सकाळच्या धावपळीत कॉफीचा एक कप अनेकांना दिवसभराची उर्जा देऊन जातो. वाफाळत्या कॉफीचा पहिला घोट घेतला की, चेह-यावर समाधान येते आणि दिवसभराच्या कामासाठी उत्साहही. या कॉफीचा स्वाद कसा असतो, यावरही अनेकांची सकाळ अवलंबून असते. पण कॉफीच्या चवीसोबत आरोग्यदायी कॉफी कशी करायची याची माहिती जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल. सध्याच्या धावपळीच्या वेळापत्रकात ही कॉफी चवदार तर आहेच, शिवाय त्याचे आपल्या आरोग्यालाही चांगलेच फायदे आहेत. मुख्य म्हणजे कॉफी घेताना अतिरिक्त साखरही शरीरात जाते, आणि त्यामुळे वजन वाढते, असे अनेकवेळा सांगितले जाते. पण कॉफीचा असा प्रकार सांगणार आहोत की, ज्यामुळे वजन वाढणार नाही तर कमी होणार आहे. (Chia Seeds)

कॉफीला आरोग्यदायी कॉफी करण्यासाठी कॉफीमध्ये रोज चियांच्या बियांचा (Chia Seeds) वापर केल्यास त्याचा फायदा होतो. या चियांच्या बिया आरोग्यासाठी वरदान ठरत आहेत. या बियांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करण्यात येतो. काही जण या बिया फक्त चावून खातात. तर काही चिया बिया दह्यासोबत खातात. चिया बिया (Chia Seeds) अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, फायबर, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारख्या जीवनसत्व-खनिजांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, वजन कमी करण्यासाठी या बियांचा चांगला फायदा होतो. तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी या बियांचा चांगला फायदा होतो. चिया बियांमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. त्यांच्यासाठी या बिया रामबाण उपायसारख्या आहेत. आतड्यांची स्वच्छता होते, यासोबतच गॅस्ट्रोइंटेस्टाइनलचे आरोग्यही चांगले राहते.(Chia Seeds)
चिया बिया (Chia Seeds) ऊर्जेचा स्रोत मानल्या जातात. या बिया कशाही खाल्या तरी त्यापासून फायदा होतो. मात्र कॉफी आणि चिया बिया यांचे समिकरण अतिशय आरोग्यदायी आहे. कॉफीसोबत या बिया घेतल्यास शरीराला दुप्पट फायदा होतो. साल्विया हिस्पॅनिका नावाच्या वनस्पतीपासून चिया बिया (Chia Seeds) मिळतात. या बिया गडद तपकिरी रंगाच्या आणि आकाराने लहान असतात. काळ्या तिळासारख्या या बिया दिसतात. चिया बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् आणि ‘इतर बायोएक्टिव्ह न्यूट्रिशनल कंपाऊंड्स’ तसेच फायबर भरपूर असल्यामुळे सुपरफूडमध्ये त्यांचा समावेश करण्यात येतो. या चिया बियांमध्ये जीवनसत्त्वे सी, ई, नियासिन, थायामिन, अँटिऑक्सिडंट्स, रिबोफ्लेविन यांचाही समावेश असल्यामुळे आरोग्याला त्याचा चांगला फायदा होतो. मुख्य म्हणजे, चिया बियांमध्ये साखरचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे मधुमेहींमुळे या बिया अतिशय पोषक ठरतात. हृदयरोग, कर्करोग आणि संसर्गजन्य रोगांमध्येही चिया बिया उपयोगी ठरतात.
=======
हे देखील वाचा : पावसाळ्यात घरात माश्या त्रास देतात… ‘या’ टीप्स येतील कामी
=======
चिया बियांमध्ये (Chia Seeds) कोणत्याही प्रकारचे अन्न सहज पचवण्याची क्षमता असते. दोन्ही वेळेचे जेवण जेवल्यावर या बिया खाल्यास त्याचा फायदा अन्न पचन होण्यासाठी होतो. यासह, आतड्यांची जळजळ आणि बद्धकोष्ठता दूर होते. चिया बिया मॅग्नेशियमचा एक उत्तम स्रोत आहेत. त्यामुळे शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी करण्यासाठी मदत होते. कोर्टिसोल हा एक हार्मोन्स मानला जातो, त्यामुळे तणाव आणि उच्च रक्तदाब कमी होतो. चिया बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. त्यांचा आहारात नित्य समावेश असेल तर थकवा जाणवत नाही. जी मंडळी नियमीत व्यायाम करतात त्यांना चिया बिया खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण या माध्यमातून थकवा जाणवत नाही.
चिया बियांमध्ये (Chia Seeds) काही घटक आढळतात जे पोटात आणि आतड्यांमध्ये साठलेली चरबी वितळवण्यासाठी मदत करतात. या बियांमध्ये कॅलरी कमी आणि लिपोप्रोटीन एचडीएल जास्त असल्याने रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी मदत होते. चिया बिया हृदयविकारासाठीही खूप उपयुक्त ठरतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोकाही कमी होतो. चिया बियांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्याचा दातांच्या आरोग्यासाठी चांगला उपयोग होतो. चिया बियांमध्ये (Chia Seeds) असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडांची खनिज घनता राखण्यास मदत करतात. एकूण काळ्या रंगाच्या चिया बिया आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. मात्र त्यांचे सेवन कसे करतो, यावरही त्याचा फायदा अवलंबून आहे. कॉफीसोबत या बिया घेतल्यास त्याचा फायदा अधिक होतो हे जाणकार सांगतात.
सई बने