटी शूट केले होते. याच शूटचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या फोटोंना त्यांच्या फॅन्सचे आणि नेटकऱ्यांचे तुफान प्रेम मिळाले. हे फोटो सोशल मीडियावर देखील खूप व्हायरल झाले होते. कार्तिका आणि निकेतन यांनी ३ सप्टेंबर २०१४ साली लग्न केले त्यानंतर ८ वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत. कार्तिका ने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “तिने जेव्हा तिच्या प्रेग्नसीची बातमी घरात सांगितली तेव्हा तिच्या घरात खूपच आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या काळात माझ्या नवऱ्यापासून सासू सासऱ्यांपर्यंत सर्वांनीच माझी खूपच काळजी घेतली. वडील होणार या बातमीने निकेतन खूपच उत्सुक आणि आनंदी झाला. तो अक्षरशः आकाशात फिरत होता असेच त्याला पाहून वाटत होते.” 

पुढे कार्तिका सेंगर(kartika sengar) ने सांगितले की, “मी घरीच टेस्ट केले आणि मला प्रेग्नन्सीबद्दल समजले. मला प्रेग्नन्सी सारखे लक्षणं दिसत असल्याने थोडी शंका आलीच होती. मात्र जेव्हा टेस्ट पॉसिटीव्ह आली, तेव्हा मी बाथरूममध्येच बसून राहिली. पुढेच चार तास मी कोणालाच काही सांगितले नाही. मी आधीपासूनच यासाठी तयार होती, पण वाटले नव्हते की, एवढ्या लवकर ही बातमी येईल. निकेतन धीर दुसऱ्या रूममध्ये होता, मी सतत त्याच्या रूममध्ये त्याला सांगायला जात होती आणि न सांगता येत होती. जेव्हा याबद्दल निकेतनने मला विचारले तेव्हा मी त्याला सांगितले यावर तो खूप हसला होता.”

तिने सांगितले की, तिच्या घरच्यांनी येणाऱ्या बाळासाठी खूप तयारी केली आहे. सर्वच येणाऱ्या बाळासाठी खूपच उत्सुक असून, आता येणाऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी चालू आहे.

कार्तिका (kartika sengar) आणि निकेतन यांच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, २०१८ सालापासून कार्तिका अभिनयापासून लांब आहे. २०२१ साली ती ‘छोटी सरदारनी’ या मालिकेत छोट्याश्या भूमिकेत दिसली होती. तर निकेतन बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये झळकत असतो. कार्तिका टीव्ही क्षेत्रात अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. झाँसीची राणी लक्ष्मीबाई, पुनर्विवाह, कसम आदी तिच्या गाजलेल्या मालिकांचे नाव आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.