सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा उरकत असून लवकरच ते लग्न बंधनात देखील अडणार आहेत. शिवानी नाईक आणि अमित रेखी यांच्या साखरपुड्यानंतर मराठी इंडस्ट्रीमधील अजून एका अभिनेत्रीने साखरपुडा केला आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने साखरपुडा केल्याची आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर सध्या तेजस्विनीच्या साखरपुड्याचे भरपूर फोटो व्हायरल होत आहे. तेजस्विनीचा साखरपुडा जास्त चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे तेजस्विनी एका बड्या राजकीय नेत्याची सून होणार आहे. (Marathi)
तेजस्विनी ही एका मोठ्या राजकीय घराण्याची सून होत आहे. एका बड्या नेत्याच्या लेकासोबत तिचा साखरपुडा झाला. तेजस्विनी लोणारीने शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा आणि युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी साखरपुडा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समाधान सरवणकर देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात सक्रिय झाले आहेत. मुंबईतील वरळी भागात त्यांचा प्रभाव अधिक आहे. सदा सरवणकर हे शिंदे गटातील मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांनी नुकताच अगदी गुपचूपपणे आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये सारखपुडा केला आहे. (Tejaswini Lonari)
तेजस्विनी आणि समाधान या दोघांचा साखरपुडा मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये पार पडला. या खास क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात तेजस्विनी लाल रंगाच्या पारंपरिक पोशाखात अतिशय देखणी दिसते. एकमेकांना अंगठी घातल्यानंतरचे त्यांचे हसरे आणि आनंदी रूप खूपच गाजत आहे. या दोघांच्या साखरपुड्याला मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. समाधान सरवणकर हे सुद्ध राजकारणात सक्रीय आहेत. (Top Marathi News)

कोण आहे समाधान सरवणकर?
गेल्या अनेक वर्षांपासून समाधान हे त्यांच्या वडिलांप्रमाणेच सदा सरवणकर यांच्याप्रमाणे राजकारणात सक्रिय आहे. विशेष: मुंबईतील वरळी भागात त्यांचा प्रभाव अधिक आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर राहिले आहेत. समाधान सरवणकर हे मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक १९४ येथून शिवसेनेतर्फे नगरसेवक होते. सध्या ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. समाधान सरवणकर फाउंडेशन या एनजीओजच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. याशिवाय प्रभादेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ते अध्यक्ष आहेत, तर शिवाजी पार्क जिमखान्याचे ते उपाध्यक्ष आहेत. (Latest Marathi News)
सदा सरवणकर हे शिंदे गटातील मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. सदा सरवणकर माहिम विधानसभा मतदारसंघाकडून शिवसेनेचे माजी आमदार आहेत. मुंबई महापालिकेत तीन वेळा नगरसेवक होण्याचा मान त्यांना मिळाला. सदा सरवणकर तीन वेळा आमदार झाले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे हे देखील यंदाच्या निवडणुकीत सदा सरवणकर यांच्या विरोधात मैदानात होते. मात्र, दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. (Todays Marathi Headline)
तर तेजस्विनीबद्दल सांगायचे झाले तर तेजस्विनी लोणारीने आतापर्यंत तिच्या करिअरमध्ये अनेक हीट भूमिका केल्या आहेत. मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील तेजस्विनीने काम केले आहे. अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये तिच्या भूमिका गाजल्या. विशेष म्हणजे अभिनेत्री मराठी बिग बॉस सीजन 4 मध्येही कमाल करताना दिसली. तेजस्विनी लोणारी हिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. तिला अनेकदा तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले गेले, मात्र तिने कधीच याबद्दल जास्त वाच्यता केली नाही. ती कोणाला डेट करते किंवा लग्नाबद्दल ती फार कधी जास्त बोलले नाही. (Top Trending News)
=========
Mathura : तब्बल ५४ वर्षांनी मथुरेतील बांके बिहारी मंदिरातील खजिना उघड
=========
आता तेजस्विनीच्या अचानक आलेल्या या साखरपुडाच्या बातमीने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या अभिनेत्रीच्या साखरपुडाचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. मात्र, तेजस्विनीचे लव्ह मॅरेज की अरेंज याबद्दल अजून तरी फार काही माहिती मिळू शकली नाही. तिने छापा काटा, वॉण्टेड बायको नंबर वन, चित्तोड की राणी पद्मिनी का जोहूर, गुलदस्ता, दोघांत तिसरा आता सगळं विसरा, अफलातून, कलावती यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती प्राण्यांसाठी एनजीओ चालवते. मुक्या प्राण्यांना मदत भासल्यास त्यांच्यासाठी तत्पर हजर असते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
