मागील अनेक दिवसांपासून सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल यांच्या लग्नाच्या बातम्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. ते लग्न करणार की नाही हे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच होते. अखेर २३ जून २०२४ रविवारी सोनाक्षी आणि जहीर यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले आणि सगळ्यांच्याच प्रश्नांना उत्तर मिळाले. तब्बल ७ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी आणि जहीर यांच्या रिसेप्शनला संपूर्ण बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावत त्यांना शुभेच्छा दिल्या. (sonakshi-sinha-got-luxurious-wedding-gift-from-husband-zaheer-iqbal)
सोनाक्षी आणि जहीर यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या दोघांचे लग्न चांगलेच गाजत आहे. एकीकडे या दोघांचे फॅन्स आणि जवळचे सर्वच लोकं या लग्नामुळे आनंदी असले तरी अनेकांनी त्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे असले तरी या दोघांनी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत आपला आनंद साजरा करण्याला प्राधान्य दिले आहे.
सोनाक्षी आणि जहीर यांच्या लग्नानंतर मीडियामध्ये सतत त्यांच्याशी संबंधित विविध बातम्या येत आहेत. सोनाक्षीने लग्नानंतर पहिल्यांदा सासरी पाऊल ठेवले आणि तिला एक मोठे आणि महागडे गिफ्ट तिच्या नवऱ्याने अर्थात जहीरने दिले आहे. सात वर्षांच्या यशस्वी नात्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकले आणि कायमचे एकमेकांचे झाले. याचा एक आनंद आणि लग्नानंतर बायकोला कायम स्मरणात राहील असे गिफ्ट जहीरने सोनाक्षीला दिले आहे.
मीडियामधील रिपोर्ट्सनुसार जहीरने सोनाक्षीला एक महागडी आणि आलिशान गाडी गिफ्ट केली आहे. त्याने बीएमडब्ल्यू i7 ही इलेक्ट्रिक कार आपल्या पत्नीला भेट देत तिचा आनंद द्विगुणित करत दिवस अधिकच अविस्मरणीय केला. या गाडीची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
अनेक मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार जहीर इकबालने सोनाक्षीला अर्थात आपल्या पत्नीला पांढऱ्या रंगाची अतिशय सुंदर आणि आलिशान अशी बीएमडब्ल्यू आय 7 कार गिफ्ट केली आहे. या लक्झरी गाडीची किंमत तब्बल २ कोटी असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सोनाक्षी याच गाडीमध्ये बसले असल्याचे दिसत आहे.
लग्नानंतर सोनाक्षीचे तिच्या सासरी देखील दणक्यात स्वागत करण्यात आले. याचे देखील काही व्हिडिओ समोर आले आहेत. यात तिच्या आणि जहीरच्या गळ्यात माळ घालण्यात आली असून, त्यांना बसवून जहीरच्या बाहीने त्या दोघांची दृष्ट काढली. सासरी मिळालेल्या प्रेमामुळे सोनाक्षीला तिचे अश्रू रोखणे कठीण झाल्याचे देखील व्हिडिओमध्ये दिसते.
दरम्यान लग्नानंतर सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिने लिहिले, “वा काय दिवस होता!!! प्रेम, आनंद, साथ, उत्साह, उल्हास. सोबतच आम्हाला आमच्या मित्रांकडून, परिवाराकडून आणि आमच्या टीमकडून खूपच सहयोग मिळाला. असे वाटत आहे की, दोन प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी जणू नियतीच एक झाली आणि त्यांना ते सर्व देऊ इच्छिते जे त्या दोघांना अपेक्षित आहे, ज्याची त्यांनी प्रार्थना केली आणि मागितले होते.”
तत्पूर्वी सोनाक्षीने जहीरसोबत आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे तिच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे. यासाठी सोनाक्षी-झहीरने त्यांचे सोशल मीडियावरील कमेंट सेक्शन सध्या बंद ठेवले आहे.