Home » इंडोनेशियात अडल्ट रिलेशनशिपवर घातली जाणार बंदी, पर्यटकांसाठी सुद्धा लागू होणार नियम

इंडोनेशियात अडल्ट रिलेशनशिपवर घातली जाणार बंदी, पर्यटकांसाठी सुद्धा लागू होणार नियम

by Team Gajawaja
0 comment
Signs of strong relationship
Share

इंडोनेशिया अडल्ट रिलेशनशिपला (Adult relationship) गुन्हा असल्याचे मानले जाण्यासंदर्भात तयारी करत आहे. तसेच संसदेत याबद्दल एक कायदा सुद्धा तयार करण्यात येणार आहे. असे सांगितले जात आहे की, जर कायदा झाल्यास तर लग्नापूर्वी लैंगिक संबंध बनवणाऱ्यांना एका वर्षाची तुरुंगाची शिक्षा होऊ शकते. यावर एक मसूदा ही तयार केला गेला आहे. येणाऱ्या काळात तो संसदेत पारित केला जाणार आहे. इंडोनेशियातील सरकारने आधी सुद्धा अशा प्रकारचे कायदे बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण सरकारच्या त्या कायद्याला जोरदार विरोध केला गेला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार मसुद्यातील कलम ४१२ च्या पहिल्या परिच्छेदात असे म्हटले गेले आहे की, जर एखादा व्यक्ती लग्नाशिवाय लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल. असे म्हटले गेले आहे की, असे करणाऱ्याला कमीत कमी एक वर्ष किंवा कॅटेगरी-२ चा दंड सुनावला जाऊ शकतो. दरम्यान कारवाई तेव्हाच होईल जेव्हा एखाद्या व्यक्तीने पोलिसात तक्रार केलेली असेल.

Adult relationship
Adult relationship

आधीसुद्धा सरकारने केलेत प्रयत्न पण विरोध झाला
या व्यतिरिक्त कलम १४४ मध्ये असे म्हटले गेले आहे की, जर तक्रारकर्ता आपली तक्रार मागे घेऊ पाहत असेल तर तो ट्रायल कोर्टाच्या सुनावणी आधी ती मागे घेऊ शकतो. तीन वर्षांपूर्वी सरकारने अशा प्रकारचे कायादे बनवण्याचा प्रयत्न केला होता. मोठ्या संख्येने लोकांनी याचा विरोध करत रस्त्यावर उतरले होते. लोकांनी असे म्हटले होते की, अशा प्रकारचे कायदे व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन करतात. इंडोनेशियातील डेप्युटी लॉ मिनिस्टर एडवर्ड उमर शरीफ हिरयीज यांनी एका वृत्त वाहिला असे म्हटले की, इंडोनेशियातील मुल्यांच्या नुसार एक गुन्हेगारी कोड असण्यावर आम्हाला गर्व आहे. (Adult relationship)

हे देखील वाचा- आडनावाशिवाय ‘या’ देशात आता मिळणार नाही एन्ट्री, एअर इंडियाकडून अॅडवायजरी जारी

पर्यटकावंर सुद्धा लागू होतील कायदे
न्यूज एजेंसीच्या मते, मंत्र्यांनी असे सांगितले की, राष्ट्पती किंवा राज्य संस्थांचा अपमान करणे आणि इंडोनेशियातील राज्याच्या विचारधारेच्या विरोधातील कोणत्याही विचाराला व्यक्त करणे आणि लग्नापूर्वी लैंगिक संबंध ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. इंडोनेशिया जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. स्थानिक स्तराव शेकडो नियम आहेत जे महिला, धार्मिक अल्पसंख्यांक आणि एलजीबीटी लोकांच्या विरोधात भेदभाव करतात. हैराण करणारी गोष्ट अशी की, हा कायदा फक्त इंडोनेशियातील नागरिकांनाच नव्हे तर परदेशातील नागरिकांसाठी सुद्धा लागू असणार आहे. इंडोनेशिया एक पर्यटनाचे ठिकाण मानले जाते,अशातच अशा प्रकारचे नियम हे देशातील पर्यटनाला प्रभावित करु शकतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.