Home » Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sulakshana Pandit
Share

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील सुरूच आहे. असरानी, सतीश शाह, पंकज धीर आदी अनेक मोठ्या कलावंतांच्या निधनानंतर आता बॉलिवूडमधील अतिशय जेष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री, गायिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुलक्षणा पंडित यांचे देखील निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सुलक्षणा यांनी केवळ आपल्या अभिनयाने आणि सौंदर्यानेच नाही तर आपल्या सुमधुर आवाजाने देखील प्रेक्षकांचे मनं जिंकले होते. बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्री आणि गायिका अशी त्यांची ओळख होती. सोशल मीडियावर कलाकारांसोबतच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Sulakshana Pandit)

प्रकृती अस्वास्थामुळे सुलक्षणा यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलक्षणा पंडित या अभिनेत्री विजेता पंडित आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध, लोकप्रिय संगीतकार जोडी जतिन-ललित यांच्या बहीण होत्या. दरम्यान सुलक्षणा यांचे भाऊ असलेल्या ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, ललित यांनी सांगितले की, त्यांची बहीण सुलक्षणा पंडित यांचे ६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Bollywood News)

सुलक्षणा पंडित यांचा जन्म १२ जुलै १९५४ रोजी झाला. त्यांचा जन्म एका संगीत कुटुंबात झाला असल्याने त्यांच्यावर सुरुवातीपासूनच संगीताचे संस्कार झाले. त्यांचे काका हे जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज होते. त्यांना तीन भाऊ आणि तीन बहिणी आहेत. त्यांचे भाऊ, जतिन आणि ललित हे हिंदी सिनेविश्वातील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक तर त्यांची बहीण विजयता पंडित या देखील एक सफल अभिनेत्री आणि पार्श्वगायिका आहेत. यांच्याच पावलावर पाऊल टाकत सुलक्षणा यांनी देखील याच क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. (Marathi)

सुलक्षणा यांनी वयाच्या केवळ ९व्या वर्षी त्यांच्या गायनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि १९६७ मध्ये चित्रपटांमध्ये पार्श्वगायन सुरू केले. त्यांनी १९६७ मध्ये आलेल्या “तकदीर” चित्रपटात लता मंगेशकर यांच्यासोबत “सात समुंदर पार से” हे प्रसिद्ध गाणे गायले. १९७५ मध्ये, त्यांना ‘संकल्प’ चित्रपटातील ‘तू ही सागर है तू ही किनारा’ या गाण्यासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक पुरस्कार मिळाला. त्यांनी हिंदी, बंगाली, मराठी, उडिया आणि गुजरातीसह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली. (Top Stories)

Sulakshana Pandit

सुलक्षणा यांनी किशोर कुमार, मोहम्मद रफी, येसुदास आणि उदित नारायण यांसारख्या गायकांसोबत त्यांनी अनेक गाणी गायली. १९८० मध्ये त्यांचा जज्बात (HMV) हा अल्बम रिलीज झाला, ज्यामध्ये त्यांनी गझल गायल्या. १९८६ मध्ये त्यांनी लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये झालेल्या भारतीय संगीत महोत्सवात सादरीकरण केले. त्यांचा शेवटचा रेकॉर्ड केलेला आवाज १९९६च्या “खामोशी: द म्युझिकल” चित्रपटातील “सागर किनारे भी दो दिल” या गाण्यात होता, जो त्यांचे भाऊ जतिन आणि ललित यांनी संगीतबद्ध केला होता. (Todays Marathi News)

एकीकडे त्यांची गायनातील कारकीर्द गाजत असताना दुसरीकडे त्यांनी अभिनयात देखील पदार्पण केले. दिसायला अतिशय सुदनर असलेल्या सुलक्षणा यांनी आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या बळावर प्रेक्षकांना आपलेसे केले. सुलक्षणा पंडित यांची अभिनय कारकीर्द १९७० आणि १९८०च्या दशकाच्या सुरुवातीला शिखरावर होती. त्यांनी त्या काळातील बॉलिवूडमधील जवळजवळ सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले. त्यांच्या काळातील त्या बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्री होती. (Marathi News)

त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९७५ मध्ये “उलझन” या चित्रपटाने झाली. त्यानंतर त्यांनी अनिल गांगुलीच्या “संकोच” (१९७६) या चित्रपटात ललिताची भूमिका केली, जो परिणीता या कादंबरीवर आधारित होता. संजीव कुमार यांच्यासोबत ‘उलझन’ सिनेमात काम करताना त्या संजीव कुमार यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी संजीव लग्नासाठी मागणी घातली. मात्र तेव्हा संजीव कुमार हे हेमा मालिनी यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यामुळे त्यांनी सुलक्षणा यांना नकार दिला. सुलक्षणा यांना मिळालेला हा नकार खूपच जिव्हारी लागला आणि त्या हळूहळू डिप्रेशनमध्ये जाऊ लागल्या. (Top Marathi News)

मुख्य म्हणजे सुलक्षणा आणि संजीव चांगले मित्र होते. त्यांना माहित होते की, संजीव हे हेमा मालिनी यांच्या प्रेमात आहे, मात्र जेव्हा हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी त्यांना नकार दिला तेव्हा संजीव खूपच खचले. त्यांनी याबद्दल सुलक्षणा यांना सांगितले. सुलक्षणा यांनी त्यांना सावरण्यास मदत केली आणि त्यातच आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या, मात्र संजीव कुमार यांनी त्यांना नकार दिला. या नकारामुळे सुलक्षणा या निराश झाल्या. हळूहळू त्यांनी काम करणे कमी केले आणि बाहेरच्या जगाशी असलेले सर्व संबंध तोडले. (Latest Marathi Headline)

=========

Sudan : म्हणून होतेय, दुबईवर बहिष्कार घालण्याची मागणी !

India : भारतीय संघाच्या जर्सीचा रंग निळाच का असतो?

=========

त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुलक्षणा पंडित यांचे आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले होते. एक काळ असा आला होता, जेव्हा त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अनेक वर्षे काम न मिळाल्याने त्यांना त्यांच्या अपार्टमेंटची दुरूस्ती करणे देखील शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांची बहीण विजेता यांच्यासोबत राहण्यास जावे लागले. माहितीनुसार २००५ मध्ये अभिनेते जितेंद्र यांनी सुलक्षणा यांना मदतीचा हात दिला. त्यांनी त्यांच्या मेहुण्याला सुलक्षणा यांचे अपार्टमेंट विकत घेण्यास सांगितले. (Top Trending News)

या विक्रीतून मिळालेल्या पैशातून सुलक्षणा यांनी 3 फ्लॅट्स खरेदी केले आणि त्यांच्यावर असलेले कर्जही फेडले. या घटनेमुळे सुलक्षणा यांना एक नवी उमेद मिळाली आणि त्या सामाजिक कार्यात सक्रिय झाल्या. मात्र संजीव कुमार यांच्यावर प्रेमामुळे त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. त्यांनी संजीव यांच्यासाठी कोणाशीही लग्न केले नाही. लक्षवेधी बाब म्हणजे लोकप्रिय अभिनेते संजीव कुमार यांनी ६ नोव्हेंबर १९८५ रोजी या जगाचा निरोप घेतला. आणि आज तब्ब्ल चाळीस वर्षांनंतर, याच तारखेला सुलक्षणा पंडित यांनी देखील अखेरचा श्वास घेतला. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.