अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था फार बिकट झाली आहे. वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या एका विधानात असे म्हटले गेले आहे की, अफगाणिस्तानात बेरोजगारी आणि गरिबीचा स्तर वाढला आहे ज्यामुळे देशातील नागरिकांना आयुष्य जगणे मुश्किल झाले आहे. त्याचसोबत त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ ही आली आहे. अफगाणिस्तानचे न्यूज एजेंसी खामा प्रेसच्या नुसार वर्ल्ड फूड प्रोग्राम कार्यक्रमने बुधवारी ट्विट करत असे म्हटले की, देशातील बहुतांश लोकसंख्येला मानवी सहाय्यतेची गरज आहे. तालिबानच्या कब्जात देश गेल्यानंतर अफगाण मधील लोक उपाशी राहू लागली आहेत. आपल्याच देशात सुखाने-शांतीने जगणे ते विसरले आहेत. (Afganishatan Poverty)
रिपोर्ट्सनुसार, संयुक्त राष्ट्राने असे सांगितले तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यानंतर गरिबीचा दर वाढून ९७ टक्के झाली आहे. देशात दहापैकी ९ लोक पुरेशा जेवणाचा खर्च उचलू शकत नाहीत. वर्ल्ड फूड प्रोग्रामने असा अनुमान लावला आहे की, देशातील १९ मिलियन लोक खाण्याबद्दल असुरक्षिततेचा सामना करत आहे. १.५ कोटी लोकांना वर्ल्ड खाद्य कार्यक्रम आता पुढील सहा महिन्यापर्यंत जेवण आणि पोषणाची मदत करणार आहे.

OCHA अफगाणिस्तानने ट्विट करत माहिती दिली आहे की, १९ मिलियन लोक खाण्यासंदर्भात असुरक्षिततेचा सामना करत आहेत. २५ मिलियन लोक गरिबीमुळे त्रस्त आहेत. ५.८ मिलियन लोक दीर्घकाळापासून आंतरिक विस्थापनाचा सामना करत आहेत. हजारो लोक नैसर्गिक आपत्तींमुळे बेघर झाले आहेत.
हे देखील वाचा- रशियामधले पुरुष गेले तरी कुठे….
अफगाणिस्तानात किती राज्य आहेत?
अफगाणिस्तानात एकूण २९ राज्य आहेत. काबुल देशाची राजधानी सुद्धा आहे आणि एक राज्य सुद्धा आहे. सर्व राज्यांची नावे ही- बदख्शां, बाद्घिस, बाग़लन, बल्ख, बामयान, फराह, फरयाब, ग़ज़नी, घोर, हिलमांड, हिरात, जवजजन, काबुल, कंदहार, कपीसा, कुंअर, कुंदूज़, लघमन, लोगर, नांगरहार, निम्रोज़, पक्तिका, पक्तया, परवान, समांगन, ताखर, उरूज़गन, वरदक आणि जाबुल अशी आहेत. तसेच अफगाणिस्तान मधील प्रमुख १२ नगरांची नावे- काबुल, कंधार, हरात, मजार शरीफ, कुंदोज, तालोकां, पुली खुमरी, जलालाबाद, चरीकार, शेबेरघन, गजनी आणि सरेपोल. (Afganishatan Poverty)
अफगाणिस्तानात मुख्य दोन अधिकृत भाषा दारी आणि पाश्तो आहे. दारी भाषा येथील ७७ टक्के लोकसंख्या बोलते. इंग्रजी भाषेचा वापर खुप कमी केला जातो. तसेच येथील चलनाचे नाव ही अफगानी आहे. येथील लोकांना अफगान असे म्हटले जाते.