Home » अदानी ग्रुपच्या कंपन्यांमधील बँकांमधील पैशांबद्दल SEBI नंतर आता RBI कडून तपास सुरु

अदानी ग्रुपच्या कंपन्यांमधील बँकांमधील पैशांबद्दल SEBI नंतर आता RBI कडून तपास सुरु

by Team Gajawaja
0 comment
Adani Controversy
Share

अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये भारतीय बँकांनी किती पैसे लावले याची माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय बँक आरबीआयकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मनीकंट्रोलच्या सुत्रांच्या हवाल्यानुसार, मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयने अदानी ग्रुपला दिल्या गेलेल्या कर्जांची सध्याच्या स्थितीबद्दल सांगण्यात सांगितले आहे. काही बड्या बँकांसह आरबीआयच्या बातचीत या प्रकरणाबद्दल आधीच सुरु झाली आहे.आता अन्य बँकांसोबत आरबीआय यावरुन चर्चा करणार आहे. तर अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडनबर्ग रिसर्च यांचा रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर वेगाने खाली पडत आहेत. अदानी एंटरप्राइजेसचा २० हजार कोटींचा फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) सुद्धा मागे घेण्यात आला आहे.(Adani Controversy)

दरम्यान, एफपीओ मागे घेतल्यानंतर अदानी ग्रुपने त्यासंदर्भात एक परिपत्रक जाहीर केले. त्यात असे म्हटले आहे की, सध्याची स्थिती आणि बाजारातील चढउतार पाहता कंपनीने एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत त्यांनी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत देणार असल्याचे ही आश्वासन दिले आहे. अदानी ग्रुपने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले गेले आहे की, संपूर्ण ट्रांजेक्शनला आम्ही मागे घेत आहोत आणि आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताला प्राधान्य देत आम्ही हा निर्णय घेतला आहे.

भारतीय बँकांकडून ३० टक्के अदानी ग्रुपला कर्ज
सीएलएसईच्या रिपोर्टनुसार अदानी ग्रुपच्या कंपन्यांमधील ३८ टक्के कर्ज बँकांनी दिले आहे. बँकेच्या कर्जात टर्म लोन, वर्किंग कॅपिटल आणि अन्य सुविधांचा समावेश आहे. तर ३७ टक्के कर्ज बॉन्ड्स/कमर्शियल पेपर्स, ११ टक्के आर्थिक संस्थांमधून कर्ज आणि उर्वरित १२-१३ टक्के इंटर-ग्रुप लेंडिग म्हणजेच ग्रुपच्या कंपन्यांमध्येच कर्जाची देवाण-घेवाणीचा समावेश आहे.

आता अदानी ग्रुपच्या कंपन्यांवर भारतीय बँकांच्या दावेदारी बद्दल बोलायचे झाल्यास पंजाब नॅशनल बँखने त्यांना ७ हजार कोटींचे कर्ज दिले आहे. तर इंडसइंड बँकेने सुद्धा यांना कर्ज दिले आहे. सीएनबीसी टीवी१८ ला दिलेल्या एका मुलाखतीत अदानी ग्रुपच्या सीएफओने २ फेब्रुवारीला असे म्हटले की, ग्रुपवर ३ हजार कोटी डॉलरचे कर्ज आहे. ज्यामध्ये ४०० कोटी डॉलर रोख रुपयांमध्ये ठेवले आहे. ग्रुपच्या सीएफओच्या मते ३ हजार कोटी डॉलरच्या कर्जात ९०० कोटी डॉलरचे कर्ज अदानी ग्रुपने भारतीय बँकांकडून मिळवले आहे.(Adani Controversy)

हे देखील वाचा- हिंडनबर्ग रिसर्च नक्की काय आहे? ज्यामुळे अदानींचे शेअर खाली कोसळले

SEBI सुद्धा तपास करतेय
१ फेब्रुवारीला न्यूज एजेंसी रॉयटर्सने माहिती दिली होती की, बाजार नियामक सेबी अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये घट झाल्यासंदर्भात तपास करत आहे. या व्यतिरिक्त ते शेअर्सच्या विक्रीत एका अनियमिततेबद्दल ही तपास करतायत. सिक्युरिटीज अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने हा तपास अशावेळी सुरु केला जेव्हा हिंडनबर्स रिसर्चचा रिपोर्ट समोर आला होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.