बॉलीवूड मध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्यापैकीच एक नाव आहे अनुष्का शर्मा.. 2008 मध्ये रिलीज झालेल्या ‘रब ने बना दि जोडी’ या चित्रपटामधून अनुष्काने बॉलीवूड मध्ये प्रदार्पण केले. त्या नंतर बँड बाजा बारात, जब तक हे जान अश्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले. स्वतःच्या मेहनतीने तिने प्रसिद्धी चे शिखर गाठले.. सुलतान’ p.k यांसारख्या चित्रांमधून तिच्या अभिनयासाठी फार कौतुक सुद्धा झाले.
अभिनयाबरोबरच अनुष्का (Anushka Sharma) एक यशस्वी निर्माती सुद्धा आहे.. NH10 सारख्या अनेक चित्रपटाची ती निर्माती आहे. 2017 मध्ये इटली येथे अनुष्का आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी लग्नगाठ बांधली. आणि आत्ता 2021 मध्ये अनुष्काने एका बेबी गर्ल ला जन्म दिला आणि जिचे नाव आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे ‘वामीका’..
अनुष्का बद्दल अश्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या कोणालाच माहिती नसाव्यात.
1. अनुष्का चा जन्म 1 मे 1988 साली अयोध्या येथे झाला. तिचे बालपण बंगलोर मध्ये गेले. अनुष्काने वडील कर्नल अजय कुमार शर्मा हे 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धामध्ये सहभागी होते. आर्मी मध्ये असल्यामुळे अनुष्काचे शिक्षण सुद्धा आर्मी स्कूल मध्ये झाले..
2. एका मुलाखतीत अनुष्काने सांगितले होते की माझ्यात अध्यात्मिक बाजू सुद्धा आहे. लहानपणी साधारण 14/15 वर्षाची असताना सुद्धा जेव्हा माझे मित्र मैत्रिणी बाकीच्या गोष्टींमध्ये असायचे तेव्हा सुद्धा माझा अध्यात्मिकतेवर जास्त भर होता.
3.तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण अनुष्काची पहिली करिअर चॉईस ही अभिनय क्षेत्र नव्हती. होय. तिला पत्रकारितेमध्ये इंटरेस्ट होता, पण डिझायनर वेंडेल रोडरिक्स यांनी अनुष्काला मॉल मध्ये पाहिल्यावर मॉडेलिंग ची ऑफर दिली आणि तेव्हा अनुष्काने पहिल्यांदा मॉडेलिंग अनुभवले होते
4. अनुष्काच्या लुक्स चे आणि अभिनयाचे लाखो चाहते आहे पण एका चाहत्याला तर तिचे पैंटिंग करायचे होते. बँड बाजा बारात (2011) हा चित्रपट पंचवीस वेळा बघितल्या नंतर प्रसिद्ध चित्रकार हुसेन यांनी सांगितले की मला अनुष्काचे पोट्रेट करायला नक्कीच आवडेल.
5. 2012 मध्ये रिलीज झालेल्या ‘जब तक हे जान’ या चित्रपटात शाहरुख खान आणि कतरिना कैफ बरोबर अनुष्काने ही काम केले आहे.
2014 साली राबवल्या गेलेल्या एक ऑकशन मध्ये, काश्मीर आणि आसाम पुरामध्ये नुकसान झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी अनुष्काने ‘जब तक हे जान ‘ या चित्रपटात वापरलेले लेदर जॅकेट सुध्दा विकले आणि लोकांची मदत केली.
6. अनुष्का सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असताना आपल्या सगळ्यांना सतत दिसते. तिच्या नवीन नवीन पोस्ट आपल्याला सगळ्यांना बघायला आवडतात. याच पोस्ट मध्ये तिच्या खास मित्राबरोबरचे फोटो आणि विडिओ सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तो मित्र म्हणजे तिच्याकडे असलेला कुत्रा..ती नेहमीच त्याचबरोबर काहींना काही गमतीशीर पोस्ट करताना दिसते. प्राण्यांसाठी एक खास पशुवैद्यकीय हॉस्पिटल असावे आणि एक प्राण्यांचा निवारा असावा असे तिचे स्वप्न आहे आणि या बाबत काम सुद्धा सुरू झाले आहे असे ती म्हणते.
7. अनुष्का विराट कोहली ला पहिल्यांदा एका शॅम्पू ऍड च्या शूट मध्ये भेटली होती. पहिल्या भेटीत पती विराट कोहली ने एक जोक सांगितला होता कारण त्याला कळतच नव्हते की पहिल्या भेटीत काय बोलायचे..
8. अनुष्का शर्माच्या ड्रेसिंग सेन्स बद्दल बोलायचे झोले तर तिचे सगळेच लुक चाहत्यांना आवडतात. वेगवेगळ्या शूट्स मध्ये आपल्याला तिचे बरेच लुक्स बघायला मिळाले आहेत.
परंतु खऱ्या आयुष्यात आणि ऐरपोर्टस लुक्स मध्ये बऱ्याचदा ती विराटचे टी-शर्ट वापरताना दिसते. ‘मी त्याचे कपडे वापरल्यावर त्याला खूप आनंद होतो असेही तिने सांगितले आहे’
9. बॉलीवूड स्टार्स च्या पार्टीच्या चर्चा आपल्याला सतत ऐकायला येत असतात आणि सोशल मीडिया वर सुद्धा विडिओ बघायला मिळतात..पण अनुष्काला या बद्दल विचारल्यावर ती म्हणते मी पार्टी गर्ल नाही आहे आणि हे इंडस्ट्री बद्दल च नसून माझ्या वयक्तिक आयुष्यात सुद्धा मी असेच राहणं पसंत करते.
10. अनुष्का शर्मा ही पार्टी गर्ल नसली तरी जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा घरी चित्रपट पाहणं हे सुद्धा तिच्या आवडीचे आहे. दिल से,जब वि मेट,लाईफ इज ब्युटीफुल असे काही चित्रपट तिच्या आवडीचे आहेत.
संकलन: अमृता आपटे