प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. आता ते जीवनमरणाशी झुंज देत आहेत. रिपोर्ट्सनुसार, राजू यांना अद्याप शुद्द आलेली नाही. असे मानले जात आहे की, जिममध्ये वर्कआउटच्या कारणास्तव हृदय विकाराचा झटका आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या पत्नीशी त्यांच्या प्रकृती संदर्भात विचारपूस केली आहे. कॉमेडियन राजू यांच्या व्यतिरिक्त काही कलाकारांना सुद्धा वर्कआउट किंवा अन्य कारणामुळेच कमी वयात हृदय विकाराचा झटका आला. तर काही दिवसांपूर्वीच ‘भाभी जी घर पर है’ मधील कलाकार दीपेश भान यांना सुद्धा क्रिकेट खेळताना काहीतरी झाले आणि त्यांच्या डोक्याला मार लागल्याच्या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला.(Actors who faced heart attack)
यापूर्वी सुद्धा सिंगर केके यांचा सुद्धा अशाच स्थितीत मृत्यू झाला होता. ऐवढेच नव्हे तर बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाला सुद्धा कमी वयात हृदय विकाराचा झटका आला होता. जर आपण नीट पाहिल्यास तर हेवी वर्कआउट किंवा आपल्या शरिराच्या क्षमतेपेक्षा अधिक, थकवणारा व्यायाम केल्यामुळे अशा स्थिती उद्भवू शकतात. तर आम्ही तुम्हाला हेवी वर्कआउट किंवा जिममध्ये व्यायाम करण्यासंदर्भात काही टीप्स सांगणार आहोत.
हे देखील वाचा- एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवणयासाठी विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतील ‘ही’ योगासन

हेवी वर्कआउट संबंधित काही महत्वाच्या गोष्टी
३ ते ४ तास घालवू नका
बहुतांश स्टार आणि सामान्य लोक सुद्धा आपला लूक उत्तम बनवण्यासाठी जिममध्ये ३-४ तास घालवतात. उत्तम लाइफस्टाइलसाठी स्वत:ला फिट ठेवणे किंवा व्यायाम करणे हा उत्तम मार्ग आहेच. परंतु त्याचा अर्थ असा नाही की, आपल्या क्षमतेपेक्षा अधिक वर्कआउट करावा. ही पद्धत तुमच्या जीवावर बेतू शकते.
३० मिनिटंच करा व्यायाम
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहेच. परंतु त्याचे रुटीन आणि त्यासाठी काही मर्यादा असली पाहिजे. तज्ञांच्या मते, आपण कमीत कमी ३० मिनिटंच व्यायाम केला पाहिजे. त्याचसोबत अधिक १० मनिटे सुद्धा व्यायाम करु शकता.
पुढील गोष्टीकडे द्या लक्ष
वर्कआउट करतेवेळी वेळोवेळी ब्रेक घ्या. वयाच्या चाळीशीनंतर सुद्धा तुम्ही व्यायाम करत असाल तर तुमचा श्वास हा जड होतो आणि तुम्हाला हृदय विकाराचा झटका किंवा दुसरी समस्या उद्भवू शकते. मध्येमध्ये ब्रेक घ्या आणि ग्लुकोज वॉटर सुद्धा प्या. असे केल्याने तुमचा हार्ट रेट ही योग्य प्रमाणात राहिल.(Actors who faced heart attack)
उपाशी पोटी करुन नका ‘हे’ काम
काही लोक वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी व्यायाम करण्याचे रुटीन फॉलो करतात. त्यानंतर तेच हेवी डाएट घेतात. पण तज्ञांच्या मते, उपाशी पोटी जीम केल्याने शरिरावर प्रेशर वाढते. यामुळे काही समस्या उद्भवू शकतात. जीममध्ये वर्कआउट करण्यापूर्वी हलक्या स्वरुपाचा डाएट जरुर घ्या.