Home » अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ अडकले विवाहबंधनात

अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ अडकले विवाहबंधनात

by Jyotsna Kulkarni
0 comment
Aditi Rao Hydari, Siddharth
Share

Aditi Rao Hydari, Siddharth

अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ हे दोघं नुकतेच लग्नबंधनात अडकले. मागील अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या या दोघांनी अचानक लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

Aditi Rao Hydari, Siddharth

अदिती आणि सिद्धार्थ यांनी कधीच त्यांच्या नात्यावर सार्वजनिकरित्या भाष्य केले नव्हते. मात्र याच वर्षी २७ मार्चला त्यांनी त्यांच्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला आणि त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले.

Aditi Rao Hydari, Siddharth

तेलंगणा वानपर्थी येथील ४०० वर्षे जुन्या मंदिरात अदिती-सिद्धार्थचा लग्नसोहळा पार पाडला. अतिशय सुंदर आणि पारंपरिक अशा दाक्षिणात्य पद्धतीनुसार हा लग्न सोहळा पार पडला.

Aditi Rao Hydari, Siddharth

अदितीने लग्नात गोल्डन जरी एम्ब्रॉयडरी असलेली सोनेरी रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. तर, सिद्धार्थने दाक्षिणात्य परंपरेनुसार पांढरा कुर्ता आणि लुंगी नेसली होती.Aditi Rao Hydari, Siddharthअदितीने शेअर केलेल्या फोटोंनी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघेही या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. या जोडप्याने तेलंगणा वानपर्थी येथील 400 वर्षे जुन्या मंदिरात त्यांचा विवाहसोहळा आयोजित केला होता.

 

Aditi Rao Hydari, Siddharth

अदितीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “तू माझा सूर्य आहेस, चंद्र आहेस आणि माझ्यासाठी तूच माझा तारा आहेस. लव्ह, लाइट अँड मॅजिक…मिस्टर अँड मिसेस अदु-सिद्धु” त्यांच्या लग्नाचे फोटो खूपच व्हायरल होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Aditi Rao Hydari, Siddharth

अगदी जवळच्या कुटुंबियांच्या आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अदिती आणि सिद्धार्थने लग्न केले. पारंपरिक अंदाजात त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी अदितीने गोल्डन साडीसोबतच नथ, झुमके, बांगड्या आणि केसांची साधी वेणी घालत त्यात गजरा माळला होता.

Aditi Rao Hydari, Siddharth

दरम्यान सिद्धार्थ आणि अदिती या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. सिद्धार्थचे २००३मध्ये मेघनासोबत लग्न झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि त्यांनी २००७मध्ये घटस्फोट घेतला होता. तर अदिती राव हैदरीने सिनेमात एन्ट्री करण्याआधी अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले होते. पण त्या दोघांचाही संसार फार काळ टिकला नाही आणि दोघं एकमेकांपासून वेगळे झाले.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.